' प्याज का हलवा, अचप्पम - चव चाखणं दूरच; या ११ पदार्थांची नावंही तुम्ही ऐकली नसतील

प्याज का हलवा, अचप्पम – चव चाखणं दूरच; या ११ पदार्थांची नावंही तुम्ही ऐकली नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत हा जसा सण उत्सवांचा देश आहे तसा तो विविधतेचा आणि विविध खाद्यसंस्कृतीचा देश आहे. महाराष्ट्रातील तिखटजाळ तांबड्या-पांढर्‍या रश्श्यापसून ते बंगाली गोडम गोड संदेशपर्यंत, विविध पदार्थांनी भारत सजला आहे.

पूर्वेकडील थुकपा ते पश्चिमेचा ढोकळा, उत्तरेकडील छोले भटुरे ते दक्षिणेकडील इडली/डोसा यांच्याशी आपण सर्व परिचित आहोत. पण असेही विविध पदार्थ आहेत ज्यांची चव अजून आपणही फारशी चाखलेली नाही.

पूर्वीच्या काळी राजे महाराजांपासून ते अगदी सामान्य शेतकर्‍याच्या घरात देखील या अशा विविध पदार्थांची मांदियाळी असे. ज्यात झुणका, दूध आमटी, उंधियो, काला मांस असे अनेक शाकाहारी, मांसाहारी पदार्थ आपल्या रसनेची तृप्ती करत असत.

 

jhunka bhakri inmarathi

 

अगदी आपल्या सर्वांच्या आवडत्या श्रीखंडाचा शोध महाभारत काळात भीमाने लावला असल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. तरीही भारतीय पाकशास्त्रात असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्यासाठी दुर्मिळ आहेत पण चवदार आहेत. कोणते आहेत हे पदार्थ? चला जाणून घेऊया.

१. रोगन जोश

मूळचा पर्शियन असलेला हा पदार्थ ‘करी’ या प्रकारात मोडतो. भारतातील काश्मीर भागातील ही सुप्रसिद्ध डिश आहे. पदार्थाचा रंग लाल असलेली ही डिश कोकरू किंवा बीफ यांच्या मांसापासून बनवली जाते.

 

rogan josh inmarathi

 

ही खास मोघल डिश असून यात काश्मिरी लाल मिरची, लसूण, कांदे, आले यांच्या घट्ट ग्रेव्हीत आधीच तपकिरी रंगावर फ्राय केलेले मटणाचे तुकडे शिजवले जातात. चवीला अतिशय हटके असणारी ही करी बासमती तांदळाचा भात किंवा नान यांसोबत खाल्ली जाते.

२. बेनामी खीर

या खिरीचे नाव असे पडण्यामागे कारणच असे आहे, की या खीरीत वापरले जाणारे घटक गुप्त ठेवले जातात. जे फक्त मुख्य आचार्‍याला माहिती असतात.

अतिशय उत्कृष्ट आणि स्वर्गीय चव असलेली ही खीर मुघल काळात, राजघराण्यांमधील मंडळींना खूप आवडणारी मिठाई होती. या खीरीचे नावच असे आहे की आपण या डिशच्या घटकाचा अंदाज लावू शकणार नाही. कारण त्याचा मुख्य घटक गुप्त ठेवण्यात आला होता. ज्यांना या डिशबद्दल फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी ही खीर लसूण किंवा लेहसून वापरुन बनवली जाते. एवढेच पुरेसे आहे.

 

benami kheer inmarathi

 

३. विंदालू

विंदालू ही एक करी आहे जी कोंबडी किंवा कोकरू यांच्या मांसापासून बनवली जाते. ज्यामध्ये लाल मिरची, वाईन किंवा व्हिनेगर हे मुख्य घटक वापरले जातात.

१५ व्या शतकात पोर्तुगीज गोव्यात आले, तेव्हा त्यांच्यासोबत ही डिश भारतात आली. वाइन-व्हिनेगर आणि लसूणमध्ये मॅरीनेट केलेले पदार्थ असणारी ही डिश इथे प्रचलित झाली. फ्रॅन्सिस्कन आचार्‍यांनी नंतर या डिशचे नवे रुपांतर केले – त्यांना भारतात वाइन-व्हिनेगर मिळू शकले नाही म्हणून त्यांनी थोडासा बदल करून पाम वाईनपासून त्यांनी ही डिश बनवली.

 

vindaloo inmarathi

 

४. अवन बंगवी

हा त्रिपुरातील पारंपारिक तांदळाचा केक आहे. गुरिया तांदूळ (ज्याला चिकट तांदूळ असेही म्हणतात), काजू, मनुका आणि तूप यांचा वापर करून हा पदार्थ बनवला जातो.

 

awan bangwi inmarathi

 

हे तांदूळ मिश्रण एका खास प्रकारात वाफवले जाते ज्याला लैरू असेही म्हणतात. सोयीसाठी बरेच लोक ही डिश वाफेवर शिजवण्यासाठी केळीची पाने देखील वापरतात.

५. सिद्दू / सिदू

हिमाचल प्रदेशाच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीमधील हा खास प्रकारचा ब्रेड आहे. तडका दाल आणि कोथिंबीर चटणीसोबत हा ब्रेड सर्व्ह केला जातो. गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणार्‍या या ब्रेडमध्ये अक्रोड, शेंगदाणे, मटार, पनीर भरलेले असते. हिमाचलमधील ही एक लोकप्रिय डिश आहे.

 

siddu inmarathi

६. मांडगे / मांडे

कर्नाटक, विदर्भ या भागात विशेष प्रसंगी, मुख्यत: लग्नप्रसंगी तयार केला जाणारा हा पदार्थ आहे. गव्हाचे पीठ, पिठीसाखर, खोबर्‍याचा किस आणि वेलची पावडर यांच्या मिश्रणातून हा भन्नाट चवीचा गोडी वाढवणारा पदार्थ तयार होतो.

हा पदार्थ टॅकोसारखा दिसतो आणि चवीला ही एकदम युनिक असतो.

 

mandige inmarathi

 

७. गोज्जू अवलक्की

कर्नाटकातील हा उपम्यासारखा पदार्थ जुन्या पोहयांच्या रव्यापासून बनवला जातो. याला एक सर्वसामान्य डिश अजिबात समजू नका, कारण त्यात गोड, तिखट, थोडीशी आंबट चव बेमालूमपणे एकत्र चाखायला मिळते. या पदार्थाला सोबत असते ती गूळ, डाळी आणि शेंगदाणे यांची.

 

gojju avalakki inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

८. प्याज का हलवा

या डिशकडे पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकत नाही, की ही कांद्यापासून बनवलेली स्वीट डिश आहे. पांढर्‍या कांद्याचा किस तुपावर परतून मग त्यात दूध, साखर आणि काजू घालून शिजवले जाते आणि समोर येते हे भन्नाट चवीचे हलव्यासारखे दिसणारे गोड मिश्रण! याला प्याज का हलवा म्हणून ओळखले जाते.

 

pyaaj ka halva inmarathi

 

९. गुंडा नू शाक

उन्हाळ्यात उगवणारी एक हंगामी बेरी, जिला आपल्याकडे भोकर या नावाने ओळखले जाते. गुंडा हा गुजरातमधील एक लोकप्रिय पदार्थ आहे आणि विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो.

 

gunda nu shaak inmarathi

 

गुंडा नू शाक हा गुंडा बेरी, लाल मिरची, कच्चा आंबा, बेसन, तेल आणि मसाल्यांनी बनवलेला एक स्वादिष्ट पदार्थ आहे. जो तुम्हाला एक झकास फ्लेवर देतो.

१०. अचप्पम

रोझ कुकीज म्हणूनही ओळखली जाणारी ही डिश तामिळनाडूमधील एक पारंपरिक नाश्ता आहे. ख्रिसमस आणि विशेष प्रसंगी अचप्पम खाल्ले जाते.

या कुकीज तांदळाचे पीठ, अंडी, नारळाचे दूध, तीळ, साखर आणि मीठ यापासून बनवल्या जातात आणि तळल्या जातात. कुरकुरीत स्वादाचे हे अचप्पम उत्तरप्रदेशीय जिलेबीचे भाऊबंद वाटतात.

 

achappam inmarathi

 

११. गुश्तबा

एक अस्सल काश्मिरी स्वादिष्ट पदार्थ, गुश्तबा हा मांसाचा चविष्ट पदार्थ वाझवान मेजवानीच्या वेळी मिष्टान्न खाण्यापूर्वी दिला जातो. ही डिश दह्यासोबत बनवलेल्या चवदार ग्रेव्हीमध्ये बोनलेस मटण मीटबॉल्स शिजवून तयार केली जाते.

 

gushtaba inmarathi

 

तर मित्रांनो ही खाद्यभ्रमंती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आणि तुमच्या मित्रमंडळींच्याही ज्ञानात भर पडावी म्हणून हा लेख शेअर करायला सुद्धा विसरू नका.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?