' तिरुपती प्रसादाच्या लाडूची परंपरा; तो इतका चविष्ट असण्यामागचं गुपित… – InMarathi

तिरुपती प्रसादाच्या लाडूची परंपरा; तो इतका चविष्ट असण्यामागचं गुपित…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल घराघरात काहीही गोड पदार्थ केला तर तो सर्वात प्रथम देवापुढे ठेवला जातो, देवाला एकदा नैवेद्य दाखवला की आपण तो खायला हरकत नाही अशी एक सर्वश्रुत श्रद्धा प्रत्येक माणसांत असते. देव तो प्रसाद खात नाही हे माहिती असूनसुद्धा लोक श्रद्धेने देवापुढे तो पदार्थ ठेवतात.

गणपती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण, गणेशभक्त संपूर्ण वर्ष या सणाची वाट बघत असतात, तर खाद्यप्रेमी बाप्पाच्या आवडत्या मोदकांची वाट बघत असतात. महाराष्ट्रात मोदक, मथूरेत तुम्ही गेलात तर कृष्णाला छप्पन भोग म्हणून नैवद्य दाखवलं जातो.

 

modak 1 inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मागच्या वर्षीपासून अनेक धार्मिकस्थळे बंद असल्याने भाविकांची चांगलीच पंचाईत झाली होती मात्र आता धर्मस्थळे उघडल्याने भाविकांनी लगोलग दर्शनासाठी घाई केली. आज महाराष्ट्रातील शिर्डी संस्थान असो किंवा पंढरपूरचा विठोबा असो भाविकांची या दोन्ही ठिकाणी श्रद्धा आहे.

एखाद्या देवस्थानचं जितकी मोठं प्रस्थ असतं तितकंच तिकडच्या प्रसादच महत्व सुद्धा असते. अमृतसरमधील गोल्डन टेम्पल शीख बांधवांचं सर्वात मोठं देवस्थान आहे, तिथं मिळणारं लंगर एक प्रकारचा प्रसाद म्हणून भाविक ग्रहण करतात, अगदी गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच या लंगरमध्ये असणारा प्रसाद ग्रहण करतात.

अमृतसर प्रमाणे आणखीन एका देवस्थानचा प्रसाद खूप प्रचलित आहे, कोणते ते देवस्थान चला तर मग जाणून घेऊयात…

 

Golden Temple.Inmarathi
tripoto.com

 

पूर्वी अशी समज होती की कुठल्याही व्यक्तीने जर आपले केस कापले असतील तर साहजिकच त्याला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तिरुपतीला जाऊन आलात का? तिरुपतीला गेल्यावर आले केस दान कारवाई लागतात अशी प्रथा तिथे अस्तित्वात आहे.

तिरुपती हे भारतातले सर्वात मोठे देवस्थान आहे. याचे प्रस्थ इतके मोठे आहे की देशभरातून भाविक हजारो भाविक रोज दर्शनासाठी येत असतात. डोंगरावर वसलेल्या या देवस्थानाचा इतिहास अनेक शतकांपासून आहे. भगवान व्यंकटेश्वराचं हे मंदिर वास्तुशास्त्राचा देखील उत्तम नमुना आहे.

 

tirupati balaji 2 InMarathi

भाविक जितक्या श्रद्धने तासंतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात तर अशा भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात, हे लाडू इतके रुचकर असतात की कोणीही तिरुपतीला जाणार असल्यास त्याला हमखास हे लाडू आणायला सांगतात.

तिरुपतीच्या देवळातील मिळणाऱ्या या लाडूंचा इतिहास देखील ३०० वर्ष जुना आहे. इतक्या वर्षांची परंपरा असूनही या लाडवांच्या चवीत बदल झालेला नाही. कारण लाडवांचा इतिहास बघता पल्लव राजवटीत या लाडवांचा उदय झाला. १४८० च्या आसपास असलेल्या शिलालेखांच्या अभ्यासात या लाडवांचा उल्लेख केला आहे तेव्हा या लाडवांना मनोहरम म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चवीत आणि आकारात बदल होत गेले.

 

tirupati-balaji-hair-auction-marathipizza04

 

दुसरी गोष्ट म्हणजे चव, गोड तयार करणे ही एक पाककला आहे. वर्षानुवर्षे ठरलेलं साहित्यांचे अचूक प्रमाण आणि लाडू बनवण्यासाठी लागणारे कौश्यल्य असलेले हात, गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाही  यामुळे इतकी शतकं उलटून सुद्धा या लाडवांची गोडी कमी झालेली नाही. या लाडवांमध्ये बेसन, काजू,साखर  तूप,वेलची  इत्यादी सामग्री वापरली जाते.

 

laddu inmarathi

 

दिवसाला तब्बल  १५०००० इतके लाडू बनवले जातात या लाडवाला श्रीवरी,  पुट्टु असेही म्हंटले जाते. लाडवांच्या लोकप्रियतेमुळे आणि स्वादिष्ट चवीमुळे तिरुपती देवस्थानला २००९ साली पेटंट सुद्धा मिळाले आहे.

व्यंकटेश्वराचं दर्शन घेतल्यावर भाविकांना लाडू प्रसाद म्हणून दिला जातो तसेच भाविकांना जर हा प्रसाद सोबत घेऊन जायचा असेल तर तशीही सोय करण्यात आली आहे, नाममात्र शुल्क यावर आकारले जाते.

 

balaji

 

आज आपल्या देशाला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसा खाद्य संस्कृतीचा सुद्धा समृद्ध वारसा आहे, धर्म कोणताही असो त्या त्या धर्माचा खाद्य संस्कृतशी संबंध येतोच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?