' कागदी कपातून चहा पिताय? मग ‘हा’ धोका तुम्हाला माहित असायलाच हवा… – InMarathi

कागदी कपातून चहा पिताय? मग ‘हा’ धोका तुम्हाला माहित असायलाच हवा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहा म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण! महाराष्ट्रात तर प्रत्येक गल्लीगल्लीत एखादी चहाची टपरी आवर्जून पाहायला मिळते. ‘महाराज एक कटिंग’ असं म्हणत टपरीसमोर उभी राहणारी व्यक्ती रोजंदारीवर काम करणारी सुद्धा असू शकते, किंवा थेट एसीची हवा खात कॉर्पोरेटमध्ये काम करणारी आणि कारमधून फिरणारी मंडळी…

टपरीवर चहा देताना एका विशिष्ट कपात तो दिला जातो हे तर सगळ्यांनाच माहित असतं. त्या काचेच्या कपात चहा पिण्याची मजाच काही और! कधी चहा पार्सल न्यायचा असेल तेव्हा मात्र चहा प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून दिला जातो आणि कागदी ग्लास सोबत दिले जातात.

 

paper tea cups inmarathi

 

कोरोनाचा धोका वाढल्यापासून तर, कागदी ग्लासात चहा देणं ही अगदीच नेहमीची बाब झाली आहे. तिथे उभं राहून चहा पिणाऱ्या माणसाला सुद्धा सर्रासपणे कागदी कपात चहा दिला जातो आणि भुरके घेत घेत त्या चहाचा आस्वाद तुम्ही-आम्ही मंडळी घेतो.

पिशवीतून चहा पार्सल नेणं आरोग्यासाठी धोकादायक आहेच. प्लॅस्टिकमध्ये गरम वस्तू ठेऊ नयेत, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे तर आपण नेहमीच ऐकलेलं असतं, पण कागदी ग्लासचा सुद्धा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

त्यातही असतो प्लॅस्टिकचा अंश…

संशोधनातून हे सिद्ध झालं आहे, की कागदी कपांमध्ये सुद्धा काही प्रमाणात प्लॅस्टिकचा अंश असतो. कपच्या आतील भागाला प्लॅस्टिकचा एक पातळ थर देण्यात येतो. या थरामध्ये प्लॅस्टिकसह इतरही काही हानिकारक पदार्थांचा समावेश असतो.

कागदी वस्तूवर अर्धवट ओली असणारी वस्तू जरी सांडली तरी तो कागद लगेच ओलसर होतो, हे तर तुम्हाला माहित असेलच. मग अशा कागदी कपात गरम द्रव पदार्थ ओतला जात असेल, तर तो निव्वळ कागद नसणार हे सांगण्यासाठी फार सखोल संशोधनाची आवश्यकता नाही.

 

bhel in paper inmarathi

 

म्हणजेच लगेच तरतरी यावी यासाठी घेतला जाणारा चहा, आपलं भविष्यातील आरोग्य धोक्यात टाकत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

संशोधनात नेमकं काय सापडलं?

एखाद्या कागदी कपात गरम १०० मिली पाणी ओतलं आणि ते १५ मिनिटं तसंच ठेवलं, तर ते पाणी अपायकारक झालेलं असतं. होय, अगदी योग्य वाचलं आहे तुम्ही… या पंधरा मिनिटांमध्ये जवळपास २५००० मायक्रोप्लॅस्टिक कण या पाण्यात मिसळलेले असतात. यांचा आकार १० ते १००० मायक्रोन पर्यंत असतो.

म्हणजे दिवसाला २-३ वेळा चहा प्यायलात, तर साधारणपणे ५० ते ७५ हजार कण पोटात जाणार… याचा आरोग्याला फारच धोका होऊ शकतो.

 

coffee in paper cup inmarathi

रोज असे हजारोंच्या संख्येने प्लॅस्टिक पार्टिकल्स पोटात जात असतील, तर वर्षभरात किती प्लॅस्टिक नकळतपणे आपण खात असू याचा विचार तुम्हीच करून पहा. अगदी नकळतपणे आपण प्लॅस्टिकचं सेवन करून, आरोग्य धोक्यात टाकतोय हे तुम्हालाच लक्षात येईल.

मातीची भांडी हादेखील चांगला पर्याय

जुन्या काळात वापरली जाणारी मातीची भांडी हा पर्यावरणपूरक आणि शरीराला हानी न पोचवणारा पर्याय नक्कीच ठरू शकतो. मध्यंतरी तंदूर चहा या प्रकारचा ट्रेंड आला होता त्यावेळी अशा प्रकारची भांडी चहासाठी वापरली गेली. वापरून फेकून दिल्या जाणारे चहाचे कप हवे असल्यास, हा उत्तम उपाय ठरेल.

 

tandoor tea inmarathi

 

मातीच्या भांड्यांमुळे आर्थिक गणित जुळून येईल का? आणि हा पर्याय स्वीकारून चहावाले अशी मातीची भांडी देतील का? हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आपण आपल्या आरोग्याची काळजी नक्कीच घेऊ शकतो. ही माहिती जाणून घेतल्यावर, आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरणारा निर्णय तुम्ही घ्याल याची खात्री आहेच.

तुमच्या आप्तेष्टांना सुद्धा ही माहिती मिळायला हवी असं वाटत असेल, तर हा लेख शेअर करायला अजिबात विसरू नका. अशा इतर कुठल्या गोष्टींविषयी माहिती मिळवायला तुम्हाला आवडेल, तेही कमेंटमधून नक्की कळवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?