' भारतातलं एकमेव देवीचं मंदिर जे फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी उघडलं जातं

भारतातलं एकमेव देवीचं मंदिर जे फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी उघडलं जातं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वीच्या काळी माणूस आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निसर्गपूजा करत होता. आपल्या या कृतज्ञतेला मूर्त रूप येण्यासाठी पुढच्या काळात त्याने निसर्ग शक्तींना देवी देवतांचे रूप दिले. त्यातीलच एक देवतासमूह म्हणजे ‘सप्त मातृका’ होत. या सप्त मातृकांचे पूजन कोणत्याही शुभ-अशुभ( श्राद्ध, पक्ष ) कार्याच्या आधी केले जाते. यांनाच बोली भाषेत ‘साती आसरा’ असेही म्हटले जाते.

काही वेळा या समूहात ‘नारसिंही’ देवीचाही समावेश होतो. तेव्हा या समूहाला अष्टमातृका असे म्हणतात. शाक्त पंथ आणि तंत्रयोग यांमध्ये या सप्त मातृका पूजल्या जातात. जगभरात अनेक ठिकाणी या सप्त मातृकांची मंदिरे आहेत.

 

sapt inmarathi

 

पूर्वी जे अनार्य होते ते या मातृकांची जलदेवता किंवा ‘गोडेस ऑफ फर्टिलिटी’ या रूपात पुजा करीत असत. त्यांना लज्जागौरी देखील म्हंटले जात असे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेरूळ,भुलेश्वर, खिद्रापूर अशा ठिकाणी मंदिरांमध्ये सप्तमातृकांचे दर्शन होते.

आपल्याकडे दक्षिण भारत हा शैव आणि शाक्त उपासना करणारा म्हणजेच शिव आणि शक्ति यांची उपासना करणारा मोठा प्रदेश आहे. या भागात बर्‍याच ठिकाणी या सप्तमातृका दिसून येतात. हे सगळे सांगण्यामागचे कारण आहे कर्नाटकातील म्हैसूरहसन जिल्ह्यातील ‘हसनांबा मंदिर’ जे या सप्त मातृकांचे मंदिर आहे. ब्राह्मी (ब्रह्मिणी), वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा, अशा या सात मातृदेवता आहेत.

 

hasnamba inmarathi

 

पुरातत्वशास्त्रज्ञ हसनंबा मंदिराला कर्नाटकातील मंदिर स्थापत्य कलेचे प्रतीक मानतात. हसन शहर ११ व्या शतकातील आहे आणि हसनच्या सभोवतालची मंदिरे ११ व्या शतकापासून राज्य करणाऱ्या विविध राजवंशांचे प्रतिनिधित्व करतात. तरीही ही मंदिरे मूलतः होयसाळ घराण्याने त्यांच्या स्वतःच्या परंपरेनुसार बांधले होती, जी देवीप्रती त्यांची श्रद्धा दर्शवतात. त्या मंदिरांपाइकी एक ‘हसनंबा मंदिर’ हे देवी शक्ती किंवा अंबा यांना समर्पित असून, कर्नाटकातील हसन येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे.

 

hasan inmarathi 2

पौराणिक कथा :

हे मंदिर १२ व्या शतकात बांधले गेले होते. या मागे एक कथा देखील प्रचलित आहे ती अशी की एकदा या सप्त मातृका फिरत फिरत हसन परिसरात आल्या. त्यांना हा परिसर खूप आवडला इथल्या निसर्ग सौंदर्याने त्या मोहित झाल्या आणि त्यांनी इथेच ( हसन मध्ये ) राहायचे ठरवले.

माहेश्वरी, कौमरी आणि वैष्णवी या तिघी मंदिरात राहिल्या; किंचम्मा होसाकोटे येथे ब्राह्मी, तर इंद्राणी, वाराही आणि चामुंडी यांनी देवीगेरे होंडा येथील तीन विहिरी निवडल्या. हसनंबा मंदिरातील प्रमुख देवतेच्या नावावरून शहराचे हसन हे नाव देण्यात आले.

hasan inmarathi 1

 

मंदिरातील मुख्य देवतेला हसनांबा म्हणतात कारण ती तिच्या भक्तांना सुखी समाधानी झाल्याचे पाहून ती आनंदाने हसत असते. वर्दयींनी म्हणून तिची पुजा होत असली तरी आपल्या भक्तांना त्रास देणार्‍या लोकांसाठी ती तेवढीच कठोर आहे.

मंदिराच्या आवारात एक मुंग्यांचे वारूळ आहे जे देवीचे प्रतीक मानले जाते. मग, हे मंदिर इतके वेगळे आणि महत्त्वाचे का आहे? पौराणिक कथेनुसार, फार पूर्वी, अंधकासुर नावाचा राक्षस होता, ज्याने कठोर तपश्चर्येनंतर ब्रह्मदेवाकडून अजिंक्य होण्यासाठी वरदान मिळवले.

नव्याने मिळवलेल्या शक्तीने त्याने सर्वत्र कहर माजवला. भगवान शिवांनी जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जो जमिनीवर पडला तो राक्षस बनला आणि अनियंत्रित झाला. शिवाने आपल्या सामर्थ्याने योगेश्वरी नावाची देवी निर्माण केली, जिने सप्तमातृकासह – ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडी – राक्षसाचा अंत घडवून आणला होता. या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी जागेचा शोध घेत या मातृका हसन मध्ये आल्या असाव्यात.

 

shankar inmarathi
momjunction.com

होयसाळ काळातील स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात अनेक वैशिष्ठ्ये आहेत. मंदिरात प्रवेश केला की लगेच सिद्धेश्वर स्वामींचे एक सुंदर शिल्प पाहावयास मिळते. ते असामान्य आहे कारण इतर शिल्पांसारखे ते लिंग स्वरूपात नसून ते भगवान शिव स्वरुपात आहे.

मंदिर आवारात एक दगड आहे.त्यामागेही एक कथा आहे. एक सून रोज देवीला भेटायला येत असे. एक दिवस तिच्या सासूने सुनेच्या दिशेने दगड भिरकवला जो लागून सून जखमी झाली आणि देवीकडे मदत याचना करू लागली. तेव्हा देवीने तिला दगड बनवून आपल्या मंदिरात स्थान दिले.

 

hasan inmarathi 5

 

हा दगड दरवर्षी एक इंच पुढे सरकतो. तो जेव्हा देवीच्या पायाजवळ येईल तेव्हा कलियुगाचा अंत होईल अशीही एक रंजक उपकथा त्यात आहे. आणखी एक कथा अशी की काही दरोडेखोरांनी देवीचे दागिने लुटण्याचे ठरवले हे देवीला कळताच तिने त्यांना दगड बनवले. यासाठी या मंदिराला ‘कल्लाप्पानागुडी’ असेही म्हणतात.

 

hasan inmarathi 3

इथले आणखी एक वैशिष्ट्य हे की मंदिराच्या गर्भगृहात रावणाची प्रतिमा स्थापित आहे, पण नवळची गोष्ट म्हणजे या प्रतिमेतील रावणाला नऊ तोंडे आहेत आणि तो वीणा वादन करतो आहे. रावणाच्या या भक्तीभावाचा आदर करण्यासाठी दर आमवस्येला भक्त लोक मंदिरात येवून रावणाच्या प्रतिमेचे पूजन करतात.

मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे हे मंदिर दरवर्षी फक्त एक आठवडा भक्तांसाठी खुले असते. उर्वरित वर्षात देवीला दिवा, फुले, पाणी आणि दोन पोती तांदळाचा नैवेद्य पुढील वर्षापर्यंत ठेवला जातो.

 

hasnamba inmarathi 1

 

मंदिर बंद होण्याच्या संपूर्ण कालावधीत, लावलेला नंदादीप, (तुपाचा दिवा) त्यातील तूप कधीही कमी झालेले दिसत नाही. देवतेला (देवी) अर्पण केलेला अन्न नैवेद्य / भात (तांदळाचा नैवेद्य ) उबदार राहतो खराब होत नाही आणि देवीला मंदिर बंद करताना वाहिलेली फुले तशीच ताजी राहतात.

मंदिर बंद करण्याच्या वेळी एक वर्षानंतर दरवाजे पुन्हा उघडले जातात तेव्हा त्याचा परिणाम होत नाही. संपूर्ण कर्नाटकात हे महान मंदिर म्हणून पूजनीय आहे . दरवर्षी या काळात हजारो लोक देवीचे दर्शन घेतात. कर्नाटक सरकारने आता या मंदिराला ‘ए ‘ ग्रेड सुविधा दिल्या आहेत.

दरवर्षी केवळ दिवाळीच्या काळात हे मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी उघडणारे हे मंदिर नंतर फक्त एक आठवडा उघडे ठेवले जाते. हिंदू कालगणनेनुसार हा कालावधी दरवर्षी बदलतो. आश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या पुढील गुरुवारी मंदिर उघडले जाते व बलिप्रतिपदेच्या दिवशी बंद होते. याच काळात देवीचा रथोत्सव देखील साजरा केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?