' मिस 'बमबम' २०२१: मॉडेलने १३ कोटी देऊन काढला विशेष अवयवाचा विमा

मिस ‘बमबम’ २०२१: मॉडेलने १३ कोटी देऊन काढला विशेष अवयवाचा विमा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल लोक काय करतील काही भरवसा नाही. सुंदर दिसण्यासाठी, सुंदर राहण्यासाठी लोक काहीही करतात. लाखो- करोडो रुपये शरीरावर खर्च करतात.

एका ब्राझीलियन मॉडेलनेदेखील स्वतःच्या शरीरावर असाच करोडो रुपये खर्च केला आहे, आणि थोडेथोडके नाही तर तब्बल १३ कोटी रुपये तिने खर्च केले आहेत.

जगात वेगवेगळ्या स्पर्धा होतात. मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांविषयी तुम्ही ऐकलं असेलच, पण मिस बमबम अशीदेखील एक स्पर्धा असते. आणि २०२१ साली झालेल्या या स्पर्धेत ब्राझीलच्या नथी किहारा या मॉडेलने ‘मिस बट (butt) वर्ल्ड’ हा ‘किताब जिंकला आहे. कमी वयात ती या किताबाची मानकरी ठरली आहे.

 

nathy kihara inmarathi

 

३५ वर्षीय किहाराने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स मिळवून हा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकल्यानंतर किहाराने एक वेगळाच निर्णय घेतलाय, आता तो वाचून तुम्हाला आश्चर्यच वाटेल.

लोक कारचा, घराचा विमा काढतात, पण या मॉडेलने मात्र चक्क तिच्या ‘बट’चा विमा काढलाय. आणि यासाठी तिने तब्बल १३ करोड रुपये खर्च केले. एवढे पैसे देऊन तिने तिच्या एका विशेष अवयवाचा इन्शुरन्स काढलाय.

हा विमा काढल्यानंतर ती म्हणाली, की ‘माझ्या ‘बट’मुळेच मी चर्चेत आहे. त्यासाठीच मला हा किताब मिळालाय, म्हणूनच मी त्या अवयवाचा विमा काढून ठेवतेय, पण अजूनही मी माझ्या ‘बट’च्या आकाराबद्दल समाधानी नाहीये. सध्या माझ्या बटची साईज १२६ सेंटीमीटर आहे आणि ती १३० करण्याचं माझं ध्येय आहे. त्यासाठी योग्य व्यायाम मी करणार आहे.

 

nathy kihara inmarathi1

 

नथी २ मुलांची आई आहे. तिला एक ९ वर्षाचा मुलगा आणि एक मुलगी आहे. ‘जगभरात महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना आत्मसन्मान परत मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन.’ असं नथी म्हणाली.

‘माझ्या शरीरावर मी खूप कष्ट घेते. डिलिव्हरी नंतर जिममध्ये जाऊन वजन उचलणे शक्य नव्हते, तेव्हा मी माझ्या आहाराकडे योग्य लक्ष दिलं.’ असंही तिने सांगितलं. नथीचे इंस्टाग्रामवर ५६०k फॉलोवर्स आहेत.

हे वाचून असंच वाटतं, की ऐकावे ते नवलंच….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?