' व्हीलनच्या रोलमधून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणाऱ्या आशुतोष राणाचा पडद्यामागील प्रवास! – InMarathi

व्हीलनच्या रोलमधून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणाऱ्या आशुतोष राणाचा पडद्यामागील प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांच्याविषयी प्रत्येकालाच आदर आहे. बड्या स्टार्सपैकी अमिताभ बच्चन सोडले तर अगदी हातावर मोजण्याएवढेच कलाकार आहेत ज्यांना आपण परिपूर्ण अभिनेता म्हणून संबोधू शकतो.

त्यापैकीच एक नाव म्हणजे आशुतोष राणा. नाव ऐकून तुम्हीसुद्धा चाट पडला असाल, मोठ्या पडद्यावर कायमच नकारात्मक भूमिका साकारणारे आशुतोष राणा हे खऱ्या आयुष्यात खूपच मितभाषी, ज्ञानी आणि संयमी आहेत.

 

ashutosh rana inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोणत्याही गॉडफादरचा हात डोक्यावर नसतानाही आशुतोष यांनी काळविश्वात त्यांचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे आणि यामुळेच ढीगभर खलनायकाच्या भूमिका करूनसुद्धा त्यांनी त्याचा परिणाम स्वतःच्या खासगी आयुष्यावर कधीच होऊ दिला नाही.

आज आशुतोष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाविषयी आणि त्यांच्या लव्हस्टोरीविषयी या लेखातून जाणून घेऊया!

आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या आशुतोष राणा यांचा जन्म मध्यप्रदेशमधील गाडरवाडा येथे झाला, खरंतर त्यांना पुढे शिक्षण घेऊन वकील व्हायचं होतं पण आपल्या आजोबांच्या सांगण्यावरुन त्यांनी काळविश्वात यायचं ठरवलं.

गावात होणाऱ्या रामलीलांमध्ये आशुतोष नेहमीच रावणाची भूमिका करायचे आणि ते बघूनच त्यांच्या आजी आजोबांना याने अभिनय क्षेत्रात नाव कमवावं असं वाटायचं.

 

ashutosh rana childhood inmarathi

 

नंतर आशुतोष यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मधून रीतसर अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि नशीब आजमावण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. स्वाभिमान मालिकेपासून आशुतोष यांच्या करियरला सुरुवात झाली खरी, पण १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दुश्मन’ या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.

या चित्रपटासाठी आशुतोष यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला. फक्त हिंदीच नव्हे तर तामीळ तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी अशा वेगवेगळ्या भाषेतल्या सिनेमातूनसुद्धा आशुतोषनी त्यांचा ठसा उमटवला आहे.

स्वाभिमान या मालिकेचं दिग्दर्शन महेश भट करत होते आणि यामध्ये काम मिळवण्यासाठी आशुतोष बरेच प्रयत्न करत होते. जेव्हा आशुतोष प्रथम महेश भट यांना भेटले तेव्हा त्यांनी महेश भट यांना वाकून पायाला स्पर्श करून नमस्कार केला.

mahesh bhatt inmarathi

 

महेश भट यांना कुणीच त्यांच्या पाया पडलेलं आवडत नसल्याने त्यांनी त्यांच्या गार्डसना बोलवून आशुतोष यांना सेटवरुन हाकलवून दिलं. नंतर महेश भटनी आशुतोष यांना याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की “हे माझे संस्कार आहेत आणि मी ते विसरू शकत नाही!” नंतर याच मालिकेत महेश भट यांनी आशुतोष यांना खलनायकाची भूमिका दिली.

हैद्राबादमध्ये जेव्हा आशुतोष जानवर सिनेमाचं शुटींग करत होते तेव्हा त्यांना महेश भटचा फोन आला आणि त्यांनी आशुतोष यांना संघर्ष सिनेमाबद्दल सांगितलं आणि महेश भट म्हणाले की “या सिनेमात एक व्हिलनची भूमिका आहे आणि अशी भूमिका आजवर झालेली नाहीये, पण मी ती तुला देणार नाही!”

महेश भट यांचे हे शब्द ऐकून आशुतोष चक्रावले आणि त्याने तडख मुंबई गाठली, जिथे महेश भट एका सिनेमाचं शुटींग करत होते आणि तिथे जाऊन आशुतोष त्यांना म्हणाले की “तुम्ही एकतर असं म्हणा की मी एक खराब अभिनेता आहे किंवा मला ऑडिशन द्यायची संधी द्या, मी जर त्यात फेल झालो तर मी स्वतः या भूमिकेपासून लांब राहीन.”

आशुतोष यांच्या म्हणण्यावर महेश भट हसले आणि म्हणाले की “खरंतर मी बरेच दिवसांनी तुला भेटलो नव्हतो आणि तुला तातडीने भेटणं गरजेचं होतं म्हणून मी फोनवर तुझ्याशी असं बोललो, खरंतर या भूमिकेसाठी महेश यांनी आशुतोषलाच घ्यायचं ठरवलं होतं कारण ही भूमिका त्यांच्याशिवाय आणखीन कुणीच उत्तम साकारू शकणार नाही अशी त्यांना खात्री होती.

 

sangharsh inmarathi

 

झालंही तसंच संघर्ष सिनेमा हा बॉलिवूडमधला एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा ठरला आणि लज्जाशंकर पांडे बघताना लोकांच्या काळजाचा अगदी थरकाप उडाला.

बॉलिवूडचा हा व्हिलन एका फोन कॉलमुळे मराठमोळ्या रेणुका शहाणेच्या प्रेमात पडला, ज्याबद्दल आशुतोष यांनी बऱ्याच मुलाखतीत खुलासा केला आहे.

हंसल मेहता यांच्या सिनेमाच्या सेटवर आशुतोष आणि रणूका यांची ओळख झाली. अर्धा तास गप्पा मारल्यावर आशुतोष यांच्या व्यक्तिमत्वामुळे रेणुका चांगलीच इम्प्रेस झाली. खरंतर आशुतोष यांनासुद्धा रेणुका आवडायला लागली होती पण त्यांना बोलावं कधी हे सुचत नव्हतं.

अखेर दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आशुतोष यांनी रेणुकाला फोन केला, आणि तिथूनच हळू हळू त्यांची लव्ह स्टोरी पुढे सरकली, तब्बल ३ महीने त्यांची ही लव्हस्टोरी सुरू होती आणि एके दिवशी एक छानशी कविता लिहून ती सादर करून आशुतोषनी रेणुकाला प्रपोज केलं.

ही कविता वाचून रेणुकासुद्धा इम्प्रेस झाली आणि नंतर ते लग्नबंधनात अडकले.

 

ashutosh rana renuka inmarathi

 

आशुतोष यांनी सादर केलेली सुंदर कविता नेमकी काय होती :

‘प्रिये लिखकर, मैं नीचे लिख दूं नाम तुम्हारा, कुछ जगह बीच में छोड़ दूं…नीचे लिख दूं ‘सदा तुम्हारा’, लिखा बीच में क्या यह तुमको पढ़ना है, कागज पर मन की परिभाषा का अर्थ समझना है, जो भी अर्थ निकलोगी तुम वह मुझको स्वीकार है, झुके नयन, मौन अधर या कोरा कागज अर्थ सभी का प्यार है।’

आशुतोष राणा यांनी पडद्यावर कितीही भयावह खलनायक साकारले असले तरी खऱ्या आयुष्यात ते तितकेच संवेदनशील आहेत, वाचनाची त्यांना प्रचंड आवड आहे, त्यांचा व्यासंग वाखणण्याजोगाच आहे, आणि यामुळेच ते बॉलिवूडमध्ये टिकून आहेत.

 

ashutosh rana 2 inmarathi

 

अशा या हरहुन्नरी आणि स्वतःच्या मेहनतीने नशीब घडवणाऱ्या कलाकाराला टीम इनमराठीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?