' चीनच्या नवीन हायपरसॉनिक मिसाईल्समुळे अमेरिका आणि भारतावरही संकट?

चीनच्या नवीन हायपरसॉनिक मिसाईल्समुळे अमेरिका आणि भारतावरही संकट?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चीन, अमेरिका, रशिया हे बलाढ्य देश काही ना काही नवनवीन प्रयोग करतच असतात. ऑगस्ट २०२१ मध्ये चीनने नवीन हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी केली. या चाचणीमुळे अनेक देशांपुढे सुरक्षेसंबंधीचे प्रश्न उभे राहिले आहेत.

हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे नक्की काय..

 

missile inmarathi

 

बॅलिस्टिक मिसाईल्सप्रमाणेच आण्विक हत्यारं घेऊन जाण्याची या मिसाईल्सची क्षमता असते. आवाजाच्या वेगापेक्षा या मिसाईल्सचा वेग ५ पट जास्त असतो. इतर कोणत्याही मिसाईल्सपेक्षा या मिसाईल्सचा वेग जास्त असतो आणि त्या आपल्या लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचतात.

या मिसाईल्स वायुमंडलाच्या खालच्या पट्ट्यातून प्रवास करतात.

अमेरिका संकटात –

चीनने हायपरसॉनिक मिसाईल्सवर खूप काम करुन प्रगती केली आहे. चीनने या मिसाईल्सवर आणि आण्विक हत्यारांवर केली प्रगती पाहून अमेरिकेतील गुप्त संघटना चकित झाल्या आहेत. चीनव्यतिरिक्त अमेरिका, रुस आणि इतर कमीत कमी ५ देश हायपरसॉनिक मिसाईल्सवर काम करत आहेत.

चायनाने मिसाईल लाँच केल्याचे लक्षात येताच अमेरिकेसह इतर देश सावध झाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्येच चीनने ही चाचणी केली होती, असे एका ब्रिटिश वर्तमानपत्राच्या बातमीतून समजते.

या मिसाईलची चाचणी केली असता. थोड्या अंतराने त्याचे टार्गेट चुकले, पण काही गोष्टी दुरुस्त केल्या, तर अमेरिकेच्या दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून ही मिसाईल चीन पाठवू शकते.

 

missile inmarathi1

 

यावर, ‘शांततापूर्ण मार्गानी स्पेसक्राफ्टची चाचणी करण्याचे आमचे काम सुरु आहे, आणि मनुष्याला फायदा होईल, असेच काम आम्ही करत आहोत, भविष्यात यासाठी इतर देशांसोबतही काम करण्याची आमची तयारी आहे’ असे चीनने सांगितले.

फायनॅन्शियल टाइम्सच्या सूत्रांनी असं सांगितलं, की हायपरसॉनिक वाहन एका रॉकेटद्वारे नेण्यात आले होते. चीन इतर वेळेस देशात होणाऱ्या चाचण्यांची घोषणा करत असते, पण ही चाचणी त्यांनी गुप्त ठेवली होती.

अमेरिका हे सर्वात प्रगत आणि बलवान राष्ट्र समजले जाते. अमेरिकेची टेक्नॉलॉजी ही प्रगत आहेच, पण त्यांची सुरक्षा यंत्रणा सुद्धा खूप  शक्तिशाली आहे. उद्या अमेरिकेवर कोणी हल्ला करायला ठरवलं, तर अमेरिकेने ‘अँटी मिसाईल’ यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे.

अमेरिकेच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच या मिसाईल्स नष्ट करण्याची यंत्रणा अमेरिकेकडे आहे. त्यामुळे जर हायपरसॉनिक मिसाईल्सची चाचणी यशस्वी झाली, तर चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग अँटी मिसाईल यंत्रणेचा सामना करण्यासाठी ऑर्बिटल स्ट्राइकचे मार्ग शोधतील.

२०१८ मध्ये रशियाने काही नवीन शस्त्रे तयार केली आहेत, आणि या शस्त्रांपुढे अमेरिकेची अँटी मिसाईल यंत्रणा काम करणार नाही, असा त्यांचा विश्वास आहे.

किम जोंग उन यांनीदेखील गेल्या वर्षात अनेक मिसाईल्सच्या चाचण्या केल्या आहेत.

 

kim jong inmarathi

 

अमेरिकेची अँटी मिसाईल ही यंत्रणा उत्तर दिशेला आहे, पण दक्षिणेकडून चीनने हल्ला केल्यास तिथे एवढी सुसज्ज यंत्रणा आहे का, हा प्रश्न आहे.

किमच्या अध्यक्षतेखाली नॉर्थ कोरियाने सॉलिड फ्युएल बॅलिस्टिक मिसाईल्स बनवल्या आहेत. या मिसाईल्स कमी उंचीवरून उडणाऱ्या असल्यामुळे अमेरिकेच्या अँटी मिसाईल यंत्रणेत त्या पकडल्या जाण्याची शक्यता कमी आहे. या मिसाईल्सचा वेगही प्रचंड असल्याने त्या अमेरिकेच्या यंत्रणेत पकडल्या जाण्याची शक्यता कमी आहे.

चीनच्या हायपरसॉनिक मिसाईलच्या टेस्टवर अमेरिकेने नुकतेच भाष्य केले आहे. ‘१९५७ मध्ये रशियाने ‘स्पुतनिक’ हा उपग्रह लाँच केला होता, आणि आता चीनने केलेली ही मिसाईल टेस्ट त्यासारखीच आहे’

‘ही घटना खूप महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक आहे. या मिसाईलचा सामना करणे खरोखरंच कठीण आहे. हा क्षण ‘स्पुतनिक’च्या जवळ जाणारा आहे. आणि यावर आमचे पूर्ण लक्ष आहे.’ असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या रक्षा विभागाने आधी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

चीन आणि भारतामध्ये सीमेवरून आधीच वाद चालू आहेत, या तणावाच्या पार्श्वभूमीवर या हायपरसॉनिक मिसाईल्सचा भारतालाही धोका उद्भवू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?