' या बेटावर लोक चक्क 'माती खातात'...! तीसुद्धा अगदी चवीने...

या बेटावर लोक चक्क ‘माती खातात’…! तीसुद्धा अगदी चवीने…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘माती खाणे’ हा वाक्प्रचार आपण ‘काहीतरी चुकीचे करणे’ या अर्थाने वापरत असतो. मराठी सिनेमातील आपल्या सर्वांचे आवडते पात्र ‘श्री. गलगले’ हे सुद्धा स्वतःची झालेली एखादी चूक मान्य करतांना “माती खाल्ली गलगले” हे वाक्य वापरतांना आपण बघितले आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लहानपणी कधीतरी माती खाल्लेलीच असते हे नक्की…

आपली ‘धरणी माता’ ही कोणत्याही जखमेवर उपचार म्हणून मलम म्हणून सुद्धा आपल्या ग्रामीण भागात नेहमीच वापरली जात असते. पण, माती ही ‘मसाला’ म्हणून वापरली जात असल्याचे क्वचितच ऐकले असेल.

जगात अशी सुद्धा एक जागा आहे. इराण देशात ‘होरमुझ’ हे एक असे बेट आहे जिथली माती ही ‘मसाला’ म्हणून वापरण्याचा कित्येक वर्षांपासून ‘रिवाझ’ आहे. कुठे आहे हे ‘होरमुझ’ बेट? कधीपासून ही सुरुवात झाली? जाणून घेऊयात.

 

homruz island inmarathi

 

इराणमधील ‘होरमुझ’ हे बेट ‘रेनबो’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. ‘होरमुझ’ या बेटावर जगात इतर कुठेही नसलेल्या पर्वतरांगा आहेत ज्यांची माती ही खाण्याजोगी आहे. ‘होरमुझ’मध्ये राहणारे स्थानिक रहिवासी या बेटावरील लाल माती ही एखाद्या ब्रेडवरील ‘सॉस’, चटणीप्रमाणे लावून खात असतात.

इतकेच नव्हे, तर इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा इथल्या चिखलाचा सुद्धा आस्वाद घेत असतो. गल्फ देशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या इराणमधील ‘होरमुझ’ची दुबई सारखी मार्केटिंग मात्र झालेली नाही.

‘होरमुझ’ बेटावरील मातीला ‘जिलैक माती’ म्हणजेच मसाल्यासारखी दिसणारी ‘लाल माती’ म्हणून सुद्धा ओळखले जाते.

 

hormuz island sand inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 —

ही माती वाळवंटातील मातीत सापडणाऱ्या ‘हेमाटिट’ या लोहापासून बनवली जात असल्याने यामध्ये पाचक द्रव्य असतात. ‘जिलैक’ या मातीची काही व्यापारी विक्री, निर्यात करत असतात.

‘होरमुझ’च्या पश्चिमेस काही असेही मीठाचे पर्वत आहेत ज्यांची माती ही आरोग्यासाठी चांगली आहे असे इराणमधील डॉक्टर सांगत असतात. स्थापनेपासूनच ‘राजकीय अस्थिरता’, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असलेला इराण देश ‘होरमुझ’ या सुंदर बेटाला ‘मालदीव’ प्रमाणे प्रचलित करू शकला नाही याची त्यांना आज खंत वाटते.

 

iran flag inmarathi

इराण देशाच्या दक्षिणेस असलेल्या ‘होरमुझ’ या बेटाची दुसरी बाजू ही ओमानमधील समुद्राला जोडली गेलेली आहे. ‘होरमुझ’च्या या भागाला ‘पर्शियन गल्फ’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात कमी तापमान असल्याने ‘होरमुझ’ला सर्वात जास्त पर्यटक भेट देत असतात.

१२९० मध्ये मार्को पोलो या पर्यटकाने सर्वप्रथम ‘होरमुझ’ला भेट दिल्याची नोंद केलेली आहे. ‘इब्न बटुटा’ या व्यक्तीच्या ‘होरमुझ’ला दिलेल्या भेटीनंतर ही जागा जास्त प्रचलित झाल्याचे म्हटले जाते.

१५ व्या शतकात पोर्तुगीजच्या खलाश्यांनी एकत्र येऊन इथे ‘पोर्तुगीज किल्ला’ बांधला. ‘होरमुझ’ बेटावर होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्याची पूर्वसूचना मिळणे, हा किल्ला बांधण्यामागे पोर्तुगीज लोकांचा उद्देश होता.

पोर्तुगीज लोक जेव्हा गोवा किंवा गुजरात राज्यात व्यापार करण्यासाठी समुद्र मार्गाने यायचे तेव्हा ‘होरमुझ’ या बेटावर एक विसावा घेत असल्याची काही चित्रस्वरूपातील नोंद इथे आहे. १६२२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ‘होरमुझ’ हे बेट पोर्तुगीज लोकांकडून जिंकले होते.

‘होरमुझ’ बेटावर खाण्या योग्य मातीसोबतच काही प्राण्यांच्या मूर्ती सुद्धा आहेत ज्यामध्ये ‘ड्रॅगन’ आणि काही पक्ष्यांच्या मूर्तींचा समावेश होतो. विविध रंगांची माती असलेल्या पर्वतरांगा हे ‘होरमुझ’ बेटाचं वैशिष्ट्य मानले जाते. ‘होरमुझ’ बेटावर डॉक्टर नदालीयन या आंतरराष्ट्रीय मूर्तिकाराच्या मूर्तींचे संग्रहालय सुद्धा आहे.

 

hormuz rainbow island inmarathi

 

तुम्हाला जर पर्यटनाची आवड असेल आणि आखाती देशांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर इराण मधील ‘होरमुझ’चा समावेश तुम्ही तिथल्या मातीची चव घेण्यासाठी तुमच्या यादीत नक्कीच करायला पाहिजे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 ===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?