' कॅन्सरवर मात केलेला मॅथ्यू वेड एकेकाळी प्लम्बिंग, सुतारकाम करायचा

कॅन्सरवर मात केलेला मॅथ्यू वेड एकेकाळी प्लम्बिंग, सुतारकाम करायचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानचा केलेल्या पराभवामुळे सध्या भारतात या संघाबद्दल खूपच आदर आणि कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘मॅथ्यू वेड’ या एका खेळाडूने गुरुवारी चित्तथरारक सामन्यात पाकिस्तानचं दुबई विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणलेलं सर्व क्रिकेटप्रेमींनी नक्कीच बघितलं असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शाहीन आफ्रिदी या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला सलग ३ षटकार लगावून विजयश्री खेचून आणणाऱ्या मॅथ्यू वेडच्या कामगिरीचं सध्या जगभरातून कौतुक होत आहे.

अटीतटीच्या सामन्यात आपल्या क्रिकेट संघाचं ‘संकटमोचन’ करणाऱ्या मॅथ्यू वेड हा सध्या इंटरनेटवर सर्वात जास्त माहिती शोधला जाणारा क्रिकेटर ठरला आहे.

 

mattew wade inmarathi

 

व्यक्तिगत आयुष्यात कॅन्सर, रंगांधळेपणा सारख्या आजारांवर मात करणाऱ्या मॅथ्यू वेडसाठी हा सामना किती महत्वाचा होता हे त्याने त्याच्या प्रदर्शनातून त्या दिवशी दाखवून दिलं.

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं भविष्य बदलणाऱ्या मॅथ्यू वेडचं क्रिकेट मध्ये येण्यापूर्वीचं आयुष्य कसं होतं? या प्रेरणादायी प्रावासाबद्दल जाणून घेऊयात.

मॅथ्यू वेड या ३३ वर्षीय क्रिकेटपटूने कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये ऑस्ट्रेलिया संघात आपला सहभाग नोंदवला आहे. १३ नंबरच्या टी-शर्ट मध्ये क्रिकेटच्या मैदानावर वावरणारा हा खेळाडू स्कॉट वेड या फुटबॉलपटूचा मुलगा आहे.

 

matthew wade inmarathi

 

मॅथ्यू वेड याने आपल्या क्रिडा कारकिर्दीची सुरुवात एक क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटू म्हणून केली होती. वयाच्या १६ व्या वर्षीच मॅथ्यू वेड ला कॅन्सरची लागण झाली होती. मॅथ्यू वेडची जिद्द आणि चिकाटी इतकी जास्त होती की, केमोथेरपीच्या दोन फेऱ्यांमध्येच त्याने कॅन्सरवर मात केली होती.

मॅथ्यू वेड ला कमी वयातच रंगांधळेपणाचा आजार सुद्धा झाला होता. २०११ मध्ये मॅथ्यू वेडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये खेळण्याची पहिली संधी प्राप्त झाली होती.

२०१३ पर्यंत मॅथ्यू वेडची जागा संघात अबाधित होती, पण अशेस सिरीज मध्ये झालेल्या पराभवानंतर त्याला संघातून डीच्चू देण्यात आला होता. ब्रॅड हॅडीन या क्रिकेटपटूने मॅथ्यू वेडची संघातील जागा घेतली होती.

संघात परत येण्यासाठी मॅथ्यू वेडला ऑगस्ट २०१५ पर्यंत वाट बघावी लागली होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये साडे तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मॅथ्यू वेडला टेस्ट क्रिकेटमध्ये स्थान मिळालं होतं.

जानेवारी २०१७ मधील पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या ५ सामन्यांच्या एक दिवसीय क्रिकेट शृंखलेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून सर्वप्रथम निवड करण्यात आली होती.

 

matthew wade inmarathi1

 

ऑगस्ट २०२१ मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या ट्वेंटी – ट्वेंटी स्पर्धेत मॅथ्यू वेडला कर्णधार म्हणून निवडण्यात आलं. बांगलादेश विरुद्ध मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे दुबईत होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकासाठी मॅथ्यू वेडकडेच कर्णधारपद सोपवण्यात आलं.

क्रिकेट संघात स्थान मिळत असतांना तर मॅथ्यू वेडचं करिअर बहरत होतं, पण जेव्हा त्याला संघात स्थान मिळत नव्हतं तेव्हा त्याने चक्क प्लंबर, सुताराचे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा हे त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सुतार म्हणून काम करत असतांना त्याचे बॉस असलेले ‘लाँगफोर्ड’ या व्यक्तीने मॅथ्यू वेडचं ‘सुतार’ म्हणून सुद्धा कौतुक केलं होतं.

मॅथ्यू वेड या क्रिकेटरला आपण २०११ मध्ये दिल्ली डेअरडेविल्स कडून आयपीएल खेळतांना सुद्धा बघितलं होतं. पण, इतर खेळाडूंना मिळतं तशी प्रसिद्धी मॅथ्यू वेडच्या वाट्याला कधीच आली नाही.

 

matthew wade inmarathi2

 

मॅथ्यू वेड सारखे लढवय्ये खेळाडू आणि व्यक्ती हे नेहमीच आपल्या खेळातून मिळणाऱ्या प्रसिद्धी, पैसे यांच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या खेळाकडे लक्ष देतात हेच त्यांच्या यशाचं गमक म्हणता येईल.

“दुबई विश्वचषकात पाठवलेल्या भारतीय क्रिकेट संघात मॅथ्यू वेड सारखा एखादा खेळाडू असला असता तर कदाचित आज भारतीय क्रिकेट संघ अंतिम सामन्यात पोहोचला असता”, असं आपण आपल्या खेळाडूंच्या पहिल्या दोन सामन्यातील कामगिरी आठवून नक्कीच म्हणू शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?