' ED ची पीडा की अजून काही.. सोनुने आपल्या बहिणीला राजकारणात का उतरवले आहे?

ED ची पीडा की अजून काही.. सोनुने आपल्या बहिणीला राजकारणात का उतरवले आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कालच मराठीतले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले एक कार्यक्रमात म्हणले की ‘देशासाठी जे जवान शहीद होतात ते खरे देशाचे हिरो, काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी सुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. सिनेमातल्या हिरोला देव मानणाऱ्या आपल्या देशात खरे हिरो कोण हा प्रश्न कायमच पडतो

मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे अनेकांचे धाबे दणाणले, अनेकांचे रोजगार गेले, हाती काम नसल्याने सहाजिकच कामगार मंडळींनी आपल्या गावाचा रस्ता धरला, मात्र गावी तरी कसे जाणार कारण सगळी वाहतूकसुद्धा ठप्प होती, मग अशावेळी काही संस्थांनी मदत करून त्यांना आपापल्या गावी पाठवले.

 

lockdown effect inmarathi
aljazeera.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कामगारांना गावी पाठवण्यात एक व्यक्तीचे नाव सातत्याने घेतले जात होते ते म्हणजे अभिनेता सोनू सूद, हिरोचा कर्दनकाळ असलेला हा व्हिलन मागच्यावर्षीपासून हिरो ठरला आहे. त्याच्या कामांमुळे लोकांनी त्याला डोक्यावर घेतले, अनेक ठिकाणी त्याच्या नावाने पूजा अर्चा करण्यात आल्या, त्याचे पुतळे बांधले सोशल मीडियावरून देखील त्याच्या कामाचा गौरव करण्यात आला होता.

 

sonu-sood-inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

सोनुने केलेल्या या समाजकार्यामुळे साहजिकच चर्चा सुरु झाली की सोनू राजकरणात येणार, तशी बॉलीवूडच्या मंडळींची राजकारणात येण्यामागची प्रथा अनेक वर्षापासून आहे, मात्र यावेळी सोनू नव्हे तर त्यांचू बहीण राजकरणात येत आहे, काय आहे नेमकी भानगड चला तर मग जाणून घेऊयात..

सोनू सूद आज महाराष्ट्रीयन जरी झाला असला तरी तो मूळचा पंजाबी आहे, पंजाबच्या निवडणूकासुद्धा  तोंडावर असल्याने सोनू सूदने निवडणुकीत उतरायचे ठरवले, त्यासाठी सोनूने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, अगदी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी ते आम आदमीच्या केजरीवालपर्यंत…

 

Arvind_Kejriwal_InMarathi

 

लोकांना सोनू सूद रिंगणात उतरेल अशी अपेक्षा होती मात्र ऐनवेळी त्याच्या बहिणीने उडी घेतली, मालविका सूद असे तिचे नाव आहे, पेशाने ती कॉम्प्युटर इंजिनीअर असून तिचे स्वतःचे कोचिंग सेंटर आहे. ती राहत असलेल्या मोगा भागात मोठ्या प्रमाणावर समाज कार्य करते. पतीच्या बरोबरीने एक चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा चालवते. मागच्या वर्षी तिने सुद्धा अनेकांना मदत केली होती.

 

sonu sis inmarathi

 

या दोन्ही भावंडानी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या बाबत आपले विचार मांडले आहेत, पत्रकार परिषदेत सोनू सूद असं म्हणाला की, राजकरणात प्रवेश करणे हा एखाद्याच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो. कारण तेव्हा तुम्ही लोकांना दिलेल्या आश्वासनांना पूर्ण करण्यासाठी बांधील असता, त्यामुळे मी प्रथम मालविकाला प्राधान्य देतो. मोगा भागातून बहुदा ती आपली उमेदवारी लढवले कारण त्या भागाशी आमची नाळ जोडलेली आहे.

 

sonu 1 inmarathi

 

सोनुने पुढे असे म्हंटले की, मोगा भागातील लोकांसाठी आरोग्य क्षेत्रातील दोन मोठे प्रकल्प सुरु करणार आहोत, डेंग्यूचे इलाज करणे ज्यांना परवडत नाही अशा लोकांसाठी आम्ही मदत करू, प्रामुख्याने आरोग्य सेवा यावर आमचा भर कायम राहील.

राजकरणात आधीच घराणेशाही होते आणि सामान्य कार्यकर्ता मात्र कार्यकर्ताच राहतो अशी ओरड कायम केली जाते, त्यातच सेलिब्रेटी मंडळी सुद्धा राजकरणात आपले नशीब आजमावतना दिसून येतातच, त्यातच आता सोनुने आपल्या बहिणीला राजकरणात आणल्याने पंजाबच्या निवडणुकांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे, कोणत्या पक्षामधून निवडणूक लढवणार आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

rajesh inmarathi

काही दिवसांपूर्वी सोनूच्या मागे ईडीचे अधिकारी होते. आधीच सरकारमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत त्यात सोनू सूदचा देखील नंबर लागला होता. सोनू सूदच्या मागे ईडी लागल्याने खरं तर अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातच कंगनासारख्या अभिनेत्रींना पद्मश्री दिला जातो आणि सोनू सूदसारख्या लोकांना दिला जात नाही यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?