' १० वर्षं उलटून गेली तरी रणबीरच्या रॉकस्टारची क्रेझ अजूनही तशीच आहे…! – InMarathi

१० वर्षं उलटून गेली तरी रणबीरच्या रॉकस्टारची क्रेझ अजूनही तशीच आहे…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तब्बल १० वर्षांपूर्वीच म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी एक सिनेमा प्रदर्शित झाला, जो बऱ्याच भारतीय प्रेक्षकांच्या अक्षरशः डोक्यावरून गेला, तो सिनेमा म्हणजे इम्तियाज अली दिग्दर्शित रॉकस्टार! खरंतर त्यावेळेस भारतीय प्रेक्षकवर्ग अशा सिनेमांसाठी अजिबात तयार नव्हता.

जनार्दन जाखड या तरुणाची प्रेमकहाणी, संगीताबद्दलची त्याची काही मतं आणि प्रेमात पडण्यासाठी त्याने केलेली धडपड इथून सिनेमा सुरू होतो तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो आणि जॉर्डन नावाच्या एका कलाकाराच्या एकटेपणाशी येऊन हा सिनेमा थांबतो.

 

rockstar inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तसं बघायला गेलं तर ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे पण कथेची हाताळणी, संगीतविश्वात क्रांती आणणारी तरुणाईला मंत्रमुग्ध करणारी गाणी, आणि सगळ्यांचे जबरदस्त परफॉर्मन्स यामुळे हा सिनेमा वेगळा ठरला, त्यावेळेस तो बऱ्याच लोकांना समजला नसला तरी त्याचं मर्म लोकांना समजलं होतं.

जसा प्रत्येक पिढीला त्यांचा सुपरस्टार मिळाला तसंच तेंव्हाच्या तरुण पिढीला या सिनेमातून त्यांचं नेतृत्व करणारा रणबीर कपूरसारखा सुपरस्टार मिळाला, आज याच रॉकस्टारविषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत!

१. खरंतर जेव्हा रणबीरच्या सावरीयाचं शूटिंग सुरू होतं तेव्हाच त्याला रॉकस्टार या प्रोजेक्टबद्दल माहिती होती, साडे तीन वर्षांनंतर इम्तियाज अली जेव्हा रणबीरकडे वेगळ्याच सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन गेला तेव्हा रणबीरने रॉकस्टारविषयी विचारणा केली तेव्हा या सिनेमाचं पुढे काहीच ठरलेलं नाही असं इम्तियाजने सांगितलं.

नंतर रणबीरने जोर लावून या सिनेमाची मागणी केल्यानंतर ३ महिन्यांनी इम्तियाजने या सिनेमाची स्क्रिप्ट तयार केली आणि रॉकस्टारला सुरुवात झाली!

२. नर्गिस फखरी हिला या सिनेमात काम करण्यापूर्वी हिंदी येतही नव्हतं, शिवाय तिला इम्तियाज आणि रणबीर यांची नावंसुदधा ठाऊक नव्हती, इतकंच काय तर तिला बॉलिवूडच्या शेहेनशाह अमिताभ बच्चन यांची साधी तोंडओळखसुद्धा नव्हती!

 

nargis fakhri inmarathi

३. सिनेमातलं रणबीरचं पात्र लोकप्रिय रॉक सिंगर, गीतकार, कवी जिम मॉरिसनपासून प्रेरित होतं ज्याला एक भारतीय टच देण्यात इम्तियाजला चांगलंच यश मिळालं!

४. एका रॉकस्टारची भूमिका असल्याकारणाने त्यासाठी खुद्द रणबीरने गिटारचं प्रशिक्षण घेतलं होतं, शिवाय गाणी या सिनेमाचा गाभा असल्याकारणाने प्रत्येक गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान रणबीर रेहमानसोबत स्टुडिओमध्ये हजर असायचा, यावरून या सिनेमासाठी त्याने किती मेहनत घेतली हे पडद्यावर दिसतं!

 

ranbir 2 inmarathi

 

५. रणबीर, इम्तियाज आणि रणबीरचा आवाज बनलेल्या मोहित चौहान या तिघांनी दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन दर्ग्याला भेट द्यायला गेले होते तेव्हा या दर्ग्याचं या सिनेमातल्या कव्वालीशी काहीतरी कनेक्शन असल्याचं त्यांना जाणवलं त्यामुळेच या सिनेमाच्या म्युझिक अल्बमचं अनावरण या दर्ग्यातच केलं गेलं!

६. जुन्या काळातल्या रॉकस्टारचंसुद्धा या सिनेमात दर्शन झालं, कपूर फॅमिलीमधला चिरतरुण अभिनेता शम्मी कपूर यांनी या सिनेमात गेस्ट अपियरन्स दिला, शम्मी कपूर यांचं पात्रच रणबीरमधल्या कलाकाराला बाहेर काढतं!

 

shammi kapoor inmarathi

 

७. इम्तियाज आणि रेहमान या जोडीने या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं, खरंतर रेहमानचं खूप वेगळ्याच धाटणीचं संगीत या सिनेमातून लोकांना अनुभवायला मिळालं, पहिले या सिनेमात ९ गाणीच होती पण नंतर ओरिजिनल अलब्म मध्ये १४ गाणी आणि ६ एक्स्ट्रा ट्रॅक ऍड झाले आणि सिनेमातल्या गाण्यांचा एक वेगळाच फॅन बेस तयार झाला जो आजही वाढतोच आहे!

 

rehman-inmarathi

 

८. रणबीरच्या रॉकस्टारमागचं जिम मॉरिसन हे हॉलिवूड कनेक्शन आपल्याला समजलंच पण अशी आणखीन २ कनेक्शन तुम्हाला या चित्रपटात सापडतील.

सद्दा हक या गाण्यासाठी रहमानने लोकप्रिय पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या टीम मधल्या Orianthi Panagaris या गीटारिस्टला घेतलं शिवाय ब्राझीलीयन मॉडेल Moufid Aziz याने या सिनेमात नर्गिसच्या नवऱ्याची भूमिका केली!

 

sadda haq inmarathi

 

भारतात dedicatedly संगीतावर आधारित फार कमी चित्रपट बनले त्यापैकी रॉकस्टार हा एक माईलस्टोन ठरला आणि लोकांची टेस्ट बदलण्यासाठी हा सिनेमा कारणीभूत ठरला.

रणबीरचं करियर या सिनेमाने घडवलं शिवाय इम्तियाजसारखा गुणी दिग्दर्शक आपल्याला दिला, अशा या रॉकस्टारला आज १० वर्षं पूर्ण झाल्याबद्दलच हा लेख खास सिनेप्रेमी आणि रॉकस्टार फॅन्ससाठी!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?