' पारिजात जसा दिसायला सुंदर आहे तसाच आरोग्यदायी सुद्धा! हे ७ फायदे माहित हवेत… – InMarathi

पारिजात जसा दिसायला सुंदर आहे तसाच आरोग्यदायी सुद्धा! हे ७ फायदे माहित हवेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निसर्गाचे अद्भुत सौंदर्य अनुभवायला, निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडणार नाही? सुंदर झाडे, नद्या, डोंगर, पर्वतरांगा यांचा समावेश निसर्गामध्ये होतो.

आपल्या देशात खूप प्रकारची, रंगांची, रूपांची, आकारांची फुलझाडे आहेत. प्रत्येकाची काही खास वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत.

पारिजात हे त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण असं फुल आहे. पौराणिक काळामध्ये पारिजात हे कृष्णाचं आवडतं फुल आहे असं मानलं जात असे. तर याला नाईट जस्मिन असंही म्हणाल जातं. सात-आठ पाकळ्या असलेले, लाल रंगाच्या देठाचे, पांढऱ्या रंगाचे सुगंध देणारे हे फुल आहे. रात्रीच्या वेळी या फुलांच्या वासाने मन प्रसन्न होते.

 

parijat inmarathi

 

हे फुल फक्त सुगंध देत नाही तर मुळापासून ते फांद्यापर्यंत याचा प्रत्येक भाग खूप उपयुक्त आणि आरोग्याला फायदे देणारा आहे.

बघुया या फुलाचे आरोग्यदायी फायदे :-

१. विविध आजारामध्ये येणारा ताप कमी करण्यासाठी

पारिजाताच्या फांद्या डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गूनियासारख्या आजारामध्ये आलेला ताप कमी करण्यासाठी होतो. डेंग्यू आणि चिकन गुनिया  तापाच्या काळात फांद्यामध्ये असलेले इथेनॉल platelate वाढवण्यासाठी मदत करते.

 

platelets inmarathi

 

यासाठी १ चमचा पारिजाताच्या फांद्यांची पावडर २ कप पाण्यात उकळून घ्या. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्यावे. याचा काढा प्यायल्याने ताप कमी होतो.

२. सांधेदुखी आणि पाठदुखीसाठी

५-६ थेंब पारिजात तेल खोबरेल तेलात मिसळा आणि जिथे दुखत आहे तिथे लावा. त्यामुळे पाठदुखी आणि सांधेदुखी कमी होईल.

 

joint pain inmarathi

 

३. कोरडा खोकला

पारिजाताच्या पानांपासून आणि फुलांपासून बनवलेला चहा खोकला कमी करतो. इतकेच नाही तर सर्दी, फुफुसाचा त्रास सुद्धा कमी होतो. पारिजातामध्ये असलेले इथनोल हे दम्याच्या आजारांवर अत्यंत उपयुक्त आहे हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.

 

Cough and congestion IM

 

त्यासाठी परिजातची काही पाने आणि फुले घ्या,आद्रक टाकून दोन कप पाण्यात ५-७ मिनिटे उकळून घ्या आणि मध टाकून प्या.यामुळे खोकला, दमा,फुफुसाचे विकार कमी होतील.

४. सर्व प्रकारच्या जंतुसाठी,अॅलर्जीसाठी उपयुक्त

पारिजाताचं तेल हे सर्व प्रकारच्या जंतुसाठी, संसर्गासाठी उपयुक्त मानलं जातं. जसं की फंगल इन्फेक्शन… पारिजाताचं तेल त्वचाविकारासाठी सुद्धा उपयुक्त आहे.

 

allergy inmarathi

 

५. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

पारिजात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. यासाठी २०-२५ पाने आणि फुले कुटून घ्या, एक ग्लास पाण्यात उकळत ठेवा. अर्धे होईपर्यंत ते उकळू द्या. तयार रसाचे तीन समान भाग करा आणि सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी प्या. जेवणाआधी एक तास हा रस दोन महिने घ्या. तुमच्यातील प्रतिकारशक्ती वाढेल.

 

immunity inmarathi

 

६. मधुमेह नियंत्रित करते

पारिजताची फुले उच्च रक्तदाब आणि शुगर लेव्हल नियंत्रित करतात, हे अभ्यासानुसार सिद्ध झालं आहे.

७. केसांच्या समस्या दूर करते

पारिजाताच्या बिया केसामधील कोंडा नियंत्रित करण्याचे काम करतात. तसंच यामुळे केस दाट होतात, केस गळती कमी होते, केस कोरडे किंवा रुक्ष होत नाहीत. अशा प्रकारे केसांच्या सगळ्या समस्यांवर पारिजात टॉनिक प्रमाणे काम करते.

 

indian actor long hair inmarathi

 

असा होऊ शकतो परिणाम…

पारिजाताचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो, capsule, गोळ्या, पावडर, तेल किंवा त्याचा चहा बनवून आपण त्याचे सेवन करू शकतो.

पारिजाताच्या अति सेवनामुळे काही चुकीचे परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारिजाताची पाने चवीला अतिशय कडू लागतात त्यामुळे सुरुवातीला काही जणांना मळमळ, उलटी होण्याची शक्यता असते. पोटाचे विकार किंवा जुलाब होणे असा त्रास होऊ शकतो. उलटी आणि पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

 

stomach ache inmarathistomach ache inmarathi

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा

 ===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?