' काश्मीरमध्ये जीपला बांधलेला आरोपी आणि सावरकरांनी उल्लेखलेली सद्गुण विकृती – InMarathi

काश्मीरमध्ये जीपला बांधलेला आरोपी आणि सावरकरांनी उल्लेखलेली सद्गुण विकृती

 

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गेल्या महिन्यात जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात-भारतात, लोकशाहीचा महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूका झाल्या काही राज्यांत. अशीच एक पोट-निवडणूक काश्मीरात देखील झाली.

काश्मीरमध्ये अशाच एका मतदान केंद्रावर स्थानीक काश्मीर पोलीस आणी ईतर सुरक्षा यंत्रणांचे जवान आपले कर्तव्य बजावत होते.
संध्यकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर, निवडणूक अधिकारी आणी सुरक्षाकर्मी मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना, त्या केंद्राला गराडा घालून ८००/१००० लोकांचा जमाव दगडफेक करू लागला.

“Maximum restraint – जास्तीत-जास्त संयम पाळा” असे आदेश असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी, मतदान केंद्रातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अधिक सुरक्षेची मागणी केली.

त्याप्रमाणे, भारतीय सैन्य दलाची एक तुकडी मेजर लितूल गोगोई, यांच्या नेतृत्वाखाली तिथे पोहोचली.

पण ८००/१००० जणांचा जमाव त्यांना आवरणे शक्य झाले नाही. “Maximum restraint- जास्तीत-जास्त संयम” या आदेशांमुळे २०-२५ जवानांकडे असलेल्या AK-47 सारख्या शस्त्रांचा वापर करता येणार नव्हता. त्यात कित्येक विनवण्या करून देखील, दगडफेक करणारे थांबत नव्हते.

मतदान केंद्रात अडकलेले कर्मचारी आणि सुरक्षाकर्मी यांची जबाबदारी असलेल्या मेजर गोगोई यांनी “प्रसंगावधान ठेवून” दगडफेक करणाऱ्या तिथल्याच एका म्होरक्याला पकडले, जीपच्या पूढे बांधले आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत तिथून बाहेर पडले.

 

man tied in front of army jeep marathipizza

 

घटनेनंतर अपेक्षेप्रमाणे “फक्त काश्मीरातील दहशतवाद्यांना, दगडफेक करणाऱ्यांना, त्यांची बाजू घेत समर्थन करणाऱ्यांनाच फक्त मानवाधीकार आहेत” असे समजणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, बुद्धिवंतांची मानवतावाद्यांची ओरड सुरु झाली.

“भारतीय सैन्य हे काय करतंय?”

“हे नियमांच्या विरुद्ध नाही का?”

“त्या गरीब बिचाऱ्या तरुणाचा मानवी ढाल- human shield म्हणून केलेला वापर, भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे….”

……अशी बरीच विधानं केली गेली.

या आशयाचे अग्रलेख, लेख वृत्तपत्रांत लिहीले गेले, विविध चॅनेलवर कित्येक तासांच्या डिबेट्स रंगवल्या गेल्या. अगदी जागतीक पातळीच्या चॅनल्सनी ” हे मानवाधीकारांचे हनन आहे”, “भारतात हे असं भयंकर काही होतंय” असं वृत्तांकन प्रसारीत केलं.

भारतीय सैन्याने मात्र, AK47 सारखी फायर आर्मस सोबत असतानाही, मेजर गोगोईंनी दाखवलेल्या “प्रसंगावधनाच” योग्य आकलन केलं. संभावीत रक्तपात टाळून नागरीक, मतदान कर्मचारी आणी सुरक्षाकर्मी यांचे संरक्षण करण्याच्या कृतीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

Major-Gogoi-marathipizza

“सैन्याकडून कौतुकाची थाप, पण मानवतावाद्यांकडून टिका” या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा “सद्गुण विकृती” हा शब्द आठवला.

विचार करा मित्रांनो, २०-२५ जवानांकडे बंदुकीच्या प्रत्येकी १०/१५ गोळ्या आहेत, परिस्थिती हाताबाहेर गेली असती, आणि शेवटच्या क्षणी सैन्याने गोळीबार केला गेला असता, तर काय झालं असतं ? कल्पना करतानाही अंगावर काटा येतोय.

दगडफेक करणाऱ्यांपैकी एखादा दगावला असता, तर हेच मानवतावादी लोक भारतीय सैन्याकडून अत्याचार, असे बरळले असते.
आणि जर एखादा सुरक्षाकर्मी या झटापटीत हुतात्मा झाला असता, तर त्याबद्दल अवाक्षरही काढले गेले नसते. कारण सैनीकांना, पोलीसांना “मानवाधीकार असुच कसे शकतात” अशी यांची शिकवण आणी धारणा आहे.

मानवतावाद मान्य, पण सद्गुण विकृतीमूळे तिथे रक्तपात झाला नसता काय? आणि मेजर गोगोईंच्या प्रसंगावधनामूळे संभाव्य रक्तपात टाळला गेला नाही काय?

उच्च आदर्शमूल्य वगैरे ठिक आहे, पण सद्गुण विकृतीमूळे हानी तर होत नाही ना, हे देखील पहावयास हवे !

बाकी – ह्या वर्तनामुळे एक चांगलं होतंय.

वर्गशत्रू, “भांडवलदारविरोधी प्रोलेटरीयेटांचा लढा”, अशा गोंडस नावाखाली जबरदस्तीचे स्थलांतरण, कोणतीही सुट नसणारे forced labor camps आणी तिथे झालेल्या मृत्यू-हत्या, हेकेखोर वृत्तीमुळे घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे झालेले दुष्काळ आणि भुकबळी, राजकीय विरोधकांच्या आणि न-पटणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांच्या/जनतेच्या हत्या, रोगराईमूळे झालेले मृत्यू, विकृत निरंकुश सत्ता लालसेपोटी, स्वतःची विचारधारा इतरांवर लादण्याच्या मोहापायी करोडो लोकांच्या हत्या करणाऱ्या माओ, लेनीन, स्टालीन, पॉल पॉट ते अगदी भारतातील काही राज्यांतील या आयातीत विचारधारेनुसार कार्यपद्धती असणाऱ्या कम्युनीस्ट राजवटींच्या वैचारीक पाठीराख्यांच्या चेहऱ्यांवरून मुखवटे उतरत आहेत !

ता.क.

मेजर गोगोईंच्या म्हणण्याप्रमाणे, जर जिपला बांधलेला व्यक्ती दगडफेक करणाऱ्या लोकांचा म्होरक्या होता, तर पोलीसांनी त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?