' इंटरनेट विश्वाची अशी बाजू जिथे अनेक काळे धंदे राजरोसपणे सुरू असतात! – InMarathi

इंटरनेट विश्वाची अशी बाजू जिथे अनेक काळे धंदे राजरोसपणे सुरू असतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट


व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०१४ सालचा आणि पाठोपाठ २०१८ साली आलेला Unfriended नावाचा इंग्रजी सिनेमा बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. इंटरनेट विश्वातली एक काळीकुट्ट बाजू या सिनेमातून प्रभावीपणे दाखवली आहे.

अमेरिकेतल्या काही तरुण मित्र मैत्रिणींच्या स्काइप व्हीडिओ कॉलमध्ये एक अनोळखी व्यक्ति सामील होते आणि ती व्यक्ति त्यांचं आयुष्य उध्वस्त करते. याच इंटरनेटच्या एका अशा जगाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

 

unfriended inmarathi

 

संपूर्ण जग आज एकाच गोष्टीवर चालतं ते म्हणजे इंटरनेट. हे वास्तव कुणीच नाकारू शकत नाही, आज इंटरनेटच्या प्रगतीमुळे माणूस सातासमुद्रापारच नाही तर चक्क मंगळापर्यंत जाऊन पोहोचलाय.

याच इंटरनेटची आणखीन एक भयावह बाजू आहे जी सहसा लोकांसमोर आलेली नाहीये. टेक्निकल टर्म्समध्ये इंटरनेटच्या या काळ्या विश्वाला डार्क वेब असंही म्हणतात.

नेमकं हे डार्क वेब म्हणजे काय? आणि तस्करीपासून खून आत्महत्येसारखे गंभीर गुन्हे इथे सर्रास होतात, त्यामागे नेमकं कोण असतं? कोण या गोष्टी हाताळतं, याविषयी आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया!

डार्क वेब म्हणजे नेमकं काय?

वर्ल्ड वाइड वेबचा एक हिस्सा म्हणजे डार्क वेब, यालाच डार्क नेटसुद्धा म्हणतात. असं म्हणतात की जगातल्या इंटरनेटपैकी ९६ % भाग हा डार्क वेबने व्यापलेला असून, त्याविषयी फारशी कोणालाच माहिती नाही, यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या साईट्सवर आपल्या कुणालाच थेट पोहचता येत नाही.

 

dark web inmarathi

डार्क वेबच्या साईट्स या सहज कोणालाच सापडत नाही, गुगलसारख्या सर्च इंजिनवरुनसुद्धा या साईट्सना भेट देणं शक्य नसतं.

तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य लोकं ज्या इंटरनेटचा वापर करतात त्याला लेमॅन भाषेत सरफेस वेब असं म्हणतात आणि इंटरनेट विश्वाचा फक्त ४ % भाग हा सरफेस वेबने व्यापलेला आहे असा काही तज्ञांचा दावा आहे.

याचा साधा अर्थ असा निघतो, की इंटरनेट म्हणजे एक हिमनग आहे आणि त्याचा तुटपुंजा भागच आपल्यासमोर आहे, उर्वरित हिमनग आपल्या दृष्टीस पडतही नाही आणि हीच चिंतेची बाब आहे.

ज्या वेबसाईट्स तुम्हाला बिना परवानगी बघता येत नाहीत, किंवा ज्या वेबसाईट्सचा कंटेंट बघण्यासाठी तुम्हाला तुमचं अकाऊंट बनवावं लागतं अशा साईट्सना डिप वेब असंही म्हणतात, नॉर्मल सर्च इंजिनच्या रडारबाहेरच्या साईट्स जरी असल्या तरी डिप वेबमधल्या काही साईट्स तुम्ही वापरू शकता.

या सगळ्यापलीकडे अशा काही साईट्स आहेत ज्या नॉर्मल सर्च इंजिनद्वारे दिसत नाही, त्या छुप्या असतात, आणि या वेबसाईटचा अॅक्सेस मिळवण्यासाठी एका विशिष्ट वेगळ्या ब्राऊजरची आवश्यकता असते, यालाच डार्क वेब असं म्हणतात.

डार्क वेबची माहिती कोणाला असते?

आपल्यासारख्या लोकांना या साईट्सबद्दल काहीच माहिती नसते, डार्क वेबच्या या साईट्सचा वापर काही विशिष्ट लोकंच करू शकतात ज्यामध्ये गुन्हेगारसुद्धा सामील आहेत.

 

dark web 2 inmarathi

 

गुन्हेगार तसेच विविध प्रकारचे हॅकर्स यांच्यासाठी डार्क वेब हा त्यांचा लाडका अड्डा असतो. जगभरातले असंख्य गैरव्यवहार या डार्क वेबच्या माध्यमातूनच होत असतात.

ड्रग्स तस्करी, पॉर्न, शस्त्रांची देवाणघेवाण, मानवी तस्करी, चोरलेल्या क्रेडिट कार्डचे गैरव्यवहार यांच्यापासून खून आत्महत्येसारखे गंभीर गुन्हे या डार्कवेबच्या मुखवट्याआड होतात.

डार्क वेबची सुरुवात कुठून झाली?

जेव्हा इंटरनेटचा जन्म झाला तेव्हाच खरंतर या डार्क वेबचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो, आणि इंटरनेटच्या जन्मानंतरच डार्क वेबवरच्या या गैरव्यवहारांना चालना मिळाली.

१९७० च्या दशकात आर्पानेट नेटवर्कचा वापर करून MIT च्या विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवले जायचं. खरंतर या सगळ्याची खरी सुरुवात २००० मध्ये झाली जेव्हा freenet ही साईट लॉंच झाली, आणि या साईटच्या माध्यमातून खोटी ओळख निर्माण करून इंटरनेटवरचा वावर अगदी सोपा झाला, आजही ही साईट कार्यरत आहे.

डार्क वेबच्या विश्वात खरी क्रांति तेव्हा आली जेव्हा TOR (The Onion Router) नावाचं ब्राऊजर लॉंच केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून डार्क वेबमध्ये शिरणं आणखीन सोप्पं झालं.

 

tor inmarathi

 

याआधीही खऱ्या जगात अनेक गैरव्यवहार होत असत, पण त्यासाठी रोकड रकमेची गरज होती. इंटरनेटच्या क्रांतिमुळे २००९ मध्ये Bitcoin ही Cryptocurrency लॉंच झाली आणि इंटरनेट विश्वातली आणि खासकरून या डार्क वेबची सगळीच गणितं बदलली.

आजही बिटकॉईनचा वापर डार्क वेबच्या विश्वात सर्रास केला जातो आणि त्यांच्याच माध्यमातून तिथले सगळे गैरव्यवहार सुरू असतात असं तज्ञांचं म्हणणं आहे.

याच डार्कनेट विश्वाचा वापर करून Silk Road नामक एक प्लॅटफॉर्म मध्यंतरी कार्यरत होता ज्याच्या माध्यमातून कोणतेही अवैध ड्रग्स ब्लॅक मार्केटमध्ये विकले जात होते, आता या प्लॅटफॉर्मवर कायमची बंदी आलेली आहे.

 

silk road drugs inmarathi

डार्क वेबमध्ये शिरणं कितपत योग्य आहे?

डार्क वेबमध्ये शिरणं तुम्हाला वाटतं तितकं अवघडही नाहीये, पण या विश्वात शिरताना तुमच्या सिस्टिममधला डेटा आणि त्याची सुरक्षितता ही खूप जास्त महत्वाची असते.

VPN किंवा वेगळा ब्राऊजर वापरुन तुम्ही डार्क वेबचा अॅक्सेस मिळवू शकता पण ते तुमच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे हेदेखील ध्यानात ठेवायलाच हवं!

डार्क वेब खरंच धोकादायक आहे का?

तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा आहे. जसं डार्क वेबमधून surfing करणं किंवा माहीती मिळवणं सोप्पं आहे तसेच डार्क वेबचे अनेक तोटेसुद्धा आहेत.

एकदा का तुम्ही या डार्क वेबमध्ये शिरलात की, तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस जाण्याची दाट शक्यता असते, याबरोबच फिशिंगमुळे तुमचं बँक अकाऊंट तसेच वेबकॅमसुद्धा हॅक होऊ शकतात, ज्याचा तुम्हाला चांगलाच फटका बसू शकतो.

 

dark web 3 inmarathi

 

तुमचा खासगी डेटा तर नक्कीच चोरला जाऊ शकतो पण याबरोबरच डार्क वेबमधल्या वेगवेगळ्या साईट्सच्या कंटेंटमुळे तुमच्या मनावर आणि डोक्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

हे सगळे धोके वाचून आणि एकंदरच या इंटरनेट विश्वाचं काळंकुट्ट वास्तव बघून तुम्हालासुद्धा भीती मनात बसली असेल, पण या लेखातून इंटरनेटचा वापर केवढा केला पाहिजे, आणि कसा केला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल


इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा:
इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?