' हॉटेलच्या बाहेर 'नो हलाल' असा बोर्ड लावणाऱ्या स्त्रीवर कट्टरपंथीयांचा प्राणघातक हल्ला!!

हॉटेलच्या बाहेर ‘नो हलाल’ असा बोर्ड लावणाऱ्या स्त्रीवर कट्टरपंथीयांचा प्राणघातक हल्ला!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पुणेरी पाट्या जवळपास जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. कमीत कमी शब्दात लोकांना सूचना देणाऱ्या या पाट्या आज सोशल मीडियामुळे सर्वदूर पसरल्या. आजही खास पुणेरी पाट्या बघण्यासाठी पुण्यात जाणारे काही लोक आहेत. या पाट्या खरं तर खूप आधीपासूनच चर्चेत आल्या आहेत.

 

puneri pati inmarathi
slideshare

 

अशी ही बनवाबनवी हा सिनेमा आज लाखो मराठी लोकांचा आवडता सिनेमा आहे, त्या सिनेमात सुद्धा या पुणेरी पाट्यांचा उल्ल्लेख आहे, सिनेमा आठवत असेल तर सचिनजी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात येतात आणि अशोक मामांच्या घरी जातात तेव्हा ते थेट फाटक उघडून घरात जातात तेव्हा सुधीर जोशी त्यांना अडवतात आणि पाटी वाचण्यावरून त्यांना चांगलेच झापतात.

 

puneri 2 inmarathi

 

लोकांना समज देण्यासाठी लावण्यात येणाऱ्या या पाट्या कधीकधी पाटी लावणाऱ्या मालकाच्याच जीवावर बेतू शकतात, केरळमधील एका स्त्रीने एक पती आपल्या हॉटेल बाहेर लावली जी तिच्याच जीवावर बेतली, नेमकं काय भानगड आहे चला तर जाणून घेऊयात…

नेमकी कुठे झाली ही घटना?

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या, गॉड्स ओन कंट्री म्ह्णून ओळखलेले जाणारे केरळ राज्य. याच राज्यात ही अमानवी घटना घडली आहे. कोची शहरातील थुशरा अजित नामक महिलेने नुकतेच आपले स्वतःचे हॉटेल सुरु केले होते. साहजिकच प्रत्येक हॉटेलच्या बाहेर हॉटेल मालक जसा पाटी लावतो तशीच पाटी या महिलेने या लावली.

 

kerala-nature-inmarathi

नो हलाल या नावाने तिने पाटी लावली जायचा अर्थ आहे कि आमच्यकडे हलाल केलेले मांस मिळत नाही. या एका पाटीमुळे त्यांच्यावर दोन कट्टरपंथीयांनी प्राणघातक हल्ला केला तो हल्ला इतका भयंकर होता की त्या महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

 

ajith 2 inmarathi

 

घटनेवर पोलिसांची प्रतिक्रिया :

इन्फोपार्क पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटना रविवारी घडली, पीडित महिलेने नुकतेच आपले हॉटेल इन्फोपार्क परिसरात सुरु केले होते. नो हलाल या पाटीमुळे तिचे आणि तिच्या आसपास असणाऱ्या दुकानदारांचे भांडण होत असे.

 

keral police inmarathi
the statesman

 

दुकानदारांनी ती पाटी हटवण्याची मागणी महिलेकडे केली होती मात्र महिलेने यास साफ नकार दिला. उलट महिलेच्या हॉटेलचे फर्निचर काहींनी पळवून नेले असा आरोप महिलेने केला आहे.

FIR दोन्ही बाजूने?

 

fir inmarathi

भांडनंतर शेवटी रविवारी या महिलेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्या आरोपीपैकी एकाला महिलेच्या साथीदारांनी पकडले आणि बेदम मारले. आरोपी देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. घडलेल्या घटनेवर आता कोर्टात केस चालणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?