' भाऊबीजेच्या गिफ्टसाठी सर्वोत्तम ३ पर्याय: तुम्ही कशाची निवड करणार? कमेंट करा – InMarathi

भाऊबीजेच्या गिफ्टसाठी सर्वोत्तम ३ पर्याय: तुम्ही कशाची निवड करणार? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भाऊबीज म्हणजे हक्काने भाऊरायांचा खिसा कापण्याचा दिवस! रक्षाबंधनाला भावाकडून आवडतं गिफ्ट घेतल्यानंतर बहिणींना वेध लागतात ते भाऊबीजेचे. मग भाऊ मोठा असो वा धाकटा, हक्काने त्याच्याकडून गिफ्ट वसूल करण्यात बहिणी मागे हटत नाहीत.

 

bhaubij

 

भाऊरायाही बहिणीच्या आवडीनिवडीचा विचार करत तिच्यासाठी गिफ्ट निवडतो. यंदाच्या भाऊबीजेला काय गिफ्ट द्यावं? याचा तुम्हीही विचार करत असाल ना?

मग आम्ही असे तीन पर्याय घेऊन आलो आहोत जे कोणत्याही वयोगटातील बहिणींना हमखास आवडणार. मात्र या ३ पर्यायांपैकी तुम्ही कशाची निवड करणार? हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा. कदाचित तुम्हाला कमेंटमध्ये आणखीही चांगले पर्याय सापडतील.

१. पैसे

हल्ली प्रत्येकाची आवड बदलल्याने बहिणींना ‘कॅश’ देण्याकडे भावांचा कल अधिक असतो. मग बहिणीही आपल्या मनाजोगती खरेदी करू शकतात.

 

cash inmarathi

 

तुम्हीही हाच विचार करत आहात का? कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवायला विसरू नका.

२. चॉकलेट्स

बहिणीला तिच्या आवडीचे चॉकलेट्स दिल्यानंतर ती खुश झाली नाही तरच नवल! स्वस्तात मस्त, तरिही बहिणीला आवडणारे चॉकलेट्स हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो.

 

chocalate inmarathi

 

मात्र कोणत्या कंपनीचे चॉकलेट्स घ्यावे? कोणता फ्लेवर घ्यावा याचा जरा विचार करा, म्हणजे बहीण अधिकच खुश होईल.

३. ड्रेस

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकीला कपड्यांची आवड असतेच. त्यात आपल्या भावाने खास खरेदी करून दिलेला ड्रेस मिरवणं म्हणजे बहिणीसाठी भाग्यच! तुम्ही तुमच्या बहिणीला एखादा छानसा ड्रेस देणार आहात का? देणार असाल, तर कोणता रंग किंवा प्रकार? कन्फ्युजन आहे? मग हमखास कमेंट बॉक्समधील पर्याय वाचा, कदाचित तुम्हाला छानसा पर्याय निवडता येईल.

 

gift inmarathi

 

यंदाची तुमची भाऊबीज मजेत होणार हे नक्की, त्यासाठी तुम्हाला इनमराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा. मात्र हा दिवस साजरा करण्यापुर्वी तुम्ही गिफ्टसाठी कोणता पर्याय निवडताय हे कमेंट करायला विसरू नका, कदाचित तुमच्या उत्तरामुळे तुमच्यासारख्याच इतर भाऊरायांना गिफ्ट निवडायला मदत होईल.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?