' बोर्नविटा, कॉम्प्लॅनला पर्याय हवाय? मग घरच्या घरीच दूध बनवा ‘टेस्टी’…. – InMarathi

बोर्नविटा, कॉम्प्लॅनला पर्याय हवाय? मग घरच्या घरीच दूध बनवा ‘टेस्टी’….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहान मुलांनी दूध पिणं, हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे हे आपल्याला ठाऊक असतं. लहान मुलांनी आवडीने दूध प्यावं यासाठी पालक नेहमीच वेगवेगळे उपाय करत असतात.

अशावेळी मग वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा त्यांची चलाखी वापरतात, आणि स्वतःचं उत्तम ब्रॅण्डिंग करतात. बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन, हॉर्लिक्स असे पर्याय मग आई आपल्या मुलांसाठी निवडते. कधी वाढता खर्च, कधी आरोग्यासाठी हे पदार्थ चांगले नसणं, अशा काही ना काही कारणांमुळे हे पर्याय नको असं पालकांना वाटतं.

 

bournvita inmarathi

 

याचसाठी घरच्या घरी करता येतील असे काही पर्याय आहेत बरं का मंडळी… काही वर्षानुवर्षे चालत आलेले तर काही नव्याने अस्तित्वात आलेले. असेच काही पर्याय आज आपण बघुयात. घरच्या घरी दूध टेस्टी करण्यासाठी हे पर्याय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. खारीक पावडर

खारीक म्हणजे आरोग्यासाठी सर्वोत्तम पदार्थ आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. रोज सकाळी प्यायचं आहे, ते दूध चविष्ट करायचं असेल, तर खारीक पावडर हा झकास पर्याय आहे.

घरात खारकांची पावडर तयारच ठेवा. सकाळच्या कपभर दुधात २-३ चमचे खारीक पावडर आणि चवीपुरती साखर घाला आणि दुधाचा आस्वाद घ्या…

 

kharik powder inmarathi

 

२. बनाना मिल्क

केळं हादेखील आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचं पदार्थ आहे. केळं आणि दूध यांच्यापासून बनवली जाणारी शिकरण ही तर तुमच्यापैकी अनेकांना आवडत असेल. पण बनाना मिल्क हादेखील एक उत्तम पर्याय ठरतो.

एक केळं, कपभर दूध, साखर आणि अधिक चव हवी असेल तर वॅनिला पावडर या पदार्थांचा वापर करून बनाना मिल्क तयार करता येईल.

या सगळ्या पदार्थांचे मिश्रण करून ते मिक्सरमधून फिरवून घ्या. घट्ट, पौष्टीक आणि चविष्ट असं दूध मुलांसाठी तयार झालेलं असेल.

 

banana milk inmarathi

 

३. कॅरॅमल मिल्क

कॅरॅमल फक्त चॉकलेटसोबतच छान लागतं असं नाहीये बरं का मंडळी… दुधासोबत सुद्धा हे कॅरॅमल खूपच छान वाटतं.

 

caramel inmarathi

 

ज्या प्रमाणात दूध घेतलं असेल, त्याच्या साधारण पाव भाग कॅरॅमल सिरप घ्या आणि ते दुधात मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. कॅरॅमल गोड असल्यामुळे, यात साखर घालण्याची सुद्धा गरज पडणार नाही. एक अत्यंत सोपा आणि चविष्ट पर्याय सकाळी मुलांना देता येईल.

४. दूध आणि मध

कॅरॅमल प्रमाणेच मध हादेखील दुधाचा उत्तम साथीदार आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी सुद्धा मधाचा खूप फायदा होतो. मग दूध आणि मध एकत्र आले, तर ते आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतीलच, नाही का!

साधारण कपभर दुधात २ चमचे मध घालून ते मिश्रण नीट ढवळून घ्या. म्हणजे झालं तुमचं दूध तयार! कॅरॅमल घातल्यावरही दुधाला साखरेची गरज नसते, मग मधासोबत गरज लागणार नाही, हे वेगळं सांगायला नकोच…

 

honey and milk inmarathi

 

रात्रीच्या वेळी असं दूध प्यायल्याने झोपण्याच्या समस्या सुद्धा दूर होतात, असंही काही डॉक्टरांचं मत असतं.

५. बदाम मिल्क

बाहेर जो बदाम शेक अगदी आवडीने चवीने खाता, तोच घरच्या घरी बनवणं सोपं आहे नाही का! हो म्हणजे, तितका घट्ट आणि थंड नसला, तरी बोर्नव्हिटासारख्या उत्पादनांचा पर्याय म्हणून नक्कीच वापरता येऊ शकतो.

यासाठी भिजवून ठेवलेले बदाम वापरावे लागतील. म्हणजे थोडे कष्ट घ्यावे लागतील बरं का मंडळी… कपभर दुधासाठी पाव कप बदाम हे प्रमाण बदामाचं दूध बनवण्यासाठी उत्तम आहे. हे मिश्रण एकत्र करून एकदा मिक्सरमधून फिरवलं, की बदाम मिल्क तयार!

 

soaked almond inmarathi

 

६. रोज मिल्क

रंग आणि चव या दोन्हीमध्ये उत्तम असणारं रोज मिल्क म्हणजे अनेकांसाठी स्वर्गसुख असेल. गुलाब म्हणजे प्रेमापासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणारं फुल आहे, असं म्हटलं तरी ते चूक ठरू नये.

अर्धा लिटर दुधात ३-४ चमचे रोज सिरप घालून त्यांचं व्यवस्थित मिश्रण करून घेतलं, म्हणजे झालं रोज मिल्क तयार…

 

rose milk inmarathi

 

रोज सिरपचा पर्याय सुद्धा नको असेल, तर गुलकंद हा सुद्धा एक उत्तम पर्याय ठरतो. कपभर दुधात चमचाभर गुलकंद घाला आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा. चविष्ट, आरोग्यदायी असं प्येय काही मिनिटांतच तयार होईल.

७. चॉकलेट आणि पीनट बटर मिल्क

लहानग्यांना त्याच त्याच चॉकलेटवाल्या दुधाचा कंटाळा आला असेल, तर हा पर्याय सुद्धा चांगला आहे. आरोग्यासाठी फायदेशीर नसलं, तरी चवबदल म्हणून हा पर्याय पडताळून पाहायला नक्कीच हरकत नाही.

ग्लासभर दूध, त्यात २ चमचे चॉकलेट सिरप आणि याच मिश्रणात एक चमचाभर पीनट बटर असं सगळं एकत्र केलं की ते एकदा मिक्सरमधून फिरवून एकत्र करून घ्या.

याच मिश्रणात थोडंसं केळं घालून उत्तम त्याचं उत्तम मिश्रण करून घेतलं, तर चॉकलेट-बनाना स्मूदी म्हणूनही हे प्येय पिता येईल.

 

chocolate and peanut butter smoothies inmarathi

 

मग हे टेस्टी पर्याय ट्राय करून बघणार ना? तुम्हाला यातलं काय काय आवडलं हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?