'या 'रहस्यमयी' पुलावरून कुत्रे सरळ उडी घेऊन स्वतःला संपवतात!

या ‘रहस्यमयी’ पुलावरून कुत्रे सरळ उडी घेऊन स्वतःला संपवतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगात इतक्या विचित्र गोष्टी घडतात की त्यांवर थेट विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते पण त्या खरोखर घडत असतात. याच विचित्र गोष्टींमधून जन्म होतो रहस्यांचा.

 

mysterious place inmarati

 

आत्महत्या हि त्यातली एक अत्यंत गूढ आणि रहस्यमय गोष्ट आहे, कारण जेंव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेंव्हा तिचं आत्महत्या करण्यामागचं कारण सुद्धा तिच्यासोबतच नाहीसं होतं!

शिवाय या जगात तर कित्येक ठिकाण हि स्युसाईड स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहेत, जिथे माणसं हि आत्महत्या करण्यासाठीच जातात! पोलिसांनी तसेच सुरक्षा व्यवस्थांनी यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण तरीही आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही!

आज आम्ही तुम्हाला अश्याच एका रहस्यमय गोष्टीबद्दल माहिती देणार आहोत.

 

suicide inmarathi

 

तुम्हाला भारतातील जतिंगा गावाबद्दल माहित असेलच, जेथे पक्षी अचानक आत्महत्या करण्यास सुरुवात करतात, नसेल माहित तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे- भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!

आपल्या देशात श्वानप्रेमींची संख्या काही कमी नाही, कुत्रे मांजरी ससे पाळणे हे काय नवीन नाही, शिवाय आपण तर त्या प्राण्यांना खूप जीव लावतो! शिवाय या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी किंवा संवर्धनासाठी कित्येक संस्था तसेच एनजीओ कार्यरत असतात!

पण जर तुम्हाला असं सांगितल कि विदेशात एक असा पूल आहे जिथे कुत्र्यांना नेण्यास सक्त मनाई आहे कारण त्या पुलावरून कुत्रे आत्महत्या करतात, यावर तुमचा विश्वास बसेल का?

होय तर तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे, असाच काहीसा प्रकार घडतो, विदेशामध्ये, फक्त येथे पक्षी नाही तर कुत्रे आत्महत्या करतात, हाच काय तो फरक!

 

dog bridge inmarathi

 

स्कॉटलंडच्या डांबार्टन जवळ एक गाव आहे मिल्टन. येथे एक पूल आहे जो कुत्र्यांना आत्महत्या करण्यासाठी आपल्याकडे आकर्षित करतो.

६० च्या दशकापासून आतापर्यंत ह्या पुलावरून उडी मारून जवळपास ६०० कुत्र्यांनी आत्महत्या केली आहे. १८५९ मध्ये बनवल्या गेलेल्या ह्या पुलाचे नाव ओवरटॉन पुल आहे. १९५० ते १९६० च्या दशकामध्ये याला पहिल्यांदा कुत्र्यांच्या आत्महत्या होतात हे लक्षात आले.

 

dog-suscide-marathipizza01
youtube.com

 

ह्या पुलावरून कुत्रे कोणत्याही कारणाशिवाय अचानक उडी मारतात आणि ५० फूट उंचावरून पडून त्यांचा मृत्यू होतो.

काही प्रकरणांमध्ये जर उडी मारून जर एखादा कुत्रा जिवंत राहिलाच तरी तो पुन्हा पुलावरून उडी मारून आत्महत्या करत असे. सारख्या होणाऱ्या आत्महत्या बघून ह्या पुलावर चेतावनी देणारा बोर्ड लावण्यात आला होता.

 

dog-suscide-marathipizza03

 

विचित्र गोष्ट तर ही आहे की, जेवढया पण कुत्र्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या सगळ्या रहस्यमयी होत्या,ह्या सर्व आत्महत्या ओवरटॉन पुलाच्या एकाच बाजूने केल्या गेल्या होत्या,आणि खास  करून एकाच जागेवरून केल्या गेल्या होत्या.

त्यामुळे या दगडी पुलामध्ये नक्की काय रहस्य आहे, जे या कुत्र्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, त्याचा शोध आजही सुरु आहे.

dog-suscide-marathipizza04
lostateminor.com

 

काही लोकांचे म्हणणे आहे कि, या पुलावर वाईट शक्तीचे सावट आहे. १९९४ मध्ये एका माणसाने आपल्या मुलाला ओवरटॉन पुलावरून खाली फेकून दिले होते आणि सांगितले की तो मुलगा अँटी क्राईस्ट आहे.

नंतर काही महिन्यांनी त्या माणसाने ही त्याच पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

 

dog-suscide-marathipizza05

 

आणखी एका दाव्यानुसार, ओवरटॉन पूल अश्या जागेवर आहे, जिथे जिवंत आणि मृत व्यक्तींचे जग एकत्र येते आणि असे मानले जाते की, माणसाला न दिसणाऱ्या गोष्टी कुत्र्यांना चांगल्याप्रकारे जाणवतात.

या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन या पुलावर बोर्ड लावून आपल्या कुत्र्यांना सांभाळून सावधानी बाळगून ठेवण्यास सांगितले आहे.

 

dog family inmarathi

 

 

पण तरीही आज सुद्धा हा पूल रहस्यमयीच वाटतो, कित्येकांनी यामागचं कारण शोधून काढायचा प्रयत्न केला पण याचं नेमकं कारण अद्यापही कुणाला सांगता आलेलं नाही!

तर अशाच आणखीन काही रहस्यमयी जागांबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर त्या जागा आणि त्यांचे संदर्भ नक्की कमेंट करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?