' काँग्रेस पक्षाची नियमावली: खादीचे कपडे परिधान करणे, दारू ड्रग्ससारख्या व्यसनांपासून दूर राहणे – InMarathi

काँग्रेस पक्षाची नियमावली: खादीचे कपडे परिधान करणे, दारू ड्रग्ससारख्या व्यसनांपासून दूर राहणे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षांपैकी एक काँग्रेस पक्ष आहे. आज जरी या पक्षाची रया गेलेली असली तरी अनेक दशके या पक्षाने सत्ता उपभोगली आहे.

भारतातला राजकीय नेता म्हटला की खादीचा/ कॉटनचा पांढरा झब्बा-पायजमा, डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि कधीतरी खादीचे जॅकेट असेच चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. कारण असाच बहुतांश नेत्यांचा पेहेराव आपण गेली अनेक वर्षे बघितला आहे. त्यातल्या त्यात जर नेता काँग्रेसचा असेल तर हा तर त्यांचा जणू ड्रेस कोडच झाला आहे.

काँग्रेस पक्ष अजूनही काही राज्यांत युतीत का असेना पण सत्तेत आहे आणि राजकारणात कधीही सत्तापालट घडू शकतो. अनेक तरुण लोक राजकारणात येऊ इच्छितात. पण पक्षात प्रवेश मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

 

Flag_of_the_Indian_National_Congress-marathipizza
en.wikipedia.org

 

तुमच्या पाठीशी जर कुणी गॉडफादर नसेल तर तुम्हाला राजकारणात प्रवेश मिळवण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर , ग्रास रूट लेव्हलला काम करण्यावाचून तसेच शून्यापासून सुरुवात करण्यावाचून गत्यंतर नाही. आणि एकदा पक्षात प्रवेश मिळाला तरी प्रत्येक पक्षाचे काही नियम असतात आणि ते नियम प्रत्येक कार्यकर्त्याला पाळावेच लागतात. नियमभंग झाल्यास पक्षातून हकालपट्टी होऊ शकते.

पुढच्या वर्षी पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. हेच ध्यानात ठेवून काँग्रेस पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाचा विस्तार करणे सुरु आहे. सध्या काँग्रेसचे लक्ष युवांकडे आहे. युवा नेते तसेच मतदार यांना प्रभावित आणि आकर्षित करून घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे काँग्रेसचे लक्ष्य आहे.

 

kanhaiya with congress inmarathi

यासाठी काँग्रेस सदस्यता अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान असेल. तुम्हाला जर काँग्रेस पक्षात स्थान मिळवायची इच्छा असेल तर या अभियानात सामील होऊ शकता. पण आता काँग्रेसमध्ये जाणे आणि पक्षात स्थान मिळवणे तितके सोपे राहिले नाही.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने सदस्यत्वासाठी नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासाठी उमेदवारांना दहा वचने द्यावी लागतील आणि काटेकोरपणे पालन करावे लागेल.

या नियमांत व्यसनांपासून लांब राहणे, सार्वजनिक मंचावर पक्षाच्या नीतिनियमांवर टीका न करणे, खादीची वस्त्रे वापरणे या अटी आहेत. जे उमेदवार ह्या अटी मान्य करतील आणि त्यांचे शिस्तीने पालन करतील केवळ त्यांनाच काँग्रेस पक्षात प्रवेश मिळेल. पूर्वी मात्र असे नव्हते. ज्याला इच्छा आहे तो कुठल्याही अटी शर्तींशिवाय पक्षात दाखल होऊ शकत होता. पण आता मात्र पक्षाने नियम कडक केले आहेत. वाचा काय आहेत हे नियम!

१. दारू व अंमली पदार्थ (ड्रग्स) या पदार्थांपासून आणि व्यसनांपासून लांब राहणे.

 

sachin khedekar drinks scene inmarathi

 

२. खादी वस्त्रे वापरणे.

 

congress 1 inmarathi

 

३. सामाजिक भेदभाव न करणे.

 

Hindu Muslim Ekta Inmarathi

 

४. समाजात भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे.

 

hindu muslim riots inmarathi
indianexpress.com

 

५. पक्षाच्या नीतींमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे.

 

CONGRESS LEADERS INMARATHI
OutlookIndia.com

 

६. शारीरिक श्रम तसेच काम करण्यात संकोच न करणे.

 

congress 2 inmarathi

 

७. सार्वजनिक मंचावर किंवा सार्वजनिकरित्या पक्षाच्या नीतींवर टीका न करणे.

 

rahul gandhi 2 inmarathi

 

८. कायद्याचे उल्लंघन होणार नाही तेवढीच प्रॉपर्टी बाळगणे.

 

property 2 inmarathi
sakaltimes.com

 

काँग्रेस पक्षात प्रवेश करताना उमेदवारांना शपथ घ्यावी लागेल की ,” मी कायमच प्रमाणित असलेली खादी वस्त्रे परिधान करणारा आहे. मी मादक पेये आणि मादक पदार्थ घेत नाही आणि कायम त्यांपासून लांब राहतो.

मी कोणत्याही स्वरूपातील सामाजिक भेदभावावर विश्वास ठेवत नाही किंवा सामाजिक भेदभाव स्वतःच्या आचरणात आणत नाही आणि ते दूर करण्यासाठी कार्य करण्याचे वचन देतो. मी धर्म किंवा जातीचा भेद न करता एकात्मिक समाजावर विश्वास ठेवतो; मी कार्यसमितीने निर्धारित केल्यानुसार अंगमेहनतीसह सर्व कार्ये पूर्ण करण्याचे वचन देतो. कायद्याने प्रमाणित केल्याहून अधिक कोणतीही मालमत्ता माझ्या मालकीची नाही.”

 

congressmodi-inmarathi
images.firstpost.com

तसेच सदस्यांना पुढील वचनांचे पालन देखील करावे लागेल की, “मी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीच्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी हे सदस्यत्व घेतो आहे आणि कार्य करणार आहे. मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, उघडपणे किंवा अन्यप्रकारे पक्षाच्या स्वीकृत धोरणांवर आणि कार्यक्रमांवर टीका करणार नाही.”

या सदस्यत्व फॉर्ममध्ये काँग्रेसने म्हटले आहे की सर्व भारतीयांचे कल्याण आणि प्रगती करणे तसेच संसदीय लोकशाहीवर आधारित शांततापूर्ण आणि संवैधानिक मार्गाने समाजवादी राज्य स्थापन करणे हेच काँग्रेस पक्षाचे उद्दिष्ट आहे.

तुमच्यापैकी कुणाला जर काँग्रेस पक्षात जाण्याची इच्छा असेल तर या नियमावलीचे पालन तुम्हाला करावे लागेल तरच आता पक्षात प्रवेश मिळेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?