' पॉर्न साईट्सवर गणिताचे क्लासेस घेणारा हा पठ्या कमवतोय वर्षाला करोडो रुपये! – InMarathi

पॉर्न साईट्सवर गणिताचे क्लासेस घेणारा हा पठ्या कमवतोय वर्षाला करोडो रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचं महत्व आपल्याला चांगलंच समजलं. आत्ता कुठे शाळा कॉलेजेस हळू हळू उघडायला सुरुवात झाली आहे, पण गेलं दीड वर्षं शाळा कॉलेजस ही ऑनलाइनच सुरू होती, मुलं, पालक त्याला चांगलेच सरावले आहेत.

 

online education inmarathi

 

वेगवेगळे ऑनलाइन अॅप्लिकेशन, साईट्सचा वापर करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शक्य तितका कमी खंड पडेल याची खात्री सरकारने घेतली होती. यामुळे देशभरातच ऑनलाईन एज्यूकेशनचं महत्व वाढलं, पण एका माणसाने ऑनलाइन लेक्चर्ससाठी चक्क पॉर्न साईटचा आधार घेतला असून तो माणूस त्यातून करोडो रुपये कमवत आहे.

ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसला असेल, पण ही घटना खरोखरच घडली आहे. पॉर्नहब या वेबसाईटवर गणिताची लेक्चर्स घेऊन एका युवकाने त्यातून चांगलेच पैसे कमावले आहेत.

ही घटना आहे तैवानमधली, चांगशू नावाच्या गणिताच्या शिक्षकाने पॉर्नहब या पॉर्न साईट्सवर गणिताची लेक्चर्स अपलोड केल्याने सध्या तो चांगलाच चर्चेत आला. या पॉर्नसाईटवर त्याचं verified अकाऊंट असून त्याने गणित विषयासंबंधीचे अनेक व्हिडीओज या साईटवर अपलोड केले आहेत.

 

changshu maths teacher inmarathi

 

चांगशुकडे गणितातली मास्टर्स डिग्री आहे आणि गेली पंधरा वर्ष तो तैवानमधील एका शाळेत गणित शिकवतोय. मध्यंतरीच्या काळात तो ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिकवण्या घेत होता.

त्याने युट्युबवर व्हिडीओज टाकायला सुरुवात केली होती, पण पॉर्नहबवर गणिताविषयी कोणतेच व्हिडीओज नाहीत हे त्याच्या लक्षात आलं, अर्थात पॉर्नहब ही साईटचं मुळी त्यासाठी नाही, त्यामुळे त्यावर गणितासंबंधी व्हिडीओज असण्याची शक्यता कमीच होती.

‘अशा साईट्सवर अनेक लोकं व्हिडीओज बघत असतात, जर मी माझे व्हिडीओज तिथे अपलोड केले, तर अनेक लोकं ते बघू शकतील’ असा विचार चांगशुच्या डोक्यात आला.

त्याने इतर पॉर्न वेबसाईट्सवर देखील त्याचे व्हिडीओज टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्या साईट्सनी हे व्हिडीओज पॉर्नचे नसल्याचं ओळखलं आणि म्हणून त्यांनी ते व्हिडीओज काढून टाकले.

 

changshu maths teacher inmarathi1

 

पॉर्नहब या साईटवर त्याचं सध्या वेरिफाइड अकाउंट आहे. अनेक लोकं केवळ मस्करी म्हणून हे व्हिडीओज बघतात, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की मस्करी म्हणून पाहिलं, तरीही समोरच्याला त्याचे पैसे मिळतातच.

त्याचे व्हिडिओज पाहून अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे कोर्स लावला आहे आणि वर्षाअखेरीस त्यांला २ करोड रुपये मिळतात. यातून व्हिडीओ तयार करण्यासाठी लागणार पैसा सोडला, तरीही त्याला खूप फायदा होतोय.

‘अनेकांना माझ्या शिकवण्यात काहीही रस नसतो, पण ‘पॉर्नहब’वर शिकवणारा एक शिक्षक म्हणून ते माझ्याकडे बघतात आणि आता तीच माझी ओळख ठरतेय.’ असं चांगशु सांगतात.

 

changshu maths teacher inmarathi3

 

पॉर्नहब सोडून इंस्टाग्राम आणि युट्युबवरदेखील त्याचे व्हिडीओज आहेत.

आता तुम्हाला ही गोष्ट नक्कीच विचित्र वाटेल, पण या जगात कोण काय करेल हे सांगता येत नाही हेच खरं…शेवटी पिंडे पिंडे मतिर्भिन्ना..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?