' ड्रग्स नसूनही एअरपोर्टवर समीर वानखेडेंनी या ८ सेलिब्रिटींना आपला इंगा दाखवला होता – InMarathi

ड्रग्स नसूनही एअरपोर्टवर समीर वानखेडेंनी या ८ सेलिब्रिटींना आपला इंगा दाखवला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेले काही दिवस समीर वानखेडे हे नाव चांगलेच गाजत आहे. नशेत टल्ली असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मागे हात धूऊन लागलेल्या समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक केली आणि त्याानंतर पुन्हा एकदा ते प्रकाशझोतात आले.

२००८ मध्ये IRS officer म्हणून नियुक्त झालेले समीर वानखेडे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड मधील ड्रग्स रॅकेट वर नजर ठेवत अनेकांचे पितळ उघड पाडण्याचे काम करत आहेत.

 

sameer inmarathi

 

मात्र केवळ ड्रग्स नव्हे तर एअरपोर्टवरही नावखेडेंनी अनेक कलाकारांच्या नाकीनऊ आणले होते. आपल्याला केवळ सारा अली खान, रकुलप्रित सिंग, आर्यन खान हेच कलाकार माहीत आहेत मात्र यापुर्वी अनेक कलाकारांना वानखेडेंनी आपला इंगा दाखवला होता.

आतापर्यंत कित्येक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींना त्यांनी पकडले असून भरभक्कम दंड भरण्यासाठी भाग पाडले आहे. कोण होते हे प्रसिद्ध कलाकार? बघुया.

१. शाहरुख खान

२०११ मध्ये बॉलिवूडचा किंग म्हणून ओळख निर्माण करणारा अभिनेता शाहरुख खान याला मुंबई एअरपोर्ट मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाताना कस्टम विभागाने पकडले होते, तेव्हा वानखेडे कस्टम विभागाचे हेड म्हणून कार्यरत होते.

 

shah rukh khan inmarathi

 

त्यासाठी त्यांनी शाहरुखला १.५ लाखांचा दंड भरायला लावला होता.

२. रणबीर कपूर

२०१३ मध्ये फक्त एअरपोर्ट स्टाफसाठी परवानगी देण्यात आलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या रणबीर कपूरला पकडण्यात आले होते. तेव्हाही वानखेडेंच्याच नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती.

 

ranbeer inmarathi

 

या चुकीसाठी रणबीरला ६०००० रुपये दंड आकारण्यात आला होता.

३. अनुष्का शर्मा

मुंबई एअरपोर्टवर डायमंड ब्रेसलेट, नेकलेस, कानातले आणि दोन महागडी घड्याळे यांसह अनुष्का शर्मा या अभिनेत्रीला पकडले होते.

 

anuskha inmarathi

 

परवानगी न घेता हा महागड्या सामानाची ने-आण करणाऱ्या अनुष्काला तब्बल ११ तासांच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.

४. कतरीना कैफ

मुंबई एअरपोर्टवर २०१२ मध्ये कतरीना कैफ या अभिनेत्रीवरही वानखेडेंनी कारवाई केली आहे.

 

katrina inmarathi

 

कतरीनाने  अॅपल कंपनीचा iPad, ३०००० रुपये आणि दोन व्हिस्कीच्या बाटल्या या सामानाची माहिती न देता ने-आण केल्याच्या आरोपाखाली तिला १२००० रुपये दंड आकारण्यात आला होता.

५. बिपाशा बासू

 

bipasha basu inmarathi

 

माहिती न देता ६० लाख रुपयांचे किमती समान घेऊन जाताना मुंबई एअरपोर्टवर बिपाशा बासू हिला पकडण्यात आले होते, यासाठी १२००० रुपये दंड आकारण्यात आला होता.

६. विवेक ओबरॉय

 

vivek inmarathi

 

सर्व्हिस टॅक्स विभागाने २०१३ मध्ये सर्व्हिस टॅक्स न भरल्यामुळे विवेक ओबरॉय यांना पकडले होते. अर्थात तेव्हाही या विभागाचे मुख्य समीर वानखेडेच होते.

७. मिका सिंग

 

mika inmarathi

 

२०१३ मध्येच बॅंकॉकमधून येताना त्यांच्या बॅगेत असलेल्या ९ लाखांच्या सामानाची माहिती न देता मुंबई एअरपोर्ट वरून निघून जाणा-या मिका सिंग यांच्यावर कारवाई झाली होती.

८. मिनिषा लांबा

मिनीषा लांबा ही अभिनेत्री डायमंड दागिने तसेच महागडे खडे यांच्या ५० लाखांचे सामान घेऊन जाताना पकडली गेली होती. त्यासाठी तिला १६ तासांच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.

 

minisha inmarathi

 

वानखेडेंच्या करड्या नजरेतून ती सुटू शकली नव्हती.

९. अनुराग कश्यप

ऑगस्ट २०१३ मध्ये अनुराग कश्यप यांना सर्व्हिस टॅक्स विभागाने ५५ लाखांचा दंड भरण्यास भाग पाडले होते. इतकेच नाही तर त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले होते. त्यावेळी समीर वानखेडे टॅक्स विभागाचे कमिशनर म्हणून काम पहात होते.

 

anurag inmarathi

 

याशिवाय समीर वानखेडे यांनी काही बॉलिवूड अभिनेत्यांसह त्यांच्या मुलांनाही ड्रग्स प्रकरणात पकडले होते. यामध्ये किंग खान यांचा मुलगा आर्यन खान तसेच अरमान कोहली यांचाही समावेश आहे.

पडद्यावर काम करणारे कलाकार हे फक्त कलाकार नसून प्रेक्षकांचे आदर्श असतात, मात्र बॉलिवूड हे मायाजाल आहे. यात अनेक भयावह चेहरे लपले आहेत हे अनेक घटनांतून सिद्ध होते.

कलाकारांना नियमाचे धडे देणा-या समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप, त्यासाठी सुरु झालेला त्यांचा लढा यांमध्ये कुणाचे पारडे जड होते हे येणारा काळच ठरवेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?