' बेटावरील या जुन्या-पुराण्या किल्ल्यात ठेवला गेलाय एकच कैदी… – InMarathi

बेटावरील या जुन्या-पुराण्या किल्ल्यात ठेवला गेलाय एकच कैदी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दीपक कांजी ही व्यक्ती तुम्हाला किंवा इतरही कुणाला फारशी माहिती असण्याचे फारसे काही कारण नाही. ही व्यक्ती काही कोणी बडी आसामी नाही की कोणी फिल्मस्टार नाही. राजकारणी तर अजिबातच नाही. पण तरीही तो एक वेगळा व्यक्ती ठरतो. कसा ते आपण पाहू.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक लहान मोठी कहाणी असते. त्यात अनेक प्रसंग, वळणे असतात. दीपक कांजी याच्याही आयुष्याची एक कहाणी आहे… पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांपेक्षा ती थोडीशी वेगळी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

‘दिव’, जे पूर्वी ‘डिओ’ नावाने प्रचलित होते, हा सध्या एक केंद्रशासित प्रदेश आहे. अरबी समुद्राच्या खंबायतच्या आखातातील एका बेटावर हे शहर वसवलेले आहे.

दीव १५३५ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले आणि १९६१ पर्यंत पोर्तुगीज वसाहत तिथे होती. भारताने बेटावर ताबा मिळवण्यापूर्वी दीव येथे घनघोर लढाई सुरू होती. १९८७ पर्यंत दीव हा गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा भाग होता.

 

portugese at diu inmarathi '

 

हा प्रदेश सोडून जाण्यापूर्वी पोर्तुगीजांनी शहराची बरीच मोडतोड केली आणि मगच ते शहर त्यांनी सोडले. आता हेच दीव शहर पर्यटन स्थल बनवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

यातच एक जुनी वास्तु आहे तेथील तुरुंगाची! आता तेथील बाकीचे कैदी इतरत्र हलवले गेले आहेत, तसेच काहींची शिक्षा संपल्याने त्यांची सुटका झाली आहे. पण तिथे एका तुरुंगात आजही एकमेव कैदी आहे ‘दीपक कांजी’! जो आपल्या पत्नीवर विषप्रयोग केल्याच्या आरोपात तेथे कारावास भोगतो आहे. त्या बंद पडलेल्या तुरुंगातील तो एकमेव कैदी आहे.

 

poison inmarathi

 

रात्रीच्या वेळी, तो त्याच्या खोलीत एकटाच झोपतो ज्याच्या आजूबाजूला नुसतेच उभे असणारे टेहळणी बुरूज आहेत. कर्मचारी कमी केले गेले आहेत, परंतु तरीही, किमान पाच तुरुंग रक्षक आणि एक सहाय्यक जेलर या सुविधा या बंदीगृहासाठी आहेत.

परिस्थितीची आव्हाने आहेत, तरीही ते शिफ्टमध्ये काम करतात आणि कैद्यासाठी चोवीस तास पहारा दिला जातो, असे तुरुंगाचे प्रभारी चंद्रहास वाजा सांगतात.

या कैद्यासाठी कोणत्याही वेगळ्या गोष्टींची व्यवस्था केली जाऊ शकत नाही कारण तो एकटाच आहे. त्याच्या जेवणासाठी किल्ल्याजवळ एका रेस्टॉरंटमध्ये खास व्यवस्था केली आहे. ASI ने या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची विनंती केल्यानंतर, तुरुंग बंद करण्याच्या प्रक्रियेला २०१३ मध्ये मंजुरी देण्यात आली होती.

प्रत्यक्षात मात्र तुरुंग बंद होण्यास वर्षभरापूर्वी सुरुवात झाली आहे. आणखी कैदी तुरुंगात न घेता, तुरुंग हळूहळू रिकामे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

 

jail inmarathi

 

आधी तिथे दोन महिलांसह सात कैदी होते, सातपैकी चौघांना गुजरातमधील अमरेली येथील तुरुंगात हलवण्यात आले; दोघांनी त्यांचा शिक्षेचा वेळ पूर्ण केला आणि त्यांना सोडण्यात आले.

आता तिथे फक्त कांजी उरला आहे. पत्नीला विष देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली डिसेंबरमध्ये दीपकला अटक करण्यात आली. त्याचा खटला किती काळ चालेल हे कोणी सांगू शकत नाही. तो दोषी आढळल्यास त्याची अमरेली येथे बदली करण्यात येईल.

दीपक कांजी असलेल्या या तुरुंगात, त्याच्या खोलीत टीव्ही, ब्लँकेट, पाण्याचा डबा आणि ५० चौरस मीटर रिकामी जागा आहे. जी साधारणपणे २० कैद्यांना पुरेशी आहे. दीवच्या हेरिटेज साइट किल्ल्यातील कारागृहात, वयाच्या तिशीत असलेला हा एकमेव कैदी आहे.

 

prisoner in jail inmarathi

 

तो अंडरट्रायल बाहेर पडल्यानंतर तुरुंग बंद होईल आणि ४७२ वर्षं जुन्या पोर्तुगीज-निर्मित किल्ल्याचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडे (ASI) परत जाईल. मित्रांनो कशी वाटली दीपक कांजीची कहाणी? आम्हाला जरूर कळवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?