' पाऊस आला की आपोआप चालू होणारे कारचे 'वायपर्स'! गोष्ट या तंत्रज्ञानामागची...

पाऊस आला की आपोआप चालू होणारे कारचे ‘वायपर्स’! गोष्ट या तंत्रज्ञानामागची…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉन्ग ड्राइव्हला जायला कुणाला आवडत नाही? लांबच लांब रस्त्यावर मनसोक्त मोकळेपणाने गाडी चालवताना आपण रिलॅक्स होतो. त्यात जर आवडीची व्यक्ती म्हणजेच मित्रमंडळी, कुटुंब किंवा प्रेमाचे माणूस बरोबर असेल आणि गाडीत आवडीची गाणी लागली असतील तर ‘मजा आ गया’ असे फिलिंग येते.

सोने पे सुहागा म्हणजे जर पावसाळी वातावरण असेल आणि हिरव्यागार कुरणांच्या सोबतीला पाऊस आला तर ह्या वातावरणात चारचाकी गाडी चालवण्याची मजा काही औरच असते.

गाडी चालवत असताना जर पाऊस आला तर आपण आधी पटकन वायपर सुरु करतो, त्यामुळे पावसात गाडी चालवणे सुकर होते. चारचाकी गाडीला हे वायपर नसते तर पावसात गाडी चालवणे अशक्य झाले असते.

 

wiper inmarathi

 

साधारणपणे गाडी चालवणे, गाडीच्या पार्ट्समध्ये इंटरेस्ट असणे, गाडीची टेक्निकल माहिती असणे हा सगळा पुरुषांचा मक्ता आहे असे बऱ्याच लोकांना अजूनही वाटते.

त्यामुळे गाडीच्या बाबतीत नवनवे शोध देखील पुरुषच लावत असतील असा लोकांचा साधारण समज असतो, पण जर तुम्हाला सांगितले की वायपरचा शोध एका महिलेने लावला आहे तर बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल.

१९०२ सालापर्यंत कारच्या विंडशिल्डला वायपर नव्हते. मेरी अँडरसन ह्या महिलेने वायपरचा शोध लावल्यानंतर लोकांना वेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाडी चालवणे अधिक सुकर झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मेरी अँडरसनचा जन्म १० फेब्रुवारी १८६६ रोजी बर्टन हिल प्लांटेशन, ग्रीन काउंटी, अलाबामा येथे झाला. तिचे आईवडील जॉन आणि रेबेका अँडरसन होते. तिने तिच्या ह्या शोधाचे पेटन्ट मिळवले, तेव्हा हेन्री फोर्डने गाड्या निर्माण करण्यास सुरुवात देखील केली नव्हती.

झाले असे, की १९०२ साली मेरी अँडरसन न्यूयॉर्कला जात होती. ती एक स्ट्रीटकारने प्रवास करत होती, पण वातावरण मात्र ड्रायव्हिंगसाठी तितकेसे बरे नव्हते. हिमवर्षाव सुरु होता.

 

wiper inmarathi 1

 

त्या वेळी विंडशील्ड वायपर्स नसल्याने गाडीचालकांना वारंवार गाडीतून उतरून किंवा खिडकीतून कसाबसा हात आणि डोके बाहेर काढून गाडीच्या काचेवर साचलेला बर्फ साफ करावा लागत असे. ह्यामुळे प्रवासात खूप वेळ वाया जात असे.

असाच प्रवास करत असताना मेरीच्या डोक्यात एक कल्पना आली, की जर गाडीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी एक ब्लेडसदृश साधन असले पाहिजे आणि गाडीचालकांना गाडीत बसूनच काचा स्वच्छ करता आल्या तर खूप बरे होईल. ह्यामुळे कितीतरी वेळ वाचू शकेल.

त्यानंतर मेरी बर्मिंगहमला परत गेली. तिने तिच्या ह्या यंत्राचे स्केच तयार केले. त्याचे तपशीलवार वर्णन लिहून काढले आणि पेटंटसाठी अर्ज केला. पेटंट अर्जामध्ये मोटार कारच्या व्हेस्टीब्युलमधील हँडलद्वारे वायपर कसे चालवले जाऊ शकते आणि ते सहजपणे काढता येण्याजोगे कसे असावे याचे वर्णन केले आहे.

पेटंटचा अर्ज १८ जून १९०३ रोजी करण्यात आला. १० नोव्हेम्बर १९०३ रोजी युनायटेड स्टेट्स पेटन्ट ऑफिसने मेरी अँडरसनला तिच्या विंडो क्लिनिंग डिव्हाईससाठी पेटन्ट बहाल केले.

ह्या पेटण्टचा नंबर ७४३८०१ हा होता. त्यानंतर मेरी अँडरसनने गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांना हे यंत्र बनवण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण, कुणालाही हे यंत्र गाडीत बसवण्यात रस नव्हता.

 

wiper inmarathi 2

 

डायनिंग अँड एकेन्स्टाईन कंपनीने मेरीला उत्तर पाठवले होते की, “डिअर मॅडम, आम्हाला हे सांगण्यास खेद वाटतो की आम्हाल हे यंत्र तितक्या व्यावसायिक मूल्याचे वाटत नाही की आम्ही ह्या उपकरणाची विक्री करू शकू.”

त्याकाळी स्त्रियांच्या प्रयत्नांना, मतांना काहीच किंमत नव्हती. जग पुरुषांच्या मर्जीने चालत असे. मेरीचे लग्न झाले नव्हते त्यामुळे तिचे मत पटवून देण्यासाठी तिला नवरा नव्हता, मुलगा नव्हता आणि दुर्दैवाने तिचे वडील सुद्धा हयात नव्हते.

त्यामुळे कुठलाच पुरुष तिच्या बाजूने उभा नसल्याने तिचा हा  शोध कितीही  महत्वाचा असला तरीही त्या काळच्या पुरुषांनी तिचे हे उपकरण तितक्या गांभीर्याने घेतले नाही.

 तिने अनेक कंपन्यांना हे उपकरण चालवून बघण्याची विनंती केली. पण तिला काही त्यात यश मिळाले नाही. अखेर तिने तिचे प्रयत्न सोडून दिले.

१९२० साली तिचा पेटन्ट वरील हक्क संपला, पण त्या काळात विंडशिल्ड वायपर्सची मागणी प्रचंड वाढली होती. पण मेरीने तिच्या शोधावरील हक्क काढून घेतला आणि कॉर्पोरेट कंपन्यांना तिचे ओरिजिनल डिझाईन वापरण्याची परवानगी दिली.

 

wiper inmarathi 3

 

१९२२ साली कॅडिलॅक कंपनीने पहिल्यांदा गाडीत वायपर बसवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हे उपकरण म्हणजे गाडीचा एक अविभाज्य भागच बनला.

मेरीने तिच्या पुढील ५० वर्षांच्या आयुष्यात विंडशिल्ड वायपर एक आवश्यक उपकरण म्हणून गाड्यांना बसवलेले बघितले. २७ जून १९५३ रोजी टेनेसी, अमेरिका येथे तिचे निधन झाले.

तिला ह्या शोधासाठी आर्थिक मोबदला आणि क्रेडिट मिळाले नाही. २०११ साली अखेर तिचे नाव इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेम मध्ये सामील केले गेले. तर असा हा महत्वाचा शोध लावणाऱ्या मेरी अँडरसनचे आपण आता पावसात गाडी चालवताना आभार मानलेच पाहिजेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?