' नो शेव्ह नोव्हेंबर’ ट्रेंड सुरु होण्याआधी तो नेमका सुरु तरी कसा झाला? जाणून घ्या – InMarathi

नो शेव्ह नोव्हेंबर’ ट्रेंड सुरु होण्याआधी तो नेमका सुरु तरी कसा झाला? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

थंडीचे दिवस सुरू झाले की आपली त्वचा ही अधिक संवेदनशील होत असते. खरचटणे, मार लागणे हे या दिवसात जास्त त्रासदायक असतं. या कारणांमुळे कित्येक लोक हे हिवाळयात दाढी करणं सुद्धा टाळत असतात.

नोव्हेंबर महिन्यात थंडी सर्वात जास्त असते. नोव्हेंबर महिनाभर दाढी न करण्याचं एक हॅशटॅग ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या नावाने दरवर्षी इंटरनेटवर लोकप्रिय होत असतं. पण, या हॅशटॅगचा आणि वातावरणातील थंडीचा काहीच संबंध नाहीये. ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हे हॅशटॅग एका समाजोपयोगी कामासाठी ऑस्ट्रेलियात २००९ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. काय आहे या हॅशटॅग मागचं कारण ? जाणून घेऊयात.

 

no shave looks 9 InMarathi

 

नोव्हेंबर २००७ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये रहाणाऱ्या ‘मॅथ्यू हिल’ या महान शास्त्रज्ञाची कॅन्सरमुळे प्रकृती ढासळली होती. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात येणारा विज्ञानाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त असलेला हा शास्त्रज्ञ अमेरिका, युरोपमध्ये त्याच्या बॅटरी विषयक संशोधनांमुळे खुप लोकप्रिय आहे.

 

math inmarathi

कॅन्सरच्या शेवटच्या स्टेज असल्याने ‘मॅथ्यू हिल’ यांना शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नव्हते. कॉलेक्टल कॅन्सर मुळे जगाचा निरोप घेतांना लोकांना त्यांचं रूप बघवत नव्हतं. कॅन्सरमुळे ‘मॅथ्यू हिल’ यांचे केस गळून गेले होते.

नोव्हेंबर २००९ मध्ये ‘मॅथ्यू हिल’ यांच्या निधनाच्या दोन वर्षांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी असं ठरवलं की, दरवर्षी या महिन्यात आपण दाढी करायची नाही आणि ते पैसे वाचवून कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करायची. ‘रेझर’, ‘शेविंग क्रीम’ यांचे पैसे वाचवून ‘मॅथ्यू हिल’ यांच्या कुटुंबाने प्रोस्टेट, टेस्टीक्युलर आणि कोलोरेक्टल कॅन्सरग्रस्त लोकांना, संशोधनाला दर महिन्यात भरपूर मदत होण्यास सुरुवात झाली.

 

math 1inmarathi

 

ऑस्ट्रेलिया मधील ‘मोव्हेम्बर फाउंडेशन’ नावाच्या मित्र परिवाराने २००३ मध्ये सुद्धा नोव्हेंबर मध्ये दाढी न करण्याचा संकल्प केला होता. दाढी न करणे, मिशी वाढवणे आणि ते वाचलेले पैसे गरीब लोकांमध्ये वाटायचे असा त्यांचा प्रघात होता. युरोपियन देशांनी नोव्हेंबर महिना हा अशा सर्व समाजोपयोगी कामांसाठी दरवर्षीच राखून ठेवलेला असतो.

२००७ पासून जगातील बऱ्याच देशांमध्ये पाळल्या जाणाऱ्या ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या उपक्रमामुळे आजवर वीस लाख यूएस डॉलरपेक्षा जास्त रुपयांची बचत झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘मॅथ्यू हिल’ यांच्या परिवाराने या मोहिमेत सामील होण्याचं ठरवल्यापासून ही मोहीम ऑस्ट्रेलिया पुरती मर्यादित न राहता त्या मोहिमेला जागतिक स्वरूप प्राप्त झालं असं ‘मोव्हेंबर फाउंडेशन’ने आपल्या वार्षिक अहवालात सांगितलं आहे.

 

no shave inmarathi

 

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या मोहिमेचा प्रमुख उद्देश हा तुमच्या केसांवर प्रेम करा, त्यांचं जतन करा. तुम्हाला कॅन्सर सारखा आजार झाला तर हेच केस सर्वात आधी तुम्हाला सोडून जातील. जसं इतर अवयव, वस्तू यांची कृतज्ञता आपण व्यक्त करतो तशी केसांबद्दल सुद्धा कृतज्ञ रहा ही भावना आयोजकांच्या मनात आहे.

 

sonali inmarathi
BBC news

कॅन्सरग्रस्त लोकांसोबतच विविध शिक्षण संस्थांना ‘मोव्हेंबर फाउंडेशन’ कडून नोव्हेंबर महिन्यात आर्थिक मदत केली जाते. ही मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात दाढी, मिशी वाढवल्यावर कोणता ‘लूक’ हा जास्त लोकप्रिय होईल याची लोकांमध्ये दरवर्षीच उत्सुकता असते.

भारतात अजून तरी या मोहिमेचा श्रीगणेशा झाल्याची बातमी प्रसिद्ध झालेली नाहीये. चांगल्या कामासाठी जर हे परकीय अनुकरण आपण केलं तर आपल्या पुरोगामी समाजाला आनंदच होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?