' भारतातील या ७ ठिकाणांची दिवाळी असते खास!! आपल्या कुटुंबासोबत नक्की जा

भारतातील या ७ ठिकाणांची दिवाळी असते खास!! आपल्या कुटुंबासोबत नक्की जा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यावर आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो.

उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत.

थोडक्यात काय तर हा काळ उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. दिवाळी हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

 

diwali-inmarathi

 

दिवाळी किंवा दीपावलीला भारतात “दिव्यांचा सण” म्हणूनही ओळखले जाते. दिवाळी हा भारतासाठी एवढा मोठा उत्सव असल्याने, देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने ती साजरी करतात.

आपणही या सणाचा आनंद देशभरातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जाऊन करू शकतो. त्यातही ही पर्यटनस्थळे जर दिवाळी साजरी करण्यासाठी प्रसिद्ध असतील तर सोनेपे सुहागा. चला तर मग टाकूया एक दृष्टिक्षेप…

१. वाराणसी

दिवाळीचा काळ हा वाराणसीला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. त्यातही देवदिवाळीचे पर्व खास आहे. या दिवशी वाराणसीच्या ‘दशाश्वमेध’ घाटावर दिव्यांची रोषणाई केली जाते, ज्याने संपूर्ण घाट उजळून निघतो.

त्यासोबतच सुरू होतो गंगा उत्सव. घाटावर केली जाणारी गंगा आरती हा खरोखरच नयनरम्य सोहळा असतो. दिव्यांची रोषणाई, खास बनारसी कपड्यांचा फील आणि नदीपत्रातले तरंगते दिवे आणि होड्या अनुभवायच्या असतील तर देवदिवाळी दरम्यान वाराणसीला भेट देणे मस्ट आहे.

 

ganga utsav inmarathi

 

२. अमृतसर

दिवाळी ही अशी वेळ आहे जेव्हा शीख समुदाय ‘बंदी छोर’ दिवस साजरा करतात. ‘बंदी छोर’ हा गुरु गोविंद सिंग यांच्या सुटकेशी निगडीत आहे. या दिवशी मुघलांच्या तुरुंगवासातून त्यांची सुटका झाली म्हणून शीख धर्मीय मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.

शीख धर्मियांच्या लोकप्रिय सुवर्ण मंदिरासह संपूर्ण शहर आकर्षक आणि प्रकाशमय दिसते. अमृतसरमध्ये वर्षाच्या या वेळी तुम्ही मोहरीचे शेत आणि आल्हाददायक हवामान देखील पाहू शकता.

 

golden temple inmarathi

 

खासकरून दिवाळी आणि बंदी छोर दिवसादरम्यान बनवलेल्या काही उत्तमोत्तम मिठायांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, विभाजन संग्रहालय, जालियनवाला बाग अशी सरस पर्यटनस्थळे तुम्ही अमृतसर ट्रीपमध्ये पाहू शकता.

३. जयपूर-उदयपूर

तुम्हाला भारतातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अनुभवायची असेल तर तुम्ही उदयपूर-जयपूर या ठिकाणी आवर्जून भेट द्यायला हवी. धनत्रयोदशीपासून या ठिकाणी उत्सव सुरू होतो. मुळात राजस्थान हा रंगीबेरंगी प्रदेश आहे त्यात दिवाळी हा उत्सवी सण असल्याने सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेले दिसते.

दिवाळीच्या दिवसांमध्ये उदयपूर-जयपूरच्या गल्ल्यांमध्ये, बाजारपेठेमध्ये रंगीबेरंगी पागोटी घालून मोकळ्या गळ्याने राजस्थानी लोकसंगीत गाणारे गायक दिसतात, टेराकोटाचे अनेक दिवे, कंदील दुकानांमध्ये विक्रीस ठेवलेले दिसतील. या दिवसांमध्ये सर्व छते, दरवाजे दिवे, पणत्या यांनी उजळून निघतात.

उदयपूर जवळच्या ‘पिचोला’ तलावात या दिव्यांची तेवती प्रतिबिंबे खूपच मनोहारी दिसतात. दिवाळी दरम्यान आणखी एक आकर्षण म्हणजे ‘उदयपूर लाइट फेस्टिव्हल’!

 

udaipur light festival inmarathi

 

अनेक प्रख्यात गायक, डीजे, शैलीतील कला प्रतिष्ठान, खाद्यपदार्थांचे स्टॉल, फन गेम्स तसेच कागदापासून बनवलेल्या विविध कलाकृती यांमुळे पर्यटकांमध्ये ‘जयपूर लाईट फेस्टिव्हल’ हे प्रमुख आकर्षण आहे.

४. कोलकत्ता

संपूर्ण देश दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असताना, लक्ष्मी पूजनाचा दिवस बंगाली समुदाय काली पूजा करून साजरा करतो. काली पूजा हा बंगाली लोकांचा सर्वात महत्वाचा सण आहे, जो दिवाळीच्या बरोबरीने येतो. सणासुदीच्या काळात कोलकत्ता दिव्यांनी झगमगणारे शहर बनून जाते.

 

kali pooja inmarathi

 

कालीघाट, बेलूर मठ, दक्षिणेश्वर यांसारखी कोलकत्ता येथे असलेली माँ काली मंदिरे या दिवसात मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करतात.

५. गोवा

वर्षाच्या बाराही महिन्यात उत्सव साजरा करणार्‍या गोव्यात दिवाळीदेखील मोठ्या धूम धडाक्यात साजरी होते. गोव्यातल्या प्रत्येक छोट्या गावात तसेच शहरात या दिवसात एक नरकासुराची मूर्ति बनवली जाते. कोणाची मूर्ती मोठी याची अगदी स्पर्धाच लागते म्हणा ना! नरकचतुर्दशीच्या दिवशी ती मूर्ती जाळली जाते.

 

narkasur in goa inmarathi

 

तुम्हाला गोव्यातील लोक त्यांच्या खिडक्या आणि दरवाजे; दिवे आणि कंदिलांनी सजवताना दिसतील. स्थानिक लोक नरकासुराचे महाकाय पुतळे बनवतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ते जाळतात. त्यादिवशी खूप मोठ्या प्रमाणात तिथे जुगारही खेळला जातो.

६. दिल्ली

दिल्लीत ५ दिवस दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. हे दिवस महागड्या वस्तू खरेदी करण्याचा भाग्यशाली दिवस मानला जातो, त्यानंतर नरक चतुर्दशी येते जिथे नरकासुर राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला होता, त्यानंतर दिवाळी म्हणजे कार्तिमातील अमावास्येचा तिसरा दिवस असतो. असे मानले जाते, की याच दिवशी रामाने आपल्या पत्नी सीतेला राक्षस रावणापासून वाचवले.

संपूर्ण दिल्लीत लहान फटाक्यांसह दिवे प्रकाशित केले जातात. त्यानंतर बली पद्यामी येते, विक्रम संवतातील नवीन वर्षाचा चौथा दिवस जो अन्नकुटाचे प्रतीक आहे जे सर्व काही अन्नदान करण्याबद्दल आहे, म्हणजे मेजवानी देण्याबद्दल आहे.

लोटस टेंपल, लाल किल्ला, इंडिया गेट, कुतुबमिनार इ. ठिकाणे पर्यटकांनी भेट देण्यासारखी आहेत. ‘दिल्ली है दिलवालों की’ हे अनुभवायचे असेल तर या दिवाळीत दिल्लीला अवश्य भेट द्या.

 

india gate delhi inmarathi

 

७. जम्मू

दिवाळी हा काश्मिरी पंडितांचा मुख्य सण आहे. घरातील वडील दिवसभर उपवास करतात, त्यानंतर लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि भेटवस्तू म्हणून रोख रक्कम देतात.

दिवाळीच्या संध्याकाळी जम्मू उजळतो. तेथील हिंदू अनेक परंपरांनी दिवाळी साजरी करतात. दिवाळीत संपूर्ण शहर उजळून निघते. हीच वेळ आहे जेव्हा जम्मू-काश्मीरमधील लोक त्यांच्या घरांसाठी नवीन वस्तू खरेदी करतात.

 

diwali in jammu inmarathi

 

दिवाळी हा काश्मिरी पंडितांच्या जुन्या विधींपैकी एक आहे. नवीन कपडे घालणे, संगीत ऐकणे, भेटवस्तू म्हणून रोख रक्कम देणे हा दिवाळी उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?