' कॉर्पोरेट जॉबच्या पगाराला तोडीस तोड पैसे शेतीतून कमावणारा तरुण! – InMarathi

कॉर्पोरेट जॉबच्या पगाराला तोडीस तोड पैसे शेतीतून कमावणारा तरुण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

३ इडियट्स आपण सगळ्यांनीच पहिला आहे, काहीजणांनी तर या सिनेमाची पारायणे केली आहेत. आयआयटीसारख्या संस्थांमधून पास होणाऱ्या मुलांना देखील नोकरीचे टेन्शन असतेच. सिनेमात शर्मन जोशीने जॉब साठी मुलाखत देताना आपल्यातल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवतो, हासीन खरतर आज प्रत्येक तरुणाईसाठी प्रेरणा देणारा आहे.

मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे अनेकांचे जॉब गेले, अनेकांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा होता, अनेकांनी मिळेल ते काम करून आपले संसार चालवले काहींनी छोटे मोठे उद्योग सुरु केले, आज हळूहळू गाडी पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.

 

lockdown inmarathi

 

मध्यंतरी  २०२० मध्ये जे विद्यार्थी पास आउट झाले आहेत ते विना परीक्षा पास झाले असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेक जोक्स येऊ लागले होते. मात्र २०२० च्याच बॅचमधून पास आउट झालेल्या एका मुलाने मात्र आपली वेगळी वाट पकडली आहे आज तो महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, कोण आहे तो मुलगा चा तर मग जाणून घेऊयात….

 

कोण आहे तो विद्यार्थी?

संदीप कनान असे त्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो तिरुपती येथे राहतो, सर्व सामान्य मुलांप्रमाणे तो ही २०२० च्या बॅचमधून पास झाला, कॉलेजमधील इतर मुलं पुढचं शिक्षण, नोकरी यामध्ये गुंतली असताना त्याने मात्र आपल्या कौटुंबिक व्यवसायात लक्ष घालायचे ठरवले.

 

sandip inmarathi

 

कोरोनाचे एकीकडे थैमान सुरु होते तर दुसरीकडे संदीपच्या मनात करियरबद्दलचे विचार थैमान घालत होते, शेतीची पार्श्ववभूमी असलेल्या संदीपने नोकरीचा पर्याय न निवडता थेट शेती करण्याचे ठरवले, शेती तर सगळेच करतात आपल्याला काय वेगळे करता येईल या उद्देशाने संदीपने पॉलिहाऊस पद्धतीने शेती करण्याचे ठरवले.

पॉलीहाऊस म्हणजे काय?

पारंपरिक शेती आपल्यापैकी अनेकजणांना ठाऊक असते, मात्र आता बदलत्या तंत्रज्ञानांमुळे शेती सुद्धा स्मार्ट पद्धतीने होऊ लागली आहे. तर पौलिहाऊस शेती म्हणजे अर्ध वर्तुळाकार अशा पॉलिथिन कापडाच्या आधारे संरक्षणात्मक असे छाया घर बनवले जाते ज्यात उच्च किंमतीची कृषी उत्पादने तयार केली जाते.

 

farm inmarathi

 

यात एक उपकरण बसवले जाते ज्याच्या आधारे तापमान आर्द्रता प्रकाश नियंत्रित केले जातात. यात कमीतकमी कीटकनाशके, रसायने वापरली जातात. मुख्य म्हणजे यात बाह्य हवामानाचा पिकांवर परिणाम होत नाही.

संदीपने याच सर्व गोष्टींचा प्राथमिक अभ्यास करून आपल्या घरच्या गच्चीवर प्रथम प्रयोग करून पहिले, ज्यात त्याने सुरवातीला पालेभाज्या लावण्यास सुरवात केली. त्यासाठी त्याने पाईप्स विकत घेतले, पाण्याच्या आधारे पिकांना पोषक द्रव्ये पुरवली. तीन महिने यात घालवल्यानंतर संदीपने पहिली कापणी केली.

संदीप चा प्रयोग सूर असतानाच त्याच्या वडिलांची रक्तातील साखर वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना ताज्या पालेभाज्या, फळे खाण्यास सुचवले, आपल्याच वडिलांना उदभवलेल्या या आजराने खरं तर संदीपला खरे तर एक प्रकराची प्रेरणा मिळाली आणि त्याने हा उद्योग वाढवणायचे ठरवले.

 

sugar-level-check-inmarathi

 

थानपल्ली येथे अर्धा एकर जमिनीवर आपल्या उद्योगाचा विस्तार करायचे ठरवले, कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे भांडवल मग ती शेती असो किंवा इतर कोणता व्यवसाय, संदीपने आपल्या आईकडून आणि भावाकडून पैसे घेऊन अर्ध्या एकर जमिनीवर हायड्रोपिनिक्स फार्म उभारले. ज्यात पालक, लाल राजगिरा, तुळस, चायनीज कोबी, ब्रोकोली अशा भाज्यांची लागवड करण्यास सुरवात केली.

तयार केलेला भाजीपाला विकायला तर हवा मात्र तिरुपती सारख्या ठिकाणच्या भाजी मंडईत आपला माल खपेल की नाही याबाबत संदीप साशंक होता म्हणून त्याने आधी कमी प्रमाणात विकायला सुरवात केली, त्याच्या मते चेन्नई, बंगळूर सारख्या ठिकाणी अशा मालाला मोठया प्रमाणावर मागणी असते. संदीपने म्हणूनच सुरवातीला बाजार, सुपर मार्केट, मग लोकांच्या वस्तीत अशा पद्धतीने विकायला सुरवात केली.

 

market InMarathi

सुरवातीला ५४००० पर्यंत संदीपने मालाची विक्री केली होती आता पुढील काही महिन्यात २ लाखा पर्यंत मालाची विक्री होईल असा त्याचा विश्वास आहे मात्र त्याचा संपूर्ण माल हा सध्या सुपरमार्केटमध्ये जात असल्याने कमिशन मोठ्या प्रमाणावर मध्यस्थी घेत आहेत. घरपोच सामान पोहचावे यासाठी तो प्रयत्त्नशील आहे.

आज जरी संदीप शेतीच्या व्यवसायात प्रगती करीत असला तरी सुरवातीला त्याला देखील अडचणींना सामोरे जावे लागले होते. सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे अशा पद्धतीची शेतीबद्दल लोक जागरूक नाहीत त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी ठरले याबाबत शंका कायम असतेच.

 

farm 2 inmarathi

 

संदीपचे वडील सुद्धा शेतकरी असल्याने आज तो शेतीत एक पाऊल पुढे टाकत आहे. आपल्याच वयोगटातील मुलांना तो संदेश देऊ इच्छितो की सरकारी नोकरीच्या मागे न लागता तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीचा विचार करायला हवा.

आज भलेभले लोक कॉर्पोरेट क्षेत्रातील भरभक्कम पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळत आहे. येत्या काही वर्षात शेतीला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी आशा आपण नक्कीच सगळे मिळून करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?