' ना जाहिरात, ना सिनेमा, तरी सगळ्यांची आवडती रेखा स्वतःचं घर कसं चालवते..वाचा!

ना जाहिरात, ना सिनेमा, तरी सगळ्यांची आवडती रेखा स्वतःचं घर कसं चालवते..वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलिवुड आणि त्यांची महागडी रहाणी हा नेमहीच चर्चेचा विषय असतो. अशातच काही कलाकार वर्षानुवर्षं काम करताना दिसत नाहीत की चित्रपटांतून भूमिका करताना दिसत नाही मात्र त्यांच्या रहाणीमानात काहीच फरक पडलेला नसतो.

या कलाकारांचा उदरनिर्वाह नेमका कसा चालतो? हा प्रश्न सामान्यांना नेहमीच पडत असतो. असंच एक नाव आहे, रेखा. गेली अनेक वर्षं रेखा चित्रपटांतून गायब आहे तरीही तिचा उदरनिर्वाह कसा चालतो?

 

rekha inmarathi

 

बॉलिवुड हे चमकणारं जग आहे. इथे रहायचं तर तुमची भपकेबाज रहाणी आवश्यक आहेत. पार्ट्या असोत की प्रिमियर की पुरस्कार सोहळे इथे तुम्ही महागडे कपडे घालून मिरवलं पाहिजे. पण मग असं मिरवायचं तर खर्चही तितकाच आहे आणि खर्च म्हणला की उत्पन्न आलंच.

आज अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी वर्षानुवर्षं एकही सिनेमा केलेला नाही. त्यांचं घर कसं चालतं हा सामान्यांना पडणारा प्रश्न आहे.

८० चं दशक गाजविणारी अभिनेत्री रेखा. आजही पुरस्कार सोहळ्यात जीची उपस्थिती अनिवार्य मानलं जातं असं नाव. गत पिढीतल्या या सुपरस्टारनं पडद्याला राम राम करूनही बराच काळ उलटला आहे. कसं चालतं रेखाचं घर? तिच्या उत्पन्नाचा सोर्स काय आहे?

रेखा ही नेहमीच व्यवहारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. लहान वयातच सिनेमात कामं करून कुटुंबाची उपजिविका करणार्‍या रेखानं अनेक वर्षं कुटूंबावर विश्र्वास ठेवून फक्त काम केलं. कधीच आपल्याला मिळालेल्या पैशांचं कुटूंब काय करतं? हे विचारलं नाही मात्र एक वेळ अशी आली की रेखाचे डोळे उघडले.

 

rekha 2 inmarathi

आपण घाण्याला जुंपल्यासारखे काम करत असताना कुटुंब मात्र सुखनैव रहात आहे हे तिला समजल्यावर तिनं हळूह्ळू हिशोबाच्या नाड्या आपल्या हातात घेत आर्थिक नियोजन करायला सुरवात केली.

बचतीचं महत्त्व जणणरी रेखा नेहमीच आर्थिक गुंतवणुकीवर भर देणारी होती. तिची ही दूरदृष्टीच आज तिचआ उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. रेखाच्या रहाणीमानावर दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येईल की भपकेबाजपणा टाळणं, अनावश्यक खर्च न करणं हे तिनं कायम पाळलं आहे.

अगदी तिच्या सुप्रसिध्द सोनेरी कांजीवरमही. तिला एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता की दरवेळेस असा परफेक्ट लूक कसा काय जमतो? तिच्याकडे नेमक्या किती कांजीवरम आहेत?

यावर तिनं उत्तर दिलं होतं की, खरंतर माझ्याकडे अगदी मोजक्या कांजीवरम आहेत मात्र मी दरवेळेस त्या नेसताना मिक्स ॲण्ड मॅच कॉम्बिनेशन अशा खुबीनं करते की बघणार्‍याला वाटतं मी पहिल्यांदाच ही साडी नेसली आहे. रेखाचा जबरदस्त फॅशन सेन्स तिच्या मदतीला येतो.

 

rekha in award show inmarathi

 

याशिवाय ती ज्या ज्या रिॲलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून, जज म्हणून उपस्थिती लावते तिथे ती चार्जेस लावते.

पुरस्कार सोहळ्यातल्या उपस्थितीसाठीही आयोजक तिला मानधन देतात. याव्यतिरिक्त स्टोअर वगैरेंच्या ओपनिंगसाठीही ती चांगली भक्कम रक्कम आकारते. यामुळेच एकही चित्रपट न करताही रेखाचा उदरर्निवाह वर्षानुवर्षं आरामात चालला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?