' फडणवीसांवर अंडरवर्ल्ड संबंधाचा आरोप ज्याच्यामुळे होतोय तो रियाज भाटी आहे तरी कोण? – InMarathi

फडणवीसांवर अंडरवर्ल्ड संबंधाचा आरोप ज्याच्यामुळे होतोय तो रियाज भाटी आहे तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन यावर आपण असंख्य गोष्टी ऐकत आलो आहोत. रामूने तर आपल्या वास्तवादी सिनेमातून हे कनेक्शन ठळकपणे दाखवले आहे. जसे बॉलीवूडचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन आपण ऐकून आहोत तसे आपल्या नेतेमंडळींचे कनेक्शनसुद्धा असते.

 

bollywood underworld inmarathi

 

कधीकधी तर गुन्हेगारच पांढरी टोपी परिधान करून संसदेत जात असतात. सामान्य जनता त्यांना निवडून देत असते. नेतेमंडळीसुद्धा आपापल्या फायद्यांसाठी या मंडळींचा वापर करून घेत असतात.

 

 

आज आपल्याकडे कोणतीही राजकीय घटना घडली तरी तिचा अंडरवर्ल्डशी संबंध येतोच, नुकतेच नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असे जाहीर केले की माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे रियाज भाटीशी संबंध होते, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा ‘रियाज भाटी’ कोण? तेच आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात…

 

devendra inmarathi

मागच्या वर्षी सुशांत सिंग प्रकरणामुळे बॉलीवूडमधील काळेधंदे उघडकीस येऊ लागले, आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोक त्रस्त झालेले त्यात या प्रकरणाला रोज नवे वळण लागत असल्याने लोकांना देखील रोज धक्के मिळत आहे. सध्या आर्यन खान प्रकरण गाजतंय.

आर्यन खान प्रकरणात सर्वात जास्त चर्चा झाली ती समीर वानखेडेंची. त्यांच्या एकूणच वैयक्तिक आयुष्याबद्दल समाजमाध्यमात उलटसुलट बोलले जात होते. समीर वानखेडेंना टार्गेट करणारे नेते होते ते म्हणजे नवाब मलिक.

 

nawab malik inmarathi2

 

समीर वानखेडेंवरून त्यांनी आपला मोर्चा देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे वळवला आहे. दिवाळीच्या आधी या दोघांनी जाहीर केले होते की आता दिवाळी नंतर धमाका बघायला मिळेल. त्याप्रमाणे दोघांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.

कोण आहे रियाज भाटी?

रियाज भाटी हा कुख्यात गुंड असून त्यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे बोलले जात आहे. त्याच्यावर जमीन हडपणे, खंडणी, फसवणूक बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे नावावर आहेत.

वरकरणी तो बांधकाम व्यवसायिक असल्याचे भासवत असला तरी डी कंपनीशी त्याचे लागेबांधे असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गुन्हेगार, टोळीचे म्होरके, शार्प शुटर यांना प्रख्यात बिल्डर्सबाबत इत्थंभुत माहिती देण्याचे काम रियाज करत होता. त्याच्या मध्यस्तीमुळे अनेक नामांकित बिर्ल्ड्सना लुबाडणे डी कंपनीला शक्य होत होते.

 

bhati inmarathi

 

२०१५ साली बनावट पासपोर्टप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. कोर्टाचे आदेश धुडकावत, पोलिसांना चकवण्यासाठी त्याने पलायनाकरिता बनावट पासपोर्ट बनवले. त्याचवेळी जयपूरमध्ये तो नाव, वेष बदलून रहात असल्याची पोलिसांना खबर लागताच सापळा रचत त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते.

वाझे प्रकरणातील सहआरोपी

परमबीर सिंग आणि वाजे प्रकरणातील तो सहआरोपी होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वाझेंच्या सांगण्यानुसार रियाज बडे हॉटेलव्यवसायिक, बार चालक यांच्याकडून खंडणी वसूल करत होता. हा पैसा वाझे आणि रियाज यांच्यात वाटण्यात येत असे.

या प्रकरणात रियाजला अंतरिम जामीन मिळाला असला तरी तो सप्टेंबरमध्ये रद्द करण्यात आला. मात्र दरम्यान चलाख रियाजने पळ काढला असून सध्या तो फरार आहे.

 

riyaz inmarathi

 

आजच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक असे म्हणले की ”देवेंद्र फडणवीस यांचे रियाज भाटीशी संबंध आहेत जो दाऊदचा माणूस आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी फडणवीसांचे वैयक्तिक हितसंबंध असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी आरोप करताच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमानातून रियाज भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो शेअर केले.

 

nitesh inmarathi
News update

 

आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागले आहेत. आर्यन खानला बेल तर मिळाला मात्र हे प्रकरण तिथं न थांबता आता सत्त्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यावरून आमनेसामने आले आहेत. येत्या काही दिवसात अजून काही वेगळं वळण या प्रकरणाला मिळतंय का ते बघुयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?