' दीपिका, सलमान आणि हे ७ जण, ज्यांनी गंभीर शारीरिक व्याधींचा सामना केलाय – InMarathi

दीपिका, सलमान आणि हे ७ जण, ज्यांनी गंभीर शारीरिक व्याधींचा सामना केलाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडच्या लखलखाटचं सामान्य लोकांना नेहमीच आकर्षण वाटतं. बॉलिवूडचा हिरो म्हणजे सिक्स पॅक, भरदार शरीरयष्टी!

 

heros inmarathi

 

आपल्या फिगर साठी नेहमीच सकस आहार घेणाऱ्या आणि जिम मध्ये घाम गाळणाऱ्या स्टार्सनी अशा काही जीवघेण्या आजारांशी सामना केला आहे याची आपल्याला कल्पना पण नाही.

१. अमिताभ बच्चन 

कित्येक दशकं रसिकांच्या मनावर गारूड असणाऱ्या शेहेनशहाचं, कुलीच्या शूटिंग दरम्यान झालेल्या जीवघेणा अपघाताच्या वेळी केलेल्या चुकीच्या रक्त संक्रमणामुळे ७५ % लिव्हर निकामी झाले आहे.

 

amitabh inmarathi

 

त्यानंतर त्यांनी अनेक मुलाखतीतून क्षयरोग आणि याबद्दल जागृती केली आहे. वेळीच निदान झाल्यास रुग्णाला यातून बाहेर येता येत हे ते स्वतःचा उदाहरणातून दाखवून देतात.

बीग बी गेली वीस वर्षे २५ % लिव्हरवर जगत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३. सोनम कपूर 

फॅशनिस्टा सोनम कपूर मधुमेहाची शिकार आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे.

 

sonam kapoor inmarathi

 

लहानपणीच तिला हा आजार जडला असल्याचे म्हटलं जातं. परंतु कठोर आहार पद्धतीमुळे तिने मधुमेहावर नियंत्रण मिळवलं आहे.

३. समंथा अक्केनी 

फॅमिली मॅन गर्ल नुकत्याच झालेल्या घटस्पोटामुळे प्रकाशझोतात आली आहे. पण समंथाने २०१२ मध्ये त्वचाविकाराला तोंड दिलं आहे.

 

samantha akkineni inmarathi

 

साधारणतः गोऱ्या त्वच्या असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होतो ज्यामध्ये सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर चेहऱ्यावर पुरळ येऊन जळजळ होते.

४. हृतिक रोशन 

हृतिक रोशन लहानपणी स्टाम्रिंग म्हणजेच तोतर बोलायचा. अनेक वर्षांच्या उपचारानंतर त्याचा हा विकार बरा झाला.

 

hritik inmarathi

 

त्यानंतर त्याला पाठीच्या स्नायूचा आजार झाला त्यावर त्याने क्षस्त्रक्रिया करून घेतली आहे.

५. रजनीकांत 

साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना २०११ मध्ये bronchitis या आजारच निदान झालं होत. त्यावेळी उपचारासाठी रजनीकांत यांना आय सी यू मध्ये दाखल करण्यात आलं होत.

 

rajnikant inmarathi

 

आताही त्यांना वारंवार या आजावार उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते.

६. दीपिका पदुकोण 

आघाडीची अभिनेत्री दीपिकाने बॉलिवूडमध्ये कमी वेळातच यशाला गवसणी घातली. असं असलं तरी तिला तिच्या आयुष्यात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.

 

dipika inmarathi

 

व्यक्तिगत आयुष्यातल्या घडामोडींमुळे तिच्या मानसिक स्वास्थ्यावर आघात झाला होता. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तिने डिप्रेशनवर मात केेली, एवढंच नाही तर अशा आजाराला सामोरं जाणाऱ्या लोकांसाठी ‘ लिव्ह, लव & लाफ ‘ संस्था स्थापन केली आहे.

७. सलमान खान 

सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच सलमान खानलासुद्धा मज्ज्यातंतूचा आजार झाला होता. या आजारात रुग्णाला चेहऱ्याच्या काही भागांत असह्य वेदना होतात.

 

salman inmarathi

 

अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर त्याला बऱ्याच प्रमाणात आराम मिळाला आहे. आजार असूनही सलमान खानने व्यायाम, सायकलिंग हे त्याचे रुटीन सुरुच ठेवले आहे.

८. भाग्यश्री 

मैने प्यार किया मधून सगळ्याच्या मनावर राज्य करणाऱ्या भाग्यश्रीला एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान उजव्या हाताला दुखापत झाली होती.

 

bhagyshree inmarathi

 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया न करता तिने घरीच उपचार घेऊन ती यातून बाहेर आली.

९. शाहरुख खान 

बॉलिवूडचा किंग खान खांद्याच्या दुखापतीनंतर डिप्रेशन मध्ये गेला होता.

 

shah rukh khan inmarathi

 

त्याने एका मुलाखती मध्ये म्हटलं आहे, ” खांद्याच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे मी नैराश्याने ग्रासलो होतो परंतु आता यातून मी बाहेर आलो आहे.”

नेहमीच फिट अँड फाइन दिसणारी बॉलिवूड मंडळी अनेक गंभीर आजारांना तोंड देत असतात. शेवटी ‘ आरोग्यं धनसंपदा’ हेच खंर….

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?