' प्रवास करण्याचे १३ फायदे - जे तुम्हाला जीवनात प्रचंड यशस्वी करू शकतात...

प्रवास करण्याचे १३ फायदे – जे तुम्हाला जीवनात प्रचंड यशस्वी करू शकतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आजचं जीवन हे धकाधकीचं झालं आहे. आपल्याला त्यापासून सुटका मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. अशावेळेस आपण जोपासलेले छंद हेच कामी येतात. आता व्यक्तीगणिक छंद हे वेगवेगळे असू शकतात, मात्र आपल्या आवडीच्या ठिकाणी प्रवास करणं हा पर्याय सर्वांनाच आवडणारा असतो.

कधी कधी आपल्याला अनोळखी ठिकाणी जाण्याची भीती वाटते किंवा प्रवासाचा कंटाळा येतो. अशी एक ना अनेक कारणं  आपल्यासमोर असतात, परंतु प्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

जाणून घेऊया, प्रवास करण्याचे १३ फायदे जे तुम्हाला प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देतील शिवाय जीवनात प्रचंड यशस्वी देखील करू शकतील.

 

१) निसर्गाशी जवळीक

 

kashmir-inmarathi01

 

अत्याधुनिक अशा व्यायामशाळेत घाम गाळून आपण शरीर आणि मनाची निगा राखतो ,पण तेव्हा आपला निसर्गाशी काहीच संबंध येत नाही. जेव्हा आपण एखाद्या साहसी प्रवासात किंवा अगदी आराम करण्यासाठी आखलेल्या एखाद्या सहलीला जातो तेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो. अशावेळेस आपोआपच खूप प्रसन्न वाटतं.

अनोळखी शहरातील लांबच लांब केलेली भटकंती, पोहणे, साहसी खेळ यातून आपल्याला आनंद तर मिळतोच शिवाय ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता आपण एक प्रकारे शरीराला स्ट्रॉंग करत असतो. ते पण सवयीचा भाग म्हणून नव्हे तर केवळ आपल्या आनंदासाठी..!

 

२) नवीन लोकांशी भेट

friends inmarathi
awara diaries

 

नॉर्मल आयुष्यापेक्षा अधिक मैत्री करणारे लोकं आपल्याला प्रवासात भेटत असतात. इतर प्रवासी नेहमीच आपले अनुभव इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात, चांगल्या ठिकाणी जाण्यासाठीच्या टिप्स देतात आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या ठिकाणचे लोक भेटतात.

इतर प्रवाश्यांसह संभाषण सुरू करणं  विलक्षण सोपंआहे. आपण कुठून आलात? हा साधा प्रश्न पुढच्या मैत्रीचा मार्ग प्रशस्त करतो. तुम्ही किती मैल प्रवास केला? यापेक्षा त्या प्रवासात तुम्ही किती मित्र मिळवले? हा प्रश्न प्रवासातून परत आल्यावर स्वतःला नक्की विचारा.

 

३) नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी

 

sky diving inmarathi

सतत नवीन करण्यास आपण उत्सुक असतो पण रोजच्या धकाधकीत ते शक्य होतंच असं नाही. तेव्हा नवीन गोष्टी हाताळण्याची संधी आपल्याला सर्वात जास्त सहलीच्या ठिकाणीच मिळते. यातून तुम्हाला एखादा आवडीचा पदार्थ मिळू शकतो किंवा एखादा नवीन छंद, शक्यता तर इतक्या आहेत की, आपल्याला यातून करिअरची नवी वाट देखील मिळू शकते.

जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काही करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यात किती यशस्वी होतो यापेक्षा आपण प्रयत्न केला ही बाब पण खूप समाधान देऊन जाते.

शिवाय नवीन गोष्टी जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपला आवाका देखील वाढतो, लोकांशी संवाद साधण्यासाठी आपल्याकडे नवीन विषय असतात. तेव्हा प्रवासात काही अनोळखी रस्ते नक्की निवडा!

 

४) वास्तविकता पाहण्याची संधी

 

hrithik roshan inmarathi
IMDb

 

जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन वास्तव काय आहे ते अनुभवत नाही तोपर्यंत त्याबाबत आपली काही मतं असतात. ती मतं बनविण्यात पुस्तके, मित्र, माध्यमं यांनी बराच हातभार लावलेला असतो.

मग त्याठिकाणी गेल्यावर आपल्याला नक्की खरं काय आहे याचा पडताळा होतो. गाईडबुक आपल्याला रस्ता दाखवू शकतात पण प्रत्यक्ष त्याठिकाणी गेल्यावरच तुम्हाला त्याठिकाणाचा खरा अनुभव मिळेल.

 

५) आपल्याला एक नवीन उद्देश सापडेल

 

yjhd inmarathi
dnaindia.com

 

प्रवास करणे म्हणजे स्वत: मध्ये एक गुंतवणूक करण्यासारखं आहे. आपण प्रवास करता तेव्हा आपण आपल्या घरी सर्वकाळ राहता त्यापेक्षा अधिक नवीन लोक, संस्कृती आणि जीवनशैलीच्या संपर्कात असता.

यातून जीवनाविषयी एक नवीन समज निर्माण होऊन जीवनासाठी अनेकदा नवीन उद्देश सापडतात. तुम्ही जीवन जगण्याचा हेतू काय आहे यावर अडकला असाल तर, तुम्ही जीवनात काय करू इच्छित आहात, या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास प्रवास करा .. कदाचित आपल्याला आपल्या जीवनाचं नवीन उद्दिष्ट मिळेल. 

 

६) आपल्या दृष्टीकोनात बदल होतो.

 

happy journey inmarathi
youtube

 

 

आपली स्वतःची काही मतं असतात आणि आपण त्यावर ठाम असतो. मात्र प्रवास केल्यावर, नवीन लोकं, स्थळ, बघितल्यावर आपल्या ज्ञानात भर पडून आपले पूर्वग्रह दूर होण्यास मदत होते. आपल्या दृष्टीकोनात निश्चित बदल होतो.

 

७) आपल्या संवादकौशल्यात भर पडेल

 

communication 2 inmarathi

 

नवीन ठिकाणी गेल्यावर तिथे आपली भाषा बोलली जाईल असे नाही. तेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधण्यासाठी होणारी कसरत आपल्या संवादकौशल्यात भर घालणारीच ठरते. यातून आपोआप समोरच्याशी संवाद साधण्याची आपली कला बहरत जाते.

याशिवाय समोरच्याचं बोलणं आपण कानात तेल घालून ऐकतो. तेव्हा संवादात समोरील व्यक्तीचं बोलणं पण महत्त्वाचं असतं यावरचा आपला विश्वास वाढतो.

८) नवीन संस्कृतींशी ओळख होईल.

 

nagaland-tourism-inmarathi
deccanchronicle.com

 

आपल्या परिसरात, आपल्या कार्यक्षेत्रात आपण कितीही हुशार असलो तरी संपूर्ण जग जाणून घेण्याची आपली क्षमता नाही. मात्र प्रवास करून आपण यावर काही प्रमाणात मात करू शकतो हे मात्र नक्की!

जेव्हा नवीन ठिकाणी आपण भेट देतो तेव्हा सतत आपल्याला काही आश्चर्याचे धक्के बसत असतात. यातून आनंद तर मिळतोच पण आपली ज्ञान मिळविण्याची असोशी देखील वाढते.

 

९) आपल्या सगळ्यांच्या गरजा समान आहेत.

 

karwaan-movie-inmarathi
DU beat

 

जगातला कुठलाही माणूस असो त्याच्या आणि आपल्या गरजा समान आहेत, हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रवास करायलाच हवा. आपली लोकं आणि परकी लोकं हा भाव आपल्या मनात असतो, तेव्हा अधिक लोकांना भेटल्यानंतरच हा भाव धूसर होईल.

 

१०) मित्र बनवणं अत्यंत सोपं आहे. 

 

chichore inmarathi

 

जेव्हा आपण नित्यक्रमातून बाहेर पडून प्रवास करतो तेव्हा आपण मैत्रीपूर्ण, अगदी सहज वागत असतो. अनोळखी लोकांशी बोलण्यास आपल्याला उत्सुकता वाटते. त्यांचे अनुभव ऐकणं, आपले अनुभव सांगणं यात विलक्षण आनंद मिळतो.

याचा थेट फायदा म्हणजे आपला प्रवास सोपा होतो, पण सरतेशेवटी आपणास लक्षात येतं की, मित्र बनवणं इतकं पण अवघड नसतं. कदाचित रोजच्या दिनक्रमात ही बाब आपल्याला लक्षात आलेली नसते.

 

११) आपण आपल्या घराचे अधिक कौतुक कराल. 

 

home inmarathi
thrive global

 

आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हाच आपल्याला आपल्या घराचे महत्त्व लक्षात येतं. आपण सहलीला जातो तेव्हा कदाचित तिथे आपल्या घरापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध असतील. ते ठिकाण आपल्याला आवडेल पण कायम राहण्यासाठी आपण निश्चित आपल्या घराची निवड कराल.

 

१२) मनाची शांतता

 

yehjawaanihaideewani inmarathi
bookmyshow.com

 

रोजच्या जीवनात आपल्याला खूप कष्ट असतील अथवा नसतील तरी रोजचा दिनक्रम सारखा असला की कंटाळा येतोच. तेव्हा प्रवास केल्यानंतर आपण रोजच्या धकाधकीतून काही काळ तरी मुक्त होतो. यातून मनाला शांतता मिळेल.

पुन्हा एकदा नवीन दिनक्रम सुरु करण्यासाठी आपले मन उत्साहाने तयार होतं. नवीन आव्हानं पेलण्यासाठी याशिवाय अजून काय हवं..!

 

१३) स्वतःची ओळख होण्यास मदत

 

ranbir kapoor inmarathi
scroll.in

 

प्रवास करताना आपण कधीतरी अतिशय विचित्र परिस्थितीत अडकलो तर आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. यातून आपली स्वतःविषयी असणारी समज वाढते. आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नकळतपणे अधिक काळजी घ्यायला लागतो. स्वतःला ओळखायचं असेल तर प्रवासासारखा शिक्षक नाही.

तेव्हा प्रवासाचे वरील फायदे वाचून आपल्याला लक्षात आलंच असेल की, ही गुंतवणूक किती महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या. हे आनंददायी क्षण आपल्याला आयुष्यभर पुरतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?