' राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली ‘मार्मिक’ श्रद्धांजली.. – InMarathi

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली ‘मार्मिक’ श्रद्धांजली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले, समाजातील सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, पंतप्रधान मोदींपासून ते अगदी राज ठाकरेंपर्यंत, राज ठाकरे स्वतः त्यांच्या अंत्यसंसस्कारला हजर होते. आपलं संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण  करणारे एकमेव असे बाबासाहेब पुरंदरे होते.

 

babasaheb purandare inmarathi

 

बाबासाहेबांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे! त्यांचा जन्म पुण्याजवळ असलेल्या सासवड भागात २९ जुलै १९२२ साली झाला. २९ जुलै २०२१ रोजी त्यांनी वयाच्या शंभरीत प्रवेश केला होती. सुरवातीपासून इतिहासाची आवड, सखोल अभ्यास, निरीक्षण, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावातील गुण. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला अभिमान आणि एक प्रकारचा वेडेपणा यातून त्यांनी छत्रपतींचे चरित्र आपल्या जाणता राजा या नाटकातून उभारले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बाबासाहेबांनी आपल्या ओघवत्या वाणीने शिवचरित्र घराघरात पोहचवले, आजवर बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांवरील तब्बल १५ हजार व्याख्याने दिली आहेत. त्यांची दखल केवळ महाराष्ट्राने नव्हे तर देशाने घेतली आहे, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण यासारखे मानाचे पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत, त्यांच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाली आहे. खुद्द राज ठाकरे यांनी आपल्या व्यंग चित्रातून एक अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे, त्यावर अनेक शिवभक्तांनी सुद्धा कॉमेंट्स केल्या आहेत. चला तर मग बघुयात…

 

babasaheb inmarathi

राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून स्वतः काढलेल्या व्यंग चित्रातून एक प्रकारे बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे, खरं तर खूप दिवसांनी राज ठाकरेंकडून अशी कलाकृती पहायला मिळाली.

 

baba p inmarathi 1

 

 

baba p inmarathi 2

 

लोकांनी कॉमेंट्समधून श्रद्धांजली वाहिली आहेच त्यावर राज ठाकरे यांचं कौतुक देखील केले आहे.

 

baba p inmarathi 3

 

 

baba p inmarathi 4

 

व्यंगचित्रातून वाहिलेल्या श्रद्धांजलीला अप्रतिम या एका शब्दातून राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

 

baba p inmarathi 5

 

 

baba p inmarathi 6

 

राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राला थेट मार्मिकशी तुलना केली गेली आहे

 

baba p inmarathi 7

 

 

baba p inmarathi 8

 

राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र पाहून काहीजण तर निशब्द झाले आहेत असे त्यांच्या कॉमेंट्समधून दिसत आहे, तर काहीजण म्हणतात ग्रेट

 

baba p inmarathi 9

 

बाळासाहेब जसे मार्मिकमधून व्यंगचित्र काढत त्याच पद्धतीने राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र काढून बाळासाहेबांची आठवण आली अशा शब्दात नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

 

baba p inmarathi 10

 

बाबासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली योग्य आहे असे काहीजण म्हणतात तर बाबासाहेबांना देवमाणसाची आणि छत्रपतींना देवाची उपमा देण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावरून जशा सकारात्मक कॉमेंट्स आल्या ताशा काही नकारत्मक कॉमेंट्स सुद्धा आल्या आहेत, बाबासाहेबांच्या विचारांना दुजोरा देणाऱ्या काही मंडळींनी राज ठाकरे यांच्यावर टीका सुद्धा केली आहे.

माणसा माणसांचे एकमेकांबद्दलचे परस्पर मतभेद असूही शकतात, मात्र एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर ही त्यांच्यावर टीका करणे खरं तर चुकीचे आहे, आपले अखंड आयुष्य छत्रपतींना बहाल करणाऱ्या या कट्टर शिवभक्ताला आमच्यकडून देखील मानाचा मुजरा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?