' १०० हून अधिक लोकांना यमसदनी धाडून त्यांच्या किडनीचा धंदा करणारा 'डॉक्टर'

१०० हून अधिक लोकांना यमसदनी धाडून त्यांच्या किडनीचा धंदा करणारा ‘डॉक्टर’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गुन्हेगारीशी संबंधित अनेक मालिका आपण पाहिल्या असतील. त्यातली पात्रे ही आपण आजवर काल्पनिक समजत होतो, पण काही घटना खरंच घडतात.

४३ लेकरांना मारणारी अंजनाबाई गावित असो की दगडाने ठेचून हत्याकांड करणारा सायको किलर स्टोनमॅन असो..ह्या घटना आपल्या समाजात लपलेली विकृती आपल्याला दाखवून देतात.

क्षणिक सुखाच्या किंवा भौतिक आनंदाच्या मागे लागलेले हे लोक आपल्या बोथट झालेल्या संवेदनांमुळे अशी पाशवी कृत्ये करून जातात. अशा लोकांसोबत एखाद्या डॉक्टरचे नाव ही सिरियल किलर म्हणून जोडले गेले तर? आणि ते ही थोडे थोडके नाहीत तर १०० च्या वर खून त्याने केले असतील तर?

 

murder inmarathi

 

सुन्न होण्यासारखीच गोष्ट आहे ही. पण खरी गोष्ट आहे. सन २००२ पासून आजतागायत या डॉक्टरने आपल्या साथीदारांसह १२५ च्या वर मर्डर केले आहेत.

हा कर्दनकाळ डॉक्टर मुळचा अलिगढचा असून नुकतेच त्याला दिल्ली पोलिसांनी पकडले असता नारकोटिक्स चाचणीत त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

घडले असे की डॉ. देवेंद्र शर्मा नावाच्या सीरियल किलरला पोलिसांनी अटक केली, ज्यावर सुमारे १०० हत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदिक औषधांच्या व्यवसायात अपयशी ठरल्यानंतर त्याने आपला ट्रॅक बदलला आणि गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.

जानेवारीमध्ये राजस्थानमधील एका खून प्रकरणात पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला, त्यानंतर तो फरार झाला. तो किडनी रॅकेटचा किंगपिन आहे, ज्याला यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यूपी, दिल्ली, हरियाणा, राजस्थानमध्ये गुन्हे दाखल आहेत.

 

murder inmarathi

 

पोलिसांनी या व्यक्तीला बापरोला परिसरातून पकडले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पवारिया यांनी बुधवारी सांगितले, की देवेंद्र शर्मा मूळचे यूपीमधील अलीगढचा असून जयपूर येथील एका खून प्रकरणात तुरुंगात होता.

जानेवारीत पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने वेळेवर कोर्टात शरणागती पत्करली नाही. त्याने पन्नास खून केल्याची कबुली दिली आहे. २००२ ते २००४ दरम्यान तो अनेक खुनाच्या प्रकरणात अडकला. १९९४ ते २००४ दरम्यान त्यांनी सुमारे १२५अवैध मूत्रपिंड प्रत्यारोपण केले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवेंद्र शर्मा लोकांना मारण्याव्यतिरिक्त इतर अनेक गुन्हेगारी कृत्य करत होता. देवेंद्र शर्मावर पोलिसांनी बनावट गॅस एजन्सी चालवणे, किडनी प्रत्यारोपण रॅकेट आणि चोरीची वाहने विकल्याचा आरोपही केला आहे.

पोलिसांना शंभराहून अधिक खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. मात्र, नेमक्या आकडेवारीला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

१९९४ मध्ये, आरोपी देवेंद्र शर्मा कुख्यात डॉ. अमितच्या टोळीत सामील झाला होता, जो गुडगाव किडनी घटनेतील मुख्य गुन्हेगार होता. शर्मा याने १९९४ ते २००४ दर दरम्यान किमान १२५ बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण केल्याचा दावा आहे, त्यासाठी त्याला प्रत्येक प्रकरणात पाच ते सात लाख रुपये मिळत असत.

डॉ अमित आणि त्याचे सहकारी नोकरीच्या बहाण्याने शेजारच्या उत्तर प्रदेशातील गरीब लोकांना लुबाडत असत. त्यानंतर, तो त्यांना किडनी काढण्यासाठी ३०,००० रुपये देऊ करत असे. ज्यांनी विरोध केला त्यांना जबरदस्तीने नशा करून त्यांचे मूत्रपिंड काढत असे. त्यावेळी ही किडनी युनायटेड किंगडम, अमेरिका, कॅनडा, ग्रीस आणि सौदी अरेबियामधील ग्राहकांना विकली गेली होती.

 

kidney inmarathi

 

पोलिसांनी या व्यक्तीला बापरोला परिसरातून पकडले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पवारिया यांनी सांगितले दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलेल्या सीरियल किलर ‘डॉक्टर डेथ’ने टॅक्सीचालकांच्या किडन्या विकल्याचा संशय आहे.

त्याची चौकशी करून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. बीएएमएस डॉक्टरकडून सीरियल किलर बनलेल्या देवेंद्र शर्मा याने एका यूपी मंत्र्याच्या नातेवाईकाच्या गॅस एजन्सीचा सिलिंडरने भरलेला ट्रक लुटला, त्यानंतर त्याला प्रथमच पोलिसांनी पकडले.

त्यावेळी तो सिलिंडर ट्रक लुटून आपली बनावट एजन्सी चालवत असे. त्याने सांगितले, की तो ट्रक आणि कॅब चालकांना मारत असे आणि त्यांची वाहने लुटत असे. त्याच्यावर १२५ मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्याचा आरोप असल्याने, कदाचित त्याने ड्रायव्हर्सची किडनीही काढून टाकली असावी, अशी भीती आहे.

असे म्हटले जाते, की यापूर्वीही डॉ. देवेंद्रने यूपी आणि इतर राज्यांतील अनेक टॅक्सीचालकांना ठार मारले. त्याला लोकांचा गळा दाबून खून करण्यात मजा वाटत असे . तो ते मृतदेह हजारा कालव्यात फेकून द्यायचा जेणेकरून कालव्यातील मगरी ते मृतदेह खातील आणि पुरावा शिल्लक राहणार नाही.

 

kidney racket inmarathi

 

अनेक खुनांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याला मीडियामध्ये “डॉ डेथ” हे टोपणनाव मिळाले.

पोलिसांनी आरोप केला, की शर्मा १९९४ ते २००४ दरम्यान बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभागी झाल्यामुळे दोन दशकांपूर्वी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

शर्मा याने इतर डॉक्टर आणि मध्यस्थांच्या मदतीने कथितपणे अवयव तस्करी रॅकेटमध्ये किमान १२५ प्रत्यारोपणाची व्यवस्था केली. त्याच्यावर चालकांचा खून, त्यांना लुटून वाहने विकणे, टॅक्सी आणि ट्रक भाड्याने घेणाऱ्या टोळीचा भाग असणे असे आरोपही आहेत.

शर्माला नंतर कमीतकमी सहा खुनांसाठी दोषी ठरवण्यात आले होते, मात्र त्याने आणखी बरेच काही केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “त्याने अशा ५० हून अधिक हत्यांचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा केला.”

त्या काळातील मीडिया रिपोर्ट दाखवतात, की त्याने टॅक्सीचालकांच्या १०० हून अधिक हत्या केल्या आहेत, ज्यासाठी दिल्ली, यूपी, हरियाणा आणि राजस्थानमध्ये गुन्हे दाखल आहेत.

मित्रांनो, आपण डॉक्टरला देवदूत मानतो, पण हा देवदूतच जेव्हा यमदूत होतो, तेव्हा कसा हाहाकार उडतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा ‘डॉ.डेथ’ देवेंद्र शर्मा. लेख कसं वाटला अवश्य कळवा आणि इनमराठीवरील इतरही लेटेस्ट लेख वाचत रहा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?