' स्वतःची २ एकर जमीन पोटच्या पोरासाठी नव्हे, तर पक्ष्यांच्या नावे करून ठेवणारं जोडपं – InMarathi

स्वतःची २ एकर जमीन पोटच्या पोरासाठी नव्हे, तर पक्ष्यांच्या नावे करून ठेवणारं जोडपं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वृक्षवल्ली आम्हा सोयरी…’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते म्हणणे आणि केवळ न म्हणता कृतीत आणणे यात किती फरक आहे हे अनुभव घेतलात की तुम्हाला समजेलच. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंग च्या तडाख्यात अनेक प्राणी ,पक्षी आपल्या डोळ्यांदेखत नाहीसे होत आहेत.

यात पेंग्विनपासून गिधाडापर्यन्त आणि निळ्या देवमाशापासून चिमणी पर्यन्त अनेक पशू,पक्षी आहेत जे अन्न, पाणी, निवारा, त्यांचा संपलेला अधिवास यांमुळे नामशेष होत आहेत. याला जबाबदार आपणच म्हणजे मनुष्यप्राणी आहोत.

तुम्ही रोबोट-२ या सिनेमात पहिले असेलच की नवीन तंत्रज्ञानाच्या अतिवापराने पक्षीजगावर किती भयानक परिणाम होत आहे, त्यांची प्रजननाची क्षमता संपत चालली आहे. मोबाइल मधून निघणार्‍या अतिनील किरणांमुळे पक्षी आपली मार्गक्रमणाची दिशाच विसरत चालले आहेत. ते आपले विसावे विसरत आहेत हे किती भयंकर आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे सांगण्यामागचे कारण काय? तर मित्रांनो हाच तर लेखाचा विषय आहे.

 

birds inmarathi

 

होय! कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बंटवाल तालुक्यात ‘एलियानागुडू’ नावाचे गाव आहे. या गावात एक विलक्षण जोडपे राहते. त्यांची उपजीविका शेतीवर होत असली तरी त्यांचे वेगळेपण दुसरेच आहे.

ते वेगळेपण हे आहे की, हे जोडपे जवळपास ९३ प्रजातीच्या पक्षांचे पालनकर्ते आहेत, इतकेच नाही तर वेळप्रसंगी स्वत: सामान आणून किंवा ओळखीच्या लोकांकडून गोळा करून हे दोघे नवरा-बायको चक्क पक्षांसाठी बांबू,कागदी बॉक्स, मातीची मडकी यांच्या सहाय्याने घरटी बनवतात.

ज्यांना कुणाला ही घरटी आपल्या बागेमध्ये, घराबाहेर लावायला हवी असतात त्यांना ते ती घरटी विनामूल्य देतात. पक्षांना त्यांचा निवारा मिळावा एवढाच उद्देश त्यांच्या या कृतीमागे असतो. आपल्याकडील तब्बल दोन एकर जमीन त्यांनी या पक्षांसाठी राखीव ठेवली आहे.

 

indian bird inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आपले जीवन समर्पित करणारे नित्यानंद शेट्टी आणि रम्या नित्यानंद शेट्टी हे दाम्पत्य केवळ पक्ष्यांसाठी दोन एकर जमिनीवर झाडे लावत आहेत. या जोडप्याने पक्षी, विशेषत: चिमण्या वाचविण्याबाबत शाळकरी मुले आणि प्रौढांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘स्पॅरो नेस्ट अवेअरनेस कॅम्पेन’ सुरू केली आहे.

पक्षांची तहान शमवण्यासाठी, त्यांना निवारा मिळण्यासाठी पुठ्ठे आणि बांबूचे घरटे आणि मातीची भांडी बनवतात. ते लोकांमध्ये पक्ष्यांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करतात. त्यांनी आपल्या जमिनीत अनेक फळे देणारी झाडे लावली आहेत आणि पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नाने भरलेली मातीची भांडी ठेवली आहेत. त्यांच्या घराजवळून जाताना नेहमी सर्व दिशांनी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.

 

nityanand inmarathi 2

 

“परोपकाराची सुरुवात घरापासून होते, परंतु तिथेच ती संपू नये.” या म्हणीचा अवलंब केला आहे अर्थशास्त्रातील पदव्युत्तर ३६ वर्षीय, ‘गुब्बाचीची गुडू’ अभियानाचे संस्थापक नित्यानंद शेट्टी यांनी! ज्यांनी पक्ष्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा मंच सुरू केला.

ही म्हण गेल्या सात वर्षांपासून आपल्या जीवनाचा मंत्र म्हणून त्यांनी स्वीकारली आहे आणि किलबिलत्या पक्ष्यांना विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली आहे. शेट्टी यांची २६ वर्षीय पत्नी रम्या, एक M.Com पदवीधर आहेत, यांनी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी लाकूड, बांबू आणि मातीची भांडी यांपासूनन बनवलेली घरटी इतरांमध्ये वाटून पक्ष्यांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे.

 

nityanand inmarathi
ETV bharat

पक्ष्यांचे महत्त्व आणि पर्यावरणातील त्यांचे योगदान याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठीही हे जोडपे प्रयत्नशील आहे. उदरनिर्वाहासाठी बागायती पिके घेणार्‍या या शेतकरी दाम्पत्याने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल तालुक्यातील इलियानाडुगोडू येथे दोन एकर जमिनीवर चिक्कू, पेरू,केळी आणि फणस यांसारखी विविध फळे देणारी झाडे लावून या आकाशात विहरणार्‍या पाहुण्यांसाठी आश्रयस्थान निर्माण केले आहे.

शेट्टी म्हणतात की, त्यांना या गोष्टी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी घरापासून कुठेही लांब जावे लागले नाही. लहानपणी, त्यांनी त्याच्या आईला नेहमी पक्ष्यांशी दयाळूपणे वागताना पाहिले आणि त्याचा त्यांच्यावर जीवन बदलणारा परिणाम झाला, इतका की आता पक्षी संगोपन, त्यांच्याविषयी जनजागृती हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय झाले आहे.

“पक्ष्यांनाही भूक आणि तहान लागते.आपल्याला अन्न आणि पाणी उपलब्ध नसेल तर आपल्याला किती असहाय्य वाटते? पक्षी तर तेवढेही सांगू शकत नाहीत.” शेट्टी म्हणतात.एक उदाहरण शेअर करताना ते सांगतात की, त्यांना एकदा एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला की,

तो त्याच्या घराबाहेरील झाडांवर दोन घरटी लावू शकेल का? काही तासांतच शेट्टी त्यांच्या दुचाकीवरून तीन घरटी घेऊन गेले. त्यांनी फोन करणार्‍याला दोन घरटी दिली आणि त्याला विचारले की कोणाला अतिरिक्त घरटे हवे आहे का? आणि जेव्हा कॉलरने शेट्टीला सेवेसाठी पैसे देण्यासाठी खिशातून काही नोटा काढल्या तेव्हा शेट्टीनी पैसे घेण्यास नकार दिला.

 

bird inmarathi
Ameature club foundation

 

शेट्टी दाम्पत्य त्यांच्या उदात्त कार्यासाठी एकही पैसा स्वीकारत नाही आणि त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशातून ते या चिमुकल्या जीवांसाठी खर्च करतात. हे जोडपे त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासोबत राहतात आणि साधे जीवन जगतात. गेल्या सात वर्षांत, या जोडप्याने दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील शेकडो रहिवाशांना १००० हून अधिक घरट्यांचे वाटप केले आहे. त्यांनी शाळा आणि गावांमध्ये पक्षी संवर्धनाचे महत्त्व या विषयावर शेकडो भाषणे दिली आहेत.

पक्षी प्रजननासाठी दूरदूरच्या ठिकाणी स्थलांतरित होतात. पण जर ते अन्न आणि पाण्यासाठी स्थलांतरित झाले तर ही गोष्ट माणसासाठी फायद्याची नक्कीच नाही. शेट्टी यांच्या या खास शेतात कावळा, ग्रेट कॉर्मोरंट, घुबड, किंगफिशर, क्रेन, कबूतर, बुलबुल, मोर, सूर्यपक्षी, सामान्य मैना, राखाडी जंगली मैना, कोकिळा, ठिपकेदार मुनिया, पॅराकीट, वुडपेकर, हिरवे कबूतर, भारतीय तलावातील बगळे असे विविध पक्षी राहतात.

 

bird 1 inmarathi

“पक्ष्यांचे संवर्धन ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही ‘स्पॅरो नेस्ट अवेअरनेस कॅम्पेन’ सुरू केले आहे. आम्ही याआधी २०५ शाळांना भेट दिली आहे. आम्ही कुठेही गेलो तरी पक्षी संवर्धनाची माहिती देताना आम्हाला आनंद वाटतो.” नित्यानंद शेट्टी नेहमी आपल्या भाषणात सांगतात.

लेख कसा वाटला जरूर कळवा आणि अशाच काही जगावेगळ्या कहाण्या असतील तर जरूर आमच्या सोबत शेअर करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?