' मुकेश अंबानी आणि कुटुंबीय लंडनमध्ये स्थलांतरित? नवी माहिती आली समोर… – InMarathi

मुकेश अंबानी आणि कुटुंबीय लंडनमध्ये स्थलांतरित? नवी माहिती आली समोर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अंबानी हे नाव नेहमीच कुठल्या ना कुठल्या खास बातमीसाठी चर्चेत असतं. मुकेश अंबानी म्हणजे तर भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तिमत्व! मग त्यांच्याविषयी काही ना काही चर्चा झाली नाही तरच नवल…

कधी आयपीएलसाठी असो, तर कधी मुलाच्या लग्नासाठी, कधी मुंबईतल्या मोठ्या थोरल्या घरासाठी; मुकेश अंबानी या नावाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतच असते. यावेळी आणखी एक अफलातून कारण या चर्चेसाठी मिळालं आहे. असं म्हटलं जातंय, की मुकेश अंबानी आणि कुटुंबीय लवकरच लंडनवासी होणार आहेत.

 

mukesh and nita ambani InMarathi

 

थोडक्यात काय, तर आता अँटिलीयाची चर्चा सोडा, अंबानींच्या लंडनमधल्या घराची चर्चा आता जोरात असणार!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 —

नव्या घराची किंमत काय?

मुकेश अंबानी ज्या नव्या घरात स्थायिक होणार आहेत, ती बकिंगहममधील जागा ही तब्बल ३०० एकराची आहे. म्हणजे यांची लंडनवारी भलतीच मोठी आहे. या घराची किंमत थोडीथोडकी नाही बरं का, ती आहे ५९२ करोड इतकी!

ही तर झाली फक्त घराची किंमत, आता त्या घरात अंबानी कुटुंबियांनी त्यांना हव्या तशा सोयीसुविधा तयार करून घ्यायला सुरुवात केली आहे. आता आपणच आपल्या घरात सुविधा करून घेताना किती पैसा खर्च करतो; मग त्याच हिशोबाने तुम्हीच बघा अंबानी साहेब किती पैसा खर्च करत असतील.

 

ambani 3 inmarathi

 

कसं आहे अंबानींचं नवं घर?

बकिंगहम मधील स्टोक प्रॉपर्टी ३०० एकरात पसरली आहे, म्हणजे मोठीथोरली असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. ४९ बेडरूम्स, सगळ्या वैद्यकीय सेवा आणि अँटिलीयामध्ये आहे तसं एक हुबेहूब मंदिर अशा गोष्टी या प्रशस्त मॅन्शनमध्ये आहेत बरं का!

यंदा अंबानी कुटुंबीयांची दिवाळी सुद्धा खास होती. मुंबईतील अँटिलीयामध्ये साजरी न होता, चक्क लंडनमध्ये साजरी करण्यात आली. हीच अंबानी मंडळी पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात लंडनवासी होणार अशी चर्चा सुरु आहे.

आभाळाला भिडणाऱ्या अँटिलीयाचा आता अंबानी मंडळींना कंटाळा आलाय असंही काहींचं म्हणणं आहे. ही उंच इमारत नकोशी वाटतेय कारण आसपासचा परिसर रिकामा असणाऱ्या प्रशस्त जागेत आता त्यांना राहायचं आहे, अशी अटकळ बांधली जात आहे. यात नेमकं तथ्य किती आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

ambani house InMarathi

 

रिलायन्स समूहाने नेमकं काय म्हटलंय…

‘अंबानी कुटुंबीय लंडनवासी होणार’ अफवा आहेत असं म्हणत रिलायन्स ग्रुपने मात्र या सगळ्या बातम्यांचं खंडन केलंय.

लंडनच नव्हे, तर भारत सोडून इतर कुठेही स्थायिक होण्याचा मुकेश अंबानी यांचा विचार नसून, या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणतंय.

 

reliance industries limited inmarathi

 

स्टोक पार्क इस्टेट इथे असलेली ३०० एकराची प्रॉपर्टी, म्हणजे एक हेरिटेज प्रॉपर्टी आहे. या जागेवर एक भव्य स्पोर्टींग आणि गोलफिंग रिसॉर्ट बांधण्याची योजना असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

यात खरं काय आणि खोटं काय, हे येत्या काळात नक्कीच कळेल. तूर्तास मात्र, या बातम्या म्हणजेच निव्वळ अफवा असल्याचं मान्य करायला हवं, नाही का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?