'बाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

बाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

रोड ट्रीप हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, त्यातल्या त्यात बाईक वरून रोड ट्रीप म्हणजे सर्वांगीण सुंदर अनुभव. या रोड ट्रीप तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा तुमच्याकडे परफेक्ट प्लान तयार असतो आणि जर तुम्ही काहीही विचार न करता, कोणत्या ही अनुभवाशिवाय थेट रोड ट्रीपला निघालात तर हीच रोड ट्रीप तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ ठरू शकते.  म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ८ अश्या गोष्टी ज्या तुम्ही वाचा, त्यावर विचार करा, त्या फॉलो करा, मग बघाच तुमची रोड ट्रीप किती मस्त होते ती!

सर्वप्रथम रोड ट्रीपसाठी योग्य वेळेची निवड करा

road-trip-marathipizza01
cobrapost.com

रोड ट्रीप प्लान करताना तुम्ही ज्या भागात जाणार आहात त्या भागाच्या हवामानाचा तुम्हाला अंदाज असायला हवा. जर तुम्ही राजस्थान उन्हाळ्यात प्लान केलं आणि लडाख अगदीच थंडीच्या वेळी, तर मात्र तयार निसर्गाचे तडाखे खाण्यापासून तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही.

 

मोबाईल चार्जिंगची सोय न चुकता करा

road-trip-marathipizza02
instructables.com

जेव्हा कधी तुम्ही रोड ट्रीप प्लान करता तेव्हा तुमचा मोबाइल संपूर्ण दिवस चार्ज असायला हवा, सध्याच्या जमान्यात मोबाइल इतका महत्त्वाचा झालाय की कधी कोणत्या क्षणी कामाला येईल ते सांगता येत नाही. सोबतच रस्ता शोधताना देखील बहुतेक वेळा हाच मोबाइल मदत करतो. त्यामुळे पोर्टबल चार्जरची सोय करा किंवा अशी एखादी गाडी निवडा ज्यामध्ये इनबिल्ट चार्जिंग पॉइंट असेल.

 

अचूक राईड गियर

road-trip-marathipizza03
chaparral-racing.com

लेदर जॅकेट्स, ग्लव्हज क्नी पॅडस, एल्बो पॅडस आणि बूट्स या गोष्टी तुमच्या राईड गियर मध्ये सर्वात वरच्या स्थानी हव्यात. सोबत इतर काही फॅशननेबल गियर्स बजेट असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता.

 

नेहमी एकाच वेगाने राईड करा

road-trip-marathipizza04
traveltriangle.com

एकाच स्पीडने राईड केल्यास फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या राईडचा आनंद लुटू शकता, सोबतच सारखा सारखा स्पीड कमी जास्त न केल्याने गाडी मायलेज देखील चांगलं देईल. हा स्पीड बहुधा मध्यमच असावा, जास्त जोराने किंवा अतिशय कमी स्पीडने गाडी पळवू नये, नाहीतर रोड ट्रीपची खरी मजा तुम्ही मिस कराल.

 

आपल्या जर्नीमध्ये सारखे सारखे ब्रेक्स घेऊ नका

road-trip-marathipizza05
blog.grabon.in

अनेकदा रोड ट्रीपला निघाल्यावर चांगला स्पॉट दिसला की आपल्याला थांबायची सवय असते, का? तर फोटो काढण्यासाठी, सोलो किंवा ड्युअल रोड ट्रीप करत असाल तर ही गोष्ट ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही ग्रुपने रोड ट्रीप करता तेव्हा मात्र असे सारखे सारखे ब्रेक घेतल्याने भयंकर वेळ वाया जातो, तो आपल्या लक्षातही येत नाही पण जेव्हा आपण पाहतो की आपण शेड्युल नुसार चालत नाही आहोत तेव्हा मात्र अख्खा प्लान बोंबलतो, म्हणून ब्रेक घ्या, पण दर २-३ तासांनी ब्रेक घ्या, तो देखील फक्त १० मिनिटांचा.

 

तुमच्याजवळ असणारी सर्व महागडी उपकरणे प्लास्टिक बॅग्जमध्ये पॅक करून ठेवा

road-trip-marathipizza07
scoopwhoop.com

रोड ट्रीप करताय म्हणजे तुम्ही वॉटरप्रुफ बॅगच घ्याल, पण तरीही एक्स्ट्रा काळजी म्हणून तुमच्या जवळची महागडी उपकरणे जसे की कॅमेरा, मोबाईल फोन्स, लॅपटॉप, आयपॉड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवा म्हणजे, कोणत्याही प्रकारे त्यांना नुकसान पोचणार नाही.

 

आता सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे ट्यूबलेस टायरचा वापर

road-trip-marathipizza08
rajnikantvscidjokes.in

तुमच्या गाडीला जर ट्यूबलेस टायर नसतील तर ते बसवल्याशिवाय लांबच्या रोड ट्रिप्स ला बिलकुल जाऊ नका. ट्यूबलेस टायर हे सामान्य टायर्सपेक्षा अधिक काळ टिकतात आणि पंक्चर वगैरे होऊन मध्येच दगा देत नाहीत. आणि जरी झालेच पंक्चर तरी तुम्ही त्यांवर आरामात एखाद्या रिपेअर शॉप पर्यंत रायडींग करू शकता.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?