' या आठवड्यात कोण होणार ‘बिग बॉस’च्या घराबाहेर? कमेंट करा – InMarathi

या आठवड्यात कोण होणार ‘बिग बॉस’च्या घराबाहेर? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशभरात दिवाळीनिमित्त फराळाचा आस्वाद घेतला जात असताना बिग बॉसच्या घरात वेगळचं काहीतरी शिजतंय. एकीकडे घरातही दिवाळी सण साजरा करणारे सदस्य मात्र आठवडाभर नॉमिनेशन टास्कवर खलबतं करताना दिसत आहेत.

एरव्ही नॉमिनेशन टास्कमध्ये स्वतःसह आपल्या लाडक्या मित्रांना सुरक्षित करण्यासाठी सदस्य धडपडतात, संधी मिळताच आपल्या गटातील लोकांना सेफ करून विरोधी टिममधील जास्तीत जास्त सदस्य नॉमिनेट व्हावेत यासाठी प्रयत्न करताना दिसतात मात्र यंदाचा नॉमिनेशन टास्क या सगळ्याला अपवाद ठरला.

 

big boss inmarathi

 

यंदाच्या बिग बॉसचा मास्टरमाईंड म्हणून ओलखला जाणा-या उत्कर्ष शिंदे याने चक्क त्याचा जीवलग दोस्त जय दुधाणे याला नॉमिनेट केल्याने सदस्यांसह प्रेक्षकांनाही चांगलाच धक्का बसला. यामागे उत्कर्षची वेगळीच खेळी असली तरी त्याच्या या निर्णयामुळे जय दुखावला गेला सोबत त्यांचीच साथ देणा-या तृप्ती देसाईही नाराज झाल्या. जय आणि तृप्तीसह यंदा मीनल शहा, सोनाली पाटील आणि विशाल निकम हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

येत्या रविवारी पाच जणांपैकी नेमका कोणत्या सदस्याची दांडी गुल होणार? कुणाचा प्रवास अर्ध्यावर थांबणार? असं तुम्हाला वाटतं, जाणून घेऊयात नॉमिनेट सदस्यांबद्दल…

१. जय दुधाणे

बिग बॉसच्या घरातील सर्वात हॅण्डसम आणि तगडा खेळाडू म्हणून जय ओळखला जातो.

 

jay inmarathi

 

यापुर्वी हिंदी गेम शो चा अनुभव असलेल्या जयने पहिल्या दिवसापासूनच घरात धिंगाणा घालायला सुरुवात केली. मात्र त्याचा अनावश्यक तापट स्वभाव, वारंवार केली जाणारी अरेरावी ही बाब प्रेक्षकांना फारशी आवडत नाही, त्यामुळे प्रेक्षकांचा रोष जयला महागात पडणार का? जयसाठी उत्कर्षने घेतलेली रिस्क अयोग्य ठरेल का?

२. मीनल शहा

महिला सदस्यांमध्ये सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून महेश मांजरेकरही मीनलचं नेहमी कौतुक करतात. यापुर्वीचा अनुभव गाठीशी असल्याने मीनलच्या स्ट्रॅटर्जी, तिचा गेमप्लॅन यांना प्रेक्षकही दाद देतात. मात्र ही धाकड गर्ल अनेकांना आपल्या मार्गातील अडसर वाटत असल्याने तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न दर आठवड्याला केला जातो.

 

meenal inmarathi

 

यंदाही मीनल नॉमिनेट झाली असून प्रेक्षकांच्या साथीने ती सेफ होणार की घराबाहेर जाणार? तुम्हाला काय वाटतं?

३. तृप्ती देसाई

महिला आंदोलनात राडा करणाऱ्या तृप्ती देसाई या घरातही दंगा करताना दिसतात. कधी घरातील ज्येष्ठ म्हणून त्या नेतृत्व करतात तर कधी अरेरावीही करतात. यंदा उत्कर्षने नॉमिनेट केल्याने तृप्ती देसाईही नॉमिनेट झाल्या आहेत.

 

trupti big boss inmarathi

 

आता प्रेक्षकांची भरभरून मतं मिळाली तरच तृप्ती देसाईंचा आवाज यापुढे घरात ऐकू येऊ शकतो.

 

 

४. सोनाली पाटील

ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणारी सोनाली पाटीलही यंदा नॉमिनेट झाली आहे. भांडण, चर्चा, नॉनस्टॉप बडबड यांमुळे घरातील सदस्यांनी तिला नॉमिनेट केले आहे.

 

sonali inmarathi

 

आता प्रेक्षकांच्या मतामुळे तिचा हा नखरा पुढील आठवड्यातही बघायला मिळेल की तिला घरी परतावं लागेल? तुम्हाला काय वाटतं?

५. विशाल निकम

रांगडा सदस्य म्हणून ओळखला जाणारा विशाल हा घरातील सगळ्या सदस्यांचा आवडता असला तरी उत्कर्षला मिळालेल्या सुवर्णसंधीत त्याने विशालला नॉमिनेट केल्याने यंदा विशाल घराबाहेर जाणार का? हा प्रश्न आहे,

 

vishal inmarathi

 

यंदाच्या रविवारी कुणाची पाटी निघणार? कोण घराबाहेर जाणार? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?