' आयर्लंड देशातील पंतप्रधानपदाच्या लढतीत उभा आहे ‘आपला मराठी माणूस’! – InMarathi

आयर्लंड देशातील पंतप्रधानपदाच्या लढतीत उभा आहे ‘आपला मराठी माणूस’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आर्यलंड देशाचा  पंतप्रधान कोण होणार याकडे सगळ्या जगाचे आणि त्याहूनही जास्त आपल्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काय म्हणता? तुम्हाला या बाबतीत काहीच कल्पना नाही? अहो कारण या पंतप्रधानाच्या शर्यतीत उभा आहे के आगळावेगळा, पण आपला मराठी माणूस-लिओ वराडकर! काय? ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊन तुम्हाला अभिमानही वाटेल.

leo-varadkar-marathipizza01
diyatvusa.com

लिओ वराडकर यांचा जन्म १८ जानेवारी १९७९ मध्ये रोतुंडा रुग्णालयात पारनेल स्क़्वेअर डब्लीन इथे झाला. त्यांचे वडील अशोक वराडकर हे मुळचे सिंधुदुर्गचे. ते १९६० मध्ये इंग्लंडमध्ये डॉक्टर म्हणून स्थायिक झाले. डूंगरवन मध्ये जन्म झालेली मरियम त्यांची आई स्लौग मध्ये नर्सचे काम करत होती, नंतर ते लेइकेस्तरला राहिले. तिथे त्यांची मोठी मुलगी सोफिया हीचा जन्म झाला. नंतर पुन्हा भारतात आणि पुन्हा भारताहून डब्लीन येथे जाऊन ते  स्थायिक झाले, तिथेच त्यांची दुसरी मुलगी सोनिया आणि मुलगा लिओ यांचा जन्म झाला.

शिक्षण

लिओ वराडकर यांनी फ्रान्सीस झेविअर्स नॅशनल शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण ट्रीनिटी महाविद्यालयामधून पूर्ण केले. नंतर ते वैद्यकीय शाखेमधून २००३ साली पदवीधर झाले. त्यापुढील काही वर्ष त्यांनी जेम्स आणि कॉनोले रुग्णालयात जुनिअर डॉक्टर ची नोकरी केली.

राजकीय घोडदौड

वराडकर फक्त २० वर्षांचे असताना त्यांनी आपली पहिली निवडणूक लढवली होती, त्यावेळी ते वैद्यकीय शाखेत दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होते. त्यांना या स्थानिक निवडणुकीत फक्त ३८० मते मिळाली होती आणि ते नवव्या फेरीत बाद झाले होते. २००४ मध्ये कास्टेलनॉक इथे ते शेईला टेरी यांच्या जागी निवडणुकीत उभे राहिले होते आणि या लोकल निवडणुकीत त्यांना सर्वात जास्त मते ४८९४ मिळाली होती.

leo-varadkar-marathipizza02
herald.ie

२००७ मध्ये वराडकर डेल एरीयन इथे जनरल निवडणुकीत निवडून आले होते .परत ते २०११ मध्ये ८३५९ मतांनी निवडून आले. त्या काळात ते पार्टीचे उपक्रम ,व्यापार आणि रोजगार या विषयी माहिती देणारे ते वरिष्ठ  प्रवक्ते होते.

फाइन गेल या ख्रिश्चन डेमोक्रेटिक पॉलिटिकल पार्टीतर्फे ते राजकारणात आले.२०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी पर्यटन, वाहतूक आणि क्रीडा ही मंत्रीपदे भूषवली. २०१४ पासून २०१६ पर्यंत आर्यलंडचे ते आरोग्यमंत्री होते. वेगळेपण असे की, ते आर्यलंडच्या मंत्रिमंडळातील पहिले तृतीयपंथी सदस्य आहेत.

leo-varadkar-marathipizza03
independent.ie

जर लिओ जिंकले तर ते आयरिश सरकारला चालवणारे पहिले भारतीय व तृतीयपंथी असतील. लिओ यांनी आपल्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त रेडीओ वर आपण तृतीयपंथी असल्याचे घोषित केले होते.

आयर्लंडचे विद्यमान पंतप्रधान किनी यांनी आपली पंतप्रधान कारकीर्द ६ वर्षांनी राजीनामा देउन संपुष्टात आणली, त्यानंतर पुढील वाटचालीसाठी लिओ यांचे नाव समोर आले.या वर लिओ यांनी प्रतिकिया दिली की त्यांना त्यांच्या फाइन गेल पार्टीचा आणि जनतेचा पूर्ण पाठींबा आहे. ही निवडणूक २ जून २०१७ रोजी होणार आहे.

वराडकर कुटुंबाचे गावात घर आहे व बागायती शेती देखील आहे. वराडकर कुटुंबीय वर्षातून दोन वेळा गावात येतात. आजही ते आपली बोलीभाषा  गावाकडे आल्यावर बोलतात.

leo-varadkar-marathipizza04
ibtimes.co.uk

परदेशात असूनही मातीशी नाळ जोडून असणारे असे हे लिओ वराडकर आर्यलंडचे पंतप्रधान झाले, तर नक्कीच आपल्या देशाचे नाव उंचावेल आणि परदेशातील एका देशावर आपला मराठी माणूस प्रभुत्व गाजवेल, यापेक्षा अभिमानाची बाब दुसरी कोणती असेल?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?