' विषारी बाई : तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स गूढपणे मृत्युमुखी पडत जायचे – InMarathi

विषारी बाई : तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स गूढपणे मृत्युमुखी पडत जायचे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘विषारी साप’ हे प्रकरण आपण बऱ्याच कथांमध्ये, सिनेमांमधून बघितलेलं आहे. हा साप एखाद्या व्यक्तीला दंश करते आणि नंतर ती व्यक्ती विषारी होऊन जाते सारख्या कित्येक कथा आपल्याला रंगवून दाखवण्यात आल्या आहेत.

एखादी व्यक्ती अशी कोणतीही घटना न घडता जन्मजात विषारी असू शकते यावर मात्र कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण, अमेरिकेत २७ वर्षांपूर्वी अशी एक महिला होऊन गेली आहे जिला विज्ञानाने ‘विषारी महिला’ अशी अधिकृत उपाधी दिली होती.

कॅलिफोर्निया मध्ये राहणाऱ्या या महिलेचं ‘ग्लोरिया रमेझ’ हे नाव होतं. कॅन्सर झालेल्या या महिलेच्या संपर्कात आलेल्या २३ व्यक्तींना एकाच वेळी विषबाधा झाल्याची अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये नोंद आहे. वैद्यकीय शाखेला अचंबित करणाऱ्या या प्रकरणाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

 

gloria ramirez inmarathi

 

१९ फेब्रुवारी १९९४ रोजी ग्लोरिया रमेझ या महिलेला कॅलिफोर्निया मधील एका हॉस्पिटलमध्ये अतिरक्तदाबाच्या त्रासामुळे भरती करण्यात आलं होतं. सहा आठवड्यांपूर्वी या महिलेला कॅन्सरचं निदान झालं होतं.

ग्लोरिया रमेझ यांच्या रक्ताची तपासणी करण्यासाठी काही नर्सनी त्यांच्या रक्ताचे नमुने घ्यायचे ठरवले. ग्लोरिया यांना वाचवण्यासाठी डॉक्टर इतरही प्रयत्न करत होते. पण, कोणताही उपाय काम करत नव्हता, हृदयाच्या ठोक्याची गती ही क्षणागणिक वाढत चालली होती.

ग्लोरिया रमेझ यांना काही वेळात श्वास घ्यायला आणि बोलायला सुद्धा अवघड जात होतं. दोन अपत्यांची आई असलेल्या ग्लोरिया रमेझची परिस्थिती ही हॉस्पिटल स्टाफलासुद्धा बघवत नव्हती.

हॉस्पिटल प्रशासनाला एकीकडे ग्लोरिया रमेझ यांच्या ढासळत्या प्रकृतीची काळजी होती, पण त्यासोबत एक दुसरीच समस्या उदभवली होती. ग्लोरिया यांच्या रक्ताचे नमुने घेऊन गेलेल्या ३ नर्सही बेशुद्ध झाल्या होत्या.

 

nurses inmarathi

 

ग्लोरिया यांच्या रक्तात अमोनियाचं प्रमाण इतकं वाढलं होतं की, त्यामुळे त्यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चक्कर येत होती.

रक्ताचे नमुने घेण्यासाठी आलेल्या नवीन ३ परिचरिकांची सुद्धा तीच परिस्थिती झाली होती. डोकेदुखी आणि अस्वस्थ वाटल्याने त्या सर्वच महिला त्रस्त झाल्या होत्या.

ग्लोरिया रमेझ यांच्या आजाराचा त्रास हा फक्त परिचारिकांनाच झाला नव्हता, तर हॉस्पिटलमध्ये इतर आजारांसाठी भरती झालेल्या रुग्णांपर्यंत सुद्धा हा त्रास पोहोचला होता. अतिदक्षता विभागात भरती असलेल्या २३ रुग्णांना सुद्धा त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होत होता.

अतिदक्षता विभागातील सर्व रुग्णांना तात्काळ तिथून हलवून हॉस्पिटलच्या पार्किंगच्या जागेत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला होता. इतर दिवशी शांतपणे काम सुरू असलेल्या त्या हॉस्पिटलमध्ये १९ फेब्रुवारी १९९४ रोजी मात्र चांगलाच गोंधळ उडाला होता.

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांनासुद्धा ही लागण झाली आणि त्यांना त्वरित उपचार करण्यासाठी जागा असेल त्या ठिकाणी ‘सलाईन’ लावून, कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्याची त्यांची सोय करण्यात आली.

ग्लोरिया रमेझने जवळपास तीन तास आपल्या मृत्यूशी झुंज दिली. पण, शेवटी मृत्यूचा विजय झाला. ग्लोरिया यांच्या मृतदेहाला तिथून हलवण्यासाठी आलेल्या ३ लोकांच्या पथकालासुद्धा श्वास घेण्यास त्रास होत होता.

 

gloria ramirez 2 inmarathi

९ लोक बेशुद्ध झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाला तो मृतदेह हलवण्यात यश आलं. ग्लोरिया रमेझ यांच्या मृत्यूचं निदान समोर येण्यासाठी शवविच्छेदन करणारे डॉक्टर प्रयत्न करत होते. पण, अमोनियाचा वास पूर्णपणे निघून जाण्यासाठी त्यांना एक आठवडाभर वाट बघावी लागली होती.

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या अहवालात असं सांगितलं की, “ग्लोरिया रमेझ यांच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी लागेल आणि मगच त्यांचा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येईल.”

१२ एप्रिल १९९४ रोजी ग्लोरिया रमेझ यांच्या मृतदेहाला पुरण्यात आलं. मृतदेह सोपवताना डॉक्टरांनी या मृत्यूचं कारण ‘किडनी’चा आजार हे सांगण्यात आलं होतं.

ग्लोरिया रमेझ यांच्या गूढ मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याची जबाबदारी क्रिस्टन वॉलर आणि मारिया ओसोरिया या दोन शास्त्रज्ञांनी घेतली होती. ३४ लोकांची चौकशी तपासणी केल्यानंतर शास्त्रज्ञांनासुद्धा हे आश्चर्य वाटत होतं की, ग्लोरिया रमेझ यांना असा कोणता आजार झाला असावा? ज्यामुळे त्यांच्यापासून २ फूट लांब असलेल्या लोकांना सुद्धा तेच लक्षणं त्वरित दिसायला लागले.

ग्लोरिया यांच्या रक्तामध्ये ‘डाय मिथिल सल्फेट’चं प्रमाण वाढल्याने हा प्रसंग ओढवला असावा असं निदान सर्व परिक्षणांती करण्यात आलं.

 

toxic blood inmarathi

 

‘मास हिस्तेरिया’ हे या संपूर्ण घटनेला नाव देण्यात आलं होतं. ‘डाय मिथिल सल्फेट’ वाढण्याचं कारण हे ‘डीएमएसओ’ हे कॅन्सर पासून बचाव करण्यात येणारं क्रीम असल्याचं समोर आलं होतं. या क्रीमचा वास आणि ग्लोरिया यांच्या तोंडातून येणारा वास सारखाच असल्याने या निर्णयाची पुष्टी करण्यात आली होती.

हेच कारण होतं ज्यामुळे ग्लोरीया यांच्या संपर्कात येणारे हॉस्पिटल कर्मचारी, परिचारिका यांना श्वास घेता येत नव्हता. एका रासायनिक द्रव्यामुळे ‘विषारी व्यक्ती’ ही ओळख ग्लोरिया रमेझ यांच्या नावासमोर लागली याची खंत विज्ञान जगतात नेहमीच असेल हे नक्की.

“प्रत्येक गोष्टीत जाणून घेतली तर वैज्ञानिक बाजू ही असतेच” यावर आपला हे विश्वास बसायला पाहिजे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?