' तालिबान राजवट: अफगाणिस्तानात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा दर झालाय दुप्पट… – InMarathi

तालिबान राजवट: अफगाणिस्तानात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा दर झालाय दुप्पट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऑगस्ट महिन्यात भारत स्वातंत्र्यदिवस साजरा करत असताना, अफगाणिस्तान मात्र तालिबानच्या ताब्यात गेला. पुढच्या काही दिवसांतच तिथल्या नेत्यांनी सुद्धा देशाबाहेर पलायन केलं आणि खऱ्या अर्थाने तालिबानी राजवटीची सुरुवात झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याचा अफगाणिस्तानातच नव्हे, तर जगभरातील अनेक ठिकाणी विविध पद्धतीने परिणाम झालाय, हेदेखील आपण पाहतोय. जगभरात होणारा परिणाम कितपत भेदक ठरेल ते येत्या काळात नक्कीच कळेल, पण सध्या अफगाणिस्तानात काही गोष्टींवर थेट परिणाम झाल्याचं दिसून येतंय. यातीलच एक गोष्ट म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग!

तालिबान राजवटीत ह्युमन ट्रॅफिकिंगचा दर चक्क दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. पण हे नेमकं का घडतंय, यामागे काय कारणं आहेत हे आज जाणून घेऊया.

 

human trafficking inmarathi

अफगाणी लोक अजूनही देश सोडण्याच्या प्रयत्नात

तालिबानी लोकांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांना सुरक्षेची चिंता लागून राहिलेली आहे, हे आजही दिसून येतंय. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी देशाबाहेर जाणं हाच एक पर्याय असल्याचं त्यांना वाटत असावं, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

गाड्यांमध्ये बसून मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न अफगाणिस्तानातील कुटुंबाच्या कुटुंबं करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी ह्युमन ट्रॅफिकिंग करणारी मंडळी पुढे आल्याचं पाहायला मिळतंय. लोकांची तस्करी करून त्यांना देशाबाहेर जायला मदत केली जातेय.

 

human trafficking inmarathi

 

असा सोडतायत देश

पाकिस्तान आणि इराण यांच्या सीमेवर असलेलं झारंज हे गाव, अफगाणिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याचं महत्त्वाचं ठिकाण झालं आहे. पाकिस्तानातील वाळवंटामार्गे अफगाणिस्तानातील लोकांना बाहेर काढायचं आणि इराणपर्यंत नेऊन पोचवायचं, हे काम तिथले तस्कर करत आहेत.

बीबीसीने अफगाणिस्तानमधील या तस्करांशी संपर्क साधला, त्यावेळी ही माहिती मिळाल्याचं म्हटलं आहे. बीबीसीशी बोलताना तस्करांनी ह्युमन ट्रॅफिकिंगचा दर चक्क दुप्पट झाल्याचं सांगितलं आहे.

 

human trafficker inmarathi

तालिबान सुद्धा घेतंय पैसे

देश तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. एकूणच देशाची स्थिती फारच बिकट आहे. तालिबान सरकारवर कुणालाही फारसा विश्वास नसल्याने, लवकरात लवकर देश सोडण्याच्या प्रयत्नात अनेकजण आहेत. परिणामी मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांचं फावलं आहे.

अर्थात अफगाणी नागरिकांना व्हिसाशिवाय देशाबाहेर घेऊन जाणारे हे तस्कर, त्यासाठी चांगलीच किंमत वसूल करत आहेत. झारंज गावातील हे कारभार खेलुआं सुरु आहेत, कारण त्यांना तालिबानचा पाठिंबा आहे.

या पाठिंब्यामागचं कारण अगदी साधं, सरळ आणि स्पष्ट आहे. प्रत्येक गाडी देशाबाहेर जात असताना, त्यासाठी तालिबानला मिळणार पैसा!

 

talibani inmarathi

 

तालिबान सरकार आल्यापासून परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ काहीसा मंदावला आहे, किंवा बंद झाला आहे. देशाची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे सगळीकडे अनागोंदी माजली आहे. अशातच, तस्करांकडून बाहेर घेऊन जाण्यात येणाऱ्या प्रत्येक ट्रकमागे तालिबानला १० ते १२ डॉलर इतकी रक्कम मिळत असल्याचं उघड झालं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावर राजधानी काबूलच्या विमानतळावर असलेली गर्दी, तिथली दयनीय अवस्था सगळ्यांनीच पाहिली आहे. आता तर थेट तालिबान सरकारच्या पाठिंब्यानेच माणसांची तस्करी सुरु आहे. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजेच मानवी तस्करीचा वेग दुप्पट झाला असला, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही, असंच म्हणायला हवं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?