' बायोप्लास्टीकपासून "सोयाबीन कार"ची निर्मिती करणारे 'फोर्ड'!

बायोप्लास्टीकपासून “सोयाबीन कार”ची निर्मिती करणारे ‘फोर्ड’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कार निर्मिती क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे फोर्ड! या फोर्ड कंपनीचे सर्वेसर्वा म्हणजे हेनरी फोर्ड. त्यांनी कार निर्मिती क्षेत्रात त्यांच्या कार्याने क्रांती आणली. लोकांच्या पसंतीस पडतील अशी अनेक मॉडेल्स त्यांनी तयार केली. कायम नावीन्यपूर्व गोष्टी देण्याकडे त्यांचा कल होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सध्या गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यावर बरीच चर्चा होत आहे ते होणे गरजेचे सुद्धा आहे. आता इंधनावर चालणारी आणि कार्बन डाय ऑक्साइडचं उत्सर्जन करणारी वाहनं, पृथ्वीचं तापमान वाढवण्याबरोबरच हवामान बदलासाठीही जबाबदार असल्याचं मानलं जात आहे.

 

global warming inmarathi

 

पर्यावरण रक्षक हेनरी

ज्या व्यक्तीमुळं कारचं हे एवढं मोठं विश्व निर्माण झालं ते हेनरी फोर्ड हे पर्यावरणाचा देखील विचार करत होते, हे फार कमी लोकांना माहिती असेल. १९३० च्या दशकात फोर्ड हे बायोप्लास्टिकचं उत्पादन आणि वापर करणाऱ्या सुरुवातीच्या काही लोकांपैकी एक होते.

बायोप्लास्टिक एक प्रकारचं प्लॅस्टिक असतं. ते झाड आणि हायड्रोकार्बनपासून तयार होतं तसंच ते पूर्णपणे विघटन होणारं असतं. फोर्ड यांनी बायोप्लास्टिकची निर्मिती तर केलीच, मात्र त्यापासून कार निर्मिती करणारे ते इतिहासातील पहिले व्यक्तीही ठरले. या कारला ‘सोयाबीन कार’ किंवा ‘सोयाबीन ऑटो’ असं नाव देण्यात आलं होतं.

 

soya bean car inmarathi

 

सोयाबीन कार

“सोयाबीन कार” ही खरं तर हेन्री फोर्ड यांनी १३ ऑगस्ट १९४१ रोजी विकसित केलेली प्लास्टिक-बॉडी असलेली कार आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ १९४१ च्या संग्रहानुसार कारची बॉडी सोयाबीनपासून बनवलेल्या मजबूत सामग्रीपासून बनवली गेली होती, ज्यात गहू आणि कॉर्नचा वापर केला होता.

 

wheat and corn inmarathi

 

हे प्लॅस्टिक स्टीलपेक्षा दहापट मजबूत असल्याचा फोर्ड यांचा दावा होता. त्यांना एवढा विश्वास होता, की त्यांनी एका कुऱ्हाडीनं प्रत्येक मटेरियलच्या पॅनलवर मारलं होतं तेव्हा केवळ धातूच्या पॅनलवर खड्डे झाल्याचं आढळून आलं होतं.

कशापासून तयार झाली?

ट्यूबलर स्टीलपासून बनलेल्या फ्रेमला १४ प्लास्टिक पॅनल्स जोडलेले होते. कारचं वजन २००० पाउंड्स होतं. या प्लॅस्टिक पॅनेलसाठी नेमके कोणते घटक वापरले गेले होते, हे कोणालाही माहिती नाही कारण या फॉर्म्युलाची कोणतीही नोंद अस्तित्वात नाही.

असा दावा करण्यात येतो, की यामध्ये सोयाबीन, गहू, भांग, अंबाडी आणि रामी यांचा समावेश होतो; या कारच्या निर्मितीमागील व्यक्ती, लॉवेल ई ओव्हरली यांनी असा दावा केला आहे, की गर्भधारणेमध्ये वापरल्या जाणार्‍या फॉर्मल्डिहाइडसह फेनोलिक रेझिनमधील सोयाबीन फायबरचा यात वापर केला गेला होता.

 

soya bean car inmarathi

योग्य व्यक्तीची निवड

हेनरी फोर्डने प्रथम स्टाइलिंग विभागाचे ई.टी. बॉब यांना या प्रकल्पासाठी निवडलं, परंतु त्यांच्या कामाने फोर्ड समाधानी नव्हते. त्यानंतर त्यांनी हा प्रकल्प ग्रीनफिल्ड व्हिलेजमधील सोयाबीन प्रयोगशाळेत आणि लोवेल ई. ओव्हरली यांच्याकडे सुपूर्त केला. पर्यवेक्षक रॉबर्ट ए. बॉयर, जे स्वतः केमिस्ट होते, त्यांनी लोवेल यांना मदत केली.

ही कार १९४१ मध्ये डिअरबॉर्न डेज येथे प्रदर्शित करण्यात आली होती. त्याच वर्षाच्या उत्तरार्धात ती मिशिगन स्टेट फेअर ग्राउंड्सवर देखील प्रदर्शित करण्यात आली होती. अनेक लोक आजही फोर्डच्या १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला ऑटोमोबाईलसाठी प्लास्टिकचे भाग बनवण्याच्या प्रयोगांबद्दल विचारतात. या प्रयोगांमुळे ‘सोयाबीनपासून बनवलेली प्लास्टिक कार’ असं वर्णन केलं जातं.

 

soya bean plastic car inmarathi

 

कार तयार करण्यामागील कारण

हेन्री फोर्डला ही कार का बनवायची होती याची अनेक कारणं होती. यातील तीन कारणं फारच महत्त्वाची ठरतात. पहिले म्हणजे, तो अशा प्रकल्पाच्या शोधात होता ज्यात शेती आमो उद्योग एकत्र काम करतील. दुसरी गोष्ट अशी, की त्यांनी असाही दावा केला होता की प्लास्टिकच्या पॅनल्सने कार पारंपारिक स्टील कारपेक्षा जास्त सुरक्षित आहे.

तिसरे आणि सर्वाधिक महत्त्वाचे कारण हे, की त्यावेळी धातूचा तुटवडा होता. हेनरीला आशा होती की त्याची नवीन प्लास्टिक सामग्री कारमध्ये वापरल्या जाणार्‍या पारंपरिक धातूंची जागा घेईल.

ही कार बाजारात का येऊ शकली नाही?

प्रत्यक्षात त्यांची सोयाबीन कार कधीही बाजारात येऊच शकली नाही. जी एक कार तयार करण्यात आली होती, तीही नष्ट करण्यात आली आणि तशी दुसरी कारही नव्हती. त्यामुळे फोर्ड यांनी हा ग्रीन प्रोजेक्ट का बंद केला आणि तो यशस्वी का झाला नाही? असा प्रश्न कायमच उपस्थित होतो.

 

henry ford inmarathi

 

प्रकल्प बंद पाडण्यामागचे कारण

अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात घेतलेला सहभाग हे हा प्रोजेक्ट थांबण्यामागील महत्वाचं कारण आहे. त्या काळात अमेरिकेत कारच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. बेन्सन फोर्ड रिसर्च सेंटरच्या मते युद्धानंतर प्लास्टिकद्वारे कार तयार करण्याचा विचार मागे पडला. कारण युद्धानंतर देशाला सावरणं आणि पुनर्विकास करण्यावर भर देण्यात आला.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?