' वर्षानुवर्षे सुरु असलेला शिया विरुद्ध सुन्नी विवाद : इस्लाम धर्मातील पंथ

वर्षानुवर्षे सुरु असलेला शिया विरुद्ध सुन्नी विवाद : इस्लाम धर्मातील पंथ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अभिराम दीक्षित 

===

भारतात शिया आणि सुन्नी असे मुस्लिमांचे दोन प्रमुख पंथ आहेत. दोन्ही साठी मुहर्रम महत्वाचा आहे. आणि हे दोन परस्पर विरोधी पंथ निर्माण होण्याची तारीख म्हणजे मुहर्रम होय.

मुहम्मद पैगंबर हे इस्लामचे शेवटचे प्रेषित. त्यांनी सर्व अशुद्धी बाहेर काढून खरा धर्म – दिन – इस्लाम सार्या मानव जातीला सांगितला अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. ते शेवटचे प्रेषित असणे अतिशय महत्वाचे आहे .यानंतर नवा प्रेषित नाही. कुराणात बदल नाही. त्याकाळी अरबस्तानात उगवलेले अनेक तोतये प्रेषित मुहम्मदानी वेचून वेचून संपवले होते.

 

muslim namaz inmarathi
patrika

प्रे. मुहम्मद केवळ धर्म गुरु नाहीत तर ते राजाधीपती, सेनापती आणि रणधुरंधर देखील होते. त्यांच्या पश्चात प्रेषित कोणी नाही पण राजपद पुढे चालले. हे राजपद म्हणजे खलिफा आणि हि खिलाफत इस्लामचा अतिशय महत्वाचा भाग आहे .

प्रेषित मुहम्मदा नंतर खलिफा कोणी व्हावे? हा निर्णय अतिशय अवघड होता. अबू बकर आणि अली असे त्यांचे दोन प्रमुख वारसदार होते. अली आणि अबू बकर हे दोघेही मुहम्मदाच्या कुरेश टोळीतले होते त्यांचे नातेवाईक होते.

खिलाफतीचा मान मुख्यतः कुरेशी टोळीकडे असतो असा इस्लामी संकेत आहे. राजगादी साठी अली विरुद्ध अबू बकर या दोन्हीत संघर्ष झाला. त्यापैकी अलींच्या पक्षाला शिया आणि अबू बाकर च्या पक्षाला सुन्नी म्हणतात. अबू बकरच्या रांगेत उस्म्मान हे खलिफा झाले त्यांचा खून झाला मग शेवटी अली खलिफा झाले.

 

islam inmarathi

 

हा काळ इस्लामच्या इतिहासातील सत्ता संघर्षाचा काळ आहे. अरब विरुद्ध अरबेतर, कुरेश विरुद्ध इतर असे जातीय संघर्ष तर दिसतातच पण खुद्द कुरेश टोळीतच संघर्ष उभा राहिला. आयेशा ही प्रेषितांची पत्नी, हिचे स्थान इस्लामी इतिहासात महत्व पुर्ण आहे.

आयेशा यांना श्रद्धावानांच्या माता असेही म्ह्टले आहे. त्यांचे वय मुहम्मदांपेक्षा ४० वर्षांनी कमी होते – पण ती त्या काळाची पद्धत होती असे मानतात. या श्रद्धा वानांच्या माता अतिशय विद्वान म्हणजेच कुराणाच्या जाणकार होत्या असे सुन्नी परंपरा मानते. यांनी स्वत: उंटावर बसून खलिफा आली विरोधी युद्धाचे नेतृत्व केले.

 

muslim war inmarathiu

 

प्रत्यक्ष प्रेषित मुहम्मदांची प्रिय पत्नी आयेशा विरुद्ध खलिफा आली यात रक्तरंजित युद्ध झाले. हे युद्ध इस्लामी इतिहासात ऊंटाची लढाई म्हणून ओळखले जाते. प्रेशितांच्या पत्नीचा पराभव झाला आणि अलिंचा विजय झाला.

पराभूत सैन्यातील स्त्रियांची वाटणी विजेत्यांच्या सैन्याला मिळते असा इस्लामी कायदा आहे. त्याला गनिमत असे म्हणतात. परंतु प्रेषित पत्नी या इमान्वंतांच्या माता असल्याने – अलिंनि त्याना सन्मानाची वागणुक दिली आणि युद्धलूट ” गनिमत” चे कायदे या युद्धापुरते शिथिल केले. पण हा संघर्ष येथेच संपणारा नव्हता. ऊंटाची लढाइनंतर सिफिंन ची लढाई, नहरवनचे युद्ध असा संघर्ष चालूच राहिला.

 

muslim war 3 inmarathi

 

या रक्तरंजित सत्ताकारणात हजारो बळी गेले . पुढे त्यातूनच खलिफा आली यांचा खून झाला. अलिंचे समर्थक शिया या नावाने ओळखले जातात. विरुद्ध गट सुन्नी या नावाने ओळखला जातो. आता दोन खिलाफाती निर्माण झाल्या. एक सुन्नीची आणि एक शियांची. खून झालेल्या खलिफा अलीचे वंशज म्हणजे हुसेन हसन हे होत. हुसेन शियांचा इमाम झाला आणि मुआविया सुन्निंचा खलिफा झाला .

करबलेची घाउक कत्तल :

ही तडजोड पुढे फार काळ टिकली नाही. खलिफा ( Umayyad Yazid ibn Mu’awiya) मुआविया – अली – या संघर्शात.. अलीचे अख्खे कुटुंब मारून टाकले गेले. ही  कत्तल जिथे झाली त्या गावाचे नाव करबला. करबला येथे ७० जणांची कत्तल केली गेली . हसन हुसेन हे अलीचे पुत्र मारले गेले.

 

muslim war 1 inmarathi

 

शियांच्या खिलाफतीचा वंशनाश झाला. मुहर्रम हा शियांसाठी कमालीच्या दु:खाचा सण. स्वत:ला जखमा करून घेत हा सण पाळला जातो. अली पुत्र हसन हुसेन चा जयजयकार केला जातो. या आली या हुसेन असे ओरडत स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबियांना धारधार शस्त्राने जखमा करून मृत खलिफ़ांचि आठवण केलि जाते.

शियांच्या श्रद्धेनुसार आता खलिफा अंतर्धान पावले असून नवे खलिफा येणार आहेत. त्यामुळे या सणाला शियापंथीय व्याकुळ होत असतात . अशुराचा हा दिवस महिन्यातील दहावा दिवस म्हणून शियांसाठी दु:खाचा आहे . हराम वरून मुहर्रम हा शब्द आला आहे.

 

shia inmarathi

सुन्नी साठी हा दिवस दु:खाचा नाही . प्रेशितापेक्षा अधिक महत्व खलिफ़ाना देणे त्याना मान्य नाही. त्यासाठी रडणे मान्य नाही. लखनौ येथे अशा शिया सुन्नी वादातून शेकडो दंगली झाल्या आहेत . १९०८ पासून २०१३ पर्यंत अशा दंगली झाल्या आहेत .

खलिफा अली ला महत्व द्यायचे की नाही यावरून शिया विरुद्ध सुन्नी हा विवाद उभा आहे. त्यातून हे दोन पंथ आणि त्यातला रक्तरंजित संघर्ष उभा राहिला आहे. आजही सुन्नी पंथीय तालिबान शियांच्या मशिदीत बॉंबस्फोट करते.

पाकिस्तानात शिया सुन्नी दंगलीत हजारो मारले गेले आहेत . या रक्तपाताचे आणि सूडचक्राचे मूळ करबलेच्या कत्तलीत आहे . करबलेचि कत्तल हा मुस्लिमांच्या अंतर्गत झालेला  भीषण रक्तपात होता. या संकटातुनही  इस्लाम वाचला आणि पुढे फोफावला, करबले सारख्या कत्तली इस्लामची वाढ थोपवू शकल्या नाहीत – म्हणून असे म्हटले जाते की,

इस्लाम झिंदा होता है हर करबला के बाद !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?