' शेअर मार्केटमध्ये महिलेचा डंकाः Nykaa ब्रँड मागच्या नायिकेची यशोगाथा

शेअर मार्केटमध्ये महिलेचा डंकाः Nykaa ब्रँड मागच्या नायिकेची यशोगाथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वप्न बघणे हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा ती स्वप्ने पूर्ण करण्याचा देखील अधिकार आहे. ही स्वप्नेच आपल्याला यशस्वी भरारी घेण्यासाठी पंख होवून मदतीला येतात. हे सिद्ध करून दाखवले आहे IIM अहमदाबाद मधून MBA मध्ये पदवी घेतलेल्या फाल्गुनी नायरने!

 

falguni inmarathi

 

फाल्गुनीने पदवीनंतर लवकरच कोटक महिंद्रा येथे गुंतवणूक बँकिंगमध्ये काम करण्यास सुरुवात केली. २००५ मध्ये त्या बँकेच्या त्याच विभागात व्यवस्थापकीय संचालक झाल्या. फाल्गुनीने कोटक महिंद्रासाठी सुमारे १८ वर्षे काम केले, या दरम्यान तिने बँकिंग क्षेत्राच्या पलीकडे जाऊन इतर क्षेत्रात प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

‘ स्वप्न बघायला घाबरू नका आणि स्वत:वर विश्वास ठेवा’ या गोष्टीवर ठाम रहात तीने nykaa ची स्थापना केली. तिला हा प्रयोग करण्यासाठी ऑनलाइन सौंदर्य उत्पादन क्षेत्राने आकर्षित केले आणि अभ्यासांती तिने याच क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.

Nykaa ची मूळ कंपनी ‘FSN E-Commerce Ventures’ ही देशातील पहिली युनिकॉर्न आहे जी एका महिलेने सुरू केली आहे. (युनिकोर्न म्हणजे स्टार्टअप कंपनी.)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिने अभ्यास केला तेव्हा तिच्या हे लक्षात आले की जागतिक सौंदर्य उत्पादनांचा उद्योग हा असा उद्योग आहे जो जागतिकीकरणाच्या लाटेत देखील स्थीर राहिला आहे आणि पिढ्यांपिढ्या एकनिष्ठ ग्राहकांचा विश्वासही टिकवून राहिला आहे.

मेकअप आणि सौंदर्याच्या वस्तूंची आवड असल्याने फाल्गुनीला वैयक्तिक ग्रूमिंगबद्दल भारतीय महिलांचे मत बदलायचे होते. त्यासाठी खास काहीतरी विकसित करण्याच्या इच्छेने तिने पती संजय नायर यांच्यासोबत २०१२ मध्ये Nyka ची स्थापना केली.

फाल्गुनीला भारतामध्ये सौंदर्य वस्तूंच्या बाजारपेठेत एक विसंगती आढळली जी जास्त मागणी असूनही, फ्रान्स किंवा जपानसारख्या इतर राष्ट्रांमध्ये उत्पादनाच्या व्याप्तीच्या बरोबरीने नव्हती, मुख्यत्वे अनेक ठिकाणी उत्पादनाची उपलब्धता नसल्यामुळे. Nyka स्थापना केली.

 

nyka inmarathi

 

कोविड १९ मुळे अचानक मंदीचा काळ सुरू झाला आणि प्रत्यक्ष उत्पादन विक्रीची बाजारपेठ बंद पडली. याचा सकारात्मक विचार करत Nyka च्या ऑनलाइन विक्री स्टोअर्सने बाजारपेठेत चांगलाच बूम घेतला. सौंदर्यप्रसाधनांसाठी असलेल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी Nykaa हा भारतातील कौस्मेटिक प्रेमींसाठी एक चांगला पर्याय म्हणून सिद्ध झाला आहे.

Nykaa हा एक असा भारतीय ब्रॅंड आहे जो सौंदर्य आणि पर्सनल केअर उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. सुरवातीला ई- कॉमर्स च्या माध्यमातून सुरू झालेल्या या कंपनीने नंतर देशभरातील अनेक महानगरांमध्ये किरकोळ विक्रीसाठी दुकाने सुरू केली.

महिला आणि पुरुष दोघांसाठी सौंदर्यप्रसाधने तसेच स्किनकेअर, बाठ अँड बॉडी आणि वेलनेस उत्पादने या कंपनीद्वारे बनवली जातात. त्यांचा असा दावा आहे की भारतात दरमहा कंपनीच्या १.५ लाख उत्पादनांची विक्री होते.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना कंपनीच्या संस्थापक,CEO फाल्गुनी नायर म्हणाल्या की, “आम्ही किरकोळ विक्रेता होण्याचा निर्णय घेतला आहे कारण सौंदर्य ही एक श्रेणी आहे जिथे प्रत्यक्ष चाचणी महत्त्वपूर्ण आहे. आमच्या लक्षात आले की जर आम्हाला प्रीमियम उत्पादने किंवा अगदी परवडणारी उत्पादने ब्लश आणि फाउंडेशन सारख्या श्रेणींमध्ये विकायची असतील तर भारतीयांच्या स्कीनटोनशी रंग जुळवणे खूप महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या प्रसाधनानच्या आवडी निवडी समाजाने ही गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांना खरोखरच सर्वांगीण सौंदर्याचा अनुभव देण्यासाठी आम्ही ही किरकोळ विक्रीची चेन उभारण्याचे ठरवले.”

 

nykaa inmarathi

 

सध्या Nykaa चे स्टोअर Luxe, On Trend आणि Kiosks या तीन प्रकारात आहेत. Nykaa, On Trend आयटम ट्रेंडिंग आणि फॅशनेबल ब्रँड्सपुरते मर्यादित असल्याने, Nykaa च्या Luxe स्टोअर्समध्ये Estee Lauder, Dior, Huda Beauty, आणि MAC कॉस्मेटिक्स यांसारखे प्रीमियम आणि लक्झरी ब्रँड तसेच इतर अनेक श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

महिलांच्या सौंदर्याव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्मवर Nykaa Man वेबसाइट आणि अॅपवर रजिस्ट्रेशन केलेल्या पुरुषांसाठी अनेक प्रकारचे ग्रूमिंग पर्यायही देखील आहेत.

आपल्या स्पर्धकांसोबत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीची स्वत:ची अशी पॉलिसी आहे. या पॉलिसीनुसार उत्पादने, ब्रॅंड वितरकांमार्फत खरेदी केले जातात आणि त्यानंतर ती थेट ग्राहकांना विकली जातात.

 

nykaa 1 inmarathi

 

शेअर मार्केटमध्ये मजल

Nykaa अलीकडेच त्याचा IPO लाँच केल्यानंतर आणि त्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामुळे तिच्या संस्थापक फाल्गुनी नायर या भारतातील सेल्फ मेड अब्जाधीश महिला ठरल्या आहेत.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, Nykaa च्या विक्रमी रजिस्ट्रेशन नंतर तिची मार्केट व्हेल्यू $६.५ अब्ज झाले आहे. Nykaa चा (आयपीओ) जेव्हा मार्केटमध्ये रजिस्टर झाला. तेव्हा Nykaa चे मार्केट कॅपिटलायझेशन १ लाख करोडच्या पुढे गेले आणि फाल्गुनी नायर यांचे नाव जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत आले आहे.

असं म्हणता येईल की Nyka सौंदर्य उद्योगाचा ‘ऍमेझॉन’ बनला आहे. ई-कॉमर्स आणि ब्युटी रिटेल भारतात चांगले काम करत नाहीत हा गैरसमज दूर करण्यात हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे.

 

ipo inmarathi

 

कुटुंबात मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक दिली गेली पाहिजे हा आग्रह धरणार्‍या फाल्गुनी नायर यांना स्वत:ला ‘महिला उद्योजक’ म्हणवून घेणे पसंत नाही. त्यांच्या घरातील अशा समान वागणुकीमुळे त्यांना जो आत्मविश्वास मिळाला तोच त्यांच्या यशाचे कारण बनला असे त्या मानतात.

‘बायोकॉन’ च्या किरण मुजूमदार शॉ यांना मागे टाकणार्‍या फाल्गुनी नायर वेगळ्या ठरतात ते यामुळेच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?