' बॉलिवूडमधील ‘या’ पात्रांचा ‘शेवट मात्र वाईट’च झाला! त्यांना ‘न्याय’ देता आला नसता का? – InMarathi

बॉलिवूडमधील ‘या’ पात्रांचा ‘शेवट मात्र वाईट’च झाला! त्यांना ‘न्याय’ देता आला नसता का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही चित्रपटांमधील दुय्यम पात्रं सुद्धा फार लक्षात राहतात. काहीवेळा एखादा चित्रपट मनापासून आवडण्यामागे, किंवा तो कायमचा लक्षात राहण्यामागे एखादं पात्र कारणीभूत असतं. बॉलिवूड चित्रपटांमधील काही पात्रं प्रेक्षकांच्या फारच लक्षात राहिली. चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला तरीही ती विस्मरणात गेली नाहीत.

 

bollywood inmarathi

 

यातीलच काही पात्र अशी आहेत, ज्यांचा चित्रपटातील शेवट मात्र अधिक चांगला असू शकला असता असं अनेकांना वाटून गेलं. अशाच काही पात्रांविषयी आज जाणून घेऊया. बघा तुम्हालाही यातली कुठली पात्रं आवडतात, कुठली आजही आठवतात.

१. अमन – कुछ कुछ होता हैं

एक मोठा स्टार असूनही, या सिनेमामधील सलमानची या चित्रपटातील भूमिका तशी लहान होती. लग्नाच्या दिवशीच आपली होणारी बायको दुसऱ्याला आपलं मानते आणि तरीही अमन मात्र खुश असतो. त्याचं प्रेम यातून दिसून आलं.

ही भूमिका कदाचित याच कारणामुळे लोकांना खूप आवडली. छोटी भूमिका असूनही, तिचा चित्रपटावरील प्रभाव फारच मोठा होता.

 

aman mehra kuch kuch hota hai inmarathi

 

२. प्रेम कुमार – मैं प्रेम की दिवानी हूं

प्रेम या नावामुळे झालेला गोंधळ, आणि अभिषेक बच्चनने साकारलेल्या प्रेम कुमारचं दुर्दैव आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिषेकने या भूमिकेत खास छाप पाडली. मात्र या पात्राला चित्रपटाच्या शेवटी योग्य न्याय मिळाला नाही, असं आजही अनेक प्रेक्षक मानतात.

 

prem kumar mai prem ki diwani hu inmarathi

 

३. मेघना – जाने तू या जाने ना

जयच्या प्रेमात पडणं, ही मेघनाची चूक झाली का? असा प्रश्न पडावा इतकं दुर्दैव मेघना या पात्राने अनुभवलं आहे. साधं पण खरं प्रेम मागणारी मेघना, स्वतः जयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. असं असूनही, लोकांचा तिरस्कार तिच्या पदरी पडला.

 

meghana jane tu ya jane na inmarathi

 

जय-अदिती सुखी झाले, मात्र मेघना फारशी सुखी झालेली या चित्रपटात पाहायला मिळाली नाही.

४. साबा – ए दिल हैं मुश्किल

ऐश्वर्याने या भूमिकेला उत्तम न्याय दिला. प्रेक्षकांनी या भूमिकेवर भरभरून प्रेम केलं.

ना कुठलाही पश्चात्ताप, ना आपण बोललेल्या गोष्टींबद्दल कुठलीही दुसरी भावना, अशी ही सडेतोड मुलगी! आणि ती चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडते आणि स्वतःचं नुकसान करून घेते.

 

aishwarya rai ae dil hai mushkil inmarathi

 

५. योहान – जझबा

इरफान खान याने साकारलेल्या अनेक उत्तम भूमिकांपैकी ही एक! ही प्रेमकहाणी वेगळीच होती. अनुराधा वर्माच्या प्रेमात असलेला योहान तिच्यासोबत राहिला, तीदेखील त्याच्या प्रेमात पडलीय, असा शेवट करता आला नसता का, असा प्रश्न प्रेक्षकांनी उपिस्थत केला होता.

चांगल्या पुरुषांचं प्रेम कधीच यशस्वी होत नाही, असं पुन्हा एकदा दिसून आलं. असंही प्रेक्षक म्हणाले असतील.

 

irfaan khan jazbaa inmarathi

 

६. वेरोनिका – कॉकटेल

वेरोनिका एकदम बोल्ड आणि डॅशिंग मुलगी! अगदी लहरी आणि हॉट अशी ही बिनधास्त मुलगी गौतमच्या प्रेमात पडते. सैफअलीने साकारलेल्या गौतमपेक्षा चांगल्या मुलाच्या प्रेमात ती पडली असती, तरी काही बिघडलं नसतं. तिचा मित्र परिवार सुद्धा फारसा चांगला दाखवलेला नव्हता, असंच प्रेक्षकांचं मत झालं होतं.

गौतम मात्र वेरोनिकासोबत शारीरिक संबंध ठेऊन त्यानंतर दारूला स्पर्शही न करणाऱ्या सुशील मुलीशी लग्न करताना दाखवला आहे. बिनधास्त वेरोनिकाच्या बाबतीत हा अन्यायच झालाय असं म्हणायला हवं.

 

deepika padukone cocktail inmarathi

 

या सहा पात्रांशिवाय आणखीही अशी अनेक पात्रं असतील, जी तुमच्या मनात अगदी रुतून राहिली असतील. अशा तुमच्या मनातील भूमिका सुद्धा कमेंटमधून शेअर करायला विसरू नका…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?