' नावावरून वादच नको; १० वादग्रस्त चित्रपट ज्यांची नावंच बदलण्यात आली! – InMarathi

नावावरून वादच नको; १० वादग्रस्त चित्रपट ज्यांची नावंच बदलण्यात आली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचा आणि आपला अगदी जवळचा संबंध आहे. बॉलिवूडमध्ये नेहमी नवनवीन कहाण्यांची, सिनेमांची निर्मिती होत असते. नवे चेहरे समोर येत असतात, काही ना काही खास घडत असते. त्याबद्दल जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे बॉलिवूडच्या प्रत्येक घटनेकडे प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते.

बॉलिवूडच्या बातम्या रोजच प्रसार माध्यमांमध्ये छापून येतात. पण हल्लीच्या बातम्या या केवळ बातम्या नसून, बॉलिवूडमध्ये होणारे वाद आहेत. जणू काही बॉलिवूड आणि वाद विवाद यांचे जवळचे नाते निर्माण झाले आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडमध्ये वाद निर्माण होताना दिसून येतात आणि याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये छापून येताना दिसतात.

 

shahrukh and salman khan inmarathi

 

नावात काय आहे? असं शेक्सपिअरने खूप शतकांपूर्वी म्हटले आहे. पण हे नाव जर चित्रपटाचे असेल तर?

कोणत्याही सिनेमाचे नाव हे त्या चित्रपटाचा जीव, आत्मा असतो असे म्हणायला हरकत नसावी. कारण चित्रपटांच्या नावावरून चित्रपटाची कहाणी काय असेल याचा अंदाज बांधता येतो. इतकेच काय पण त्याची गूढता समजून येते. नाव ऐकून चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली जाते.

याच नावांमुळे आपल्या बॉलिवूडमधील कित्येक निर्मात्यांना वादाला सामोरे जावे लागले आहे. समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे, इतिहासातील बदल केल्यामुळे तर उत्पादनाचे नाव वापरल्यामुळे, अशा विविध कारणांमुळे वाद निर्माण झाले आणि चित्रपटांची मूळ नावे बदलण्यात आली.

 

bollywood inmarathi

 

चला तर बघूया बॉलिवूडमधील सिनेमांच्या नावांचे किस्से…

१. लक्ष्मी

अक्षय कुमार निर्मित आणि अभिनित हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपट कंचाना या मूळ चित्रपटापासून बनवलेला होता. या चित्रपटाचे पहिले नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते, पण नावावरून वाद निर्माण झाल्यामुळे याचे नाव फक्त लक्ष्मी असे ठेवण्यात आले.

 

laxmi inmarathi

 

२. बिल्लू

इरफान खान अभिनित या चित्रपटाचे पहिले नाव बिल्लु बार्बर असे होते. पण या नावात न्हावी समाजातील लोकांचा उल्लेख होत असल्यामुळे याचे नाव फक्त बिल्लू ठेवण्यात आले.

 

irfan khan billu inmarathi

 

३. जजमेंटल है क्या?

या चित्रपटामध्ये कंगना रानौत आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचे पहिले नाव मेंटल हैं क्या? असे होते. पण प्रदर्शनाच्या वेळी हा चित्रपट वादात अडकला त्यामुळे याचे नाव जजमेंटल है क्या? असे ठेवण्यात आले.

 

judgemental hai kya inmarathi

 

४. पद्मावत

सगळ्यात जास्त वादात सोडलेला हा चित्रपट म्हणता येईल. मूळ इतिहासात बदल केल्यामुळे आणि राजपूत समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या आरोपात हा चित्रपट अडकला होता. त्यामुळे या चित्रपटाचे नाव पद्मावत ठेवण्यात आले. याचे पहिले नाव पद्मावती असे होते.

 

padmavat inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

५. लवयात्री

हा सिनेमा नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदू समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे या सिनेमाचे नाव लव्हरात्री ऐवजी लवयात्री ठेवण्यात आले. हा चित्रपट सलमान खानने निर्मित केला होता.

 

love yatri inmarathi

 

६. आर राजकुमार

शाहिद कपूरच्या या सिनेमाचे पाहिले नाव रॅम्बो राजकुमार असे होते. पण यावर हॉलिवूड निर्मात्यांनी आक्षेप घेतला त्यामुळे याचे नाव आर राजकुमार ठेवण्यात आले.

 

r rajkumar inmarathi

 

७. गोलियो की रासलीला रामलीला

रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण अभिनित आणि संजय लीला भन्साळी निर्मित या चित्रपटावर रामायणाचा अपमान केल्याचा आरोप होता त्यामुळे या चित्रपटाला ‘गोलीयो की रासलीला’ हे नाव जोडले गेले.

 

ramleela inmarathi

८. हसीना पारकर

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीवर आधारित असलेला हा चित्रपट होता. श्रद्धा कपूर यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आली होती. या चित्रपटाचे पहिले नाव हसीना होते. नंतर ते बदलण्यात आले.

 

haseena parkar movie inmarathi

 

९. मद्रास कॅफे

जॉन अब्राहमचा हा चित्रपट श्रीलंकेतील तमिळ मुद्द्यांवर आधारीत होता. याचे पहिले नाव जाफना होते. पण दक्षिण भारतात विरोध झाल्यामुळे नाव बदलण्यात आले.

 

madras cafe inmarathi

 

१०. रुही

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या या चित्रपटाचे पहिले नाव रुह आफजा होते. पण हे एका उत्पादनाचे नाव असल्यामुळे नाव बदलून रूही ठेवण्यात आले.

 

roohi inmarathi

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?