' 'तुम्ही पैसे घेऊन जा, शो होणार नाही' असं सांगण्यात आलेल्या थिएटरमध्येच १०० दिवस चालला चित्रपट

‘तुम्ही पैसे घेऊन जा, शो होणार नाही’ असं सांगण्यात आलेल्या थिएटरमध्येच १०० दिवस चालला चित्रपट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी रंगभूमीवरील आणि सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता म्हणजे सुबोध भावे. आजपर्यंत सुबोधने साकारलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात आहेत. तो उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण एक प्रगल्भ वाचकही आहे.

पुण्याच्या ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेतून त्याचा नाट्यक्षेत्राशी संबंध आला आणि मग पुढे विविध भूमिकांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर सोडली.

 

subodh bhave inmarathi

 

‘बालगंधर्व’ ही सुबोधची भूमिका विशेष गाजली आणि या भूमिकेतून ‘बालगंधर्व’ आजच्या पिढीला समजले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली. या भूमिकेसाठी सुबोधने खूप कष्ट घेतले होते.

काही गोष्टी जमून येण्यासाठी योग्य वेळ आणि योग असावा लागतो हे म्हणतात ते काही उगाच नाही. ‘बालगंधर्व’ होण्यामागेही असाच एक योग आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकानंतर सुबोधने ‘गंधर्वगाथा’ हे पुस्तक वाचायला घेतलं.

‘सुरुवातीपासूनच या पुस्तकाकडे मी खेचला गेलो, भा.द. खेरांचं बालगंधर्वांवरचं ते पुस्तक होतं. मी ते वाचतच राहिलो, शेवटचं पान वाचलं आणि पाच मिनिटं सुन्न होऊन तसाच बसलो. बालगंधर्वांवरचा माहितीपट सगळ्यांना समजायला हवा, असं त्याच दिवशी माझ्या मानाने ठरवलं.’ असं सुबोधने त्याच्या ‘घेई छंद’ या पुस्तकात लिहिलं आहे.

बालगंधर्वांच्या भूमिकेसाठी सुबोधने त्याच्या शरीरयष्टीवरदेखील खूप मेहनत घेतली होती. रोजचं रनिंग, योग्य आहार या गोष्टींचं त्याने काटेकोरपणे पालन केलं.

 

balgandharava inmarathi 1

 

असं म्हणतात, की या जगात तुमची मेहनतच तुमच्या यशाचं कारण असते. तुम्ही मेहनती असाल. कष्ट करण्याची तुमची तयारी असेल, तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही.

सुबोधने ‘बालगंधर्वांच्या’ भूमिकेसाठी जीव ओतून तयारी केली, आणि तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाच.

‘बालगंधर्व’ चित्रपटाची एक सुरेख आठवण त्याने त्याच्या ‘घेई छंद’ या पुस्तकात लिहिली आहे.

‘चार मे’ला बालगंधर्व चित्रपटाचा मुंबईत प्रीमियर होता. वडाळ्याच्या आयमॅक्स थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होता. चित्रपट सगळ्यांना भयंकर आवडला होता. सगळेजण चित्रपटाबद्दल भरभरून बोलत होते, कौतुक करत होते.

 

balgandharava inmarathi 2

 

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुबोध भावेचं जणू जगणंच बदलून गेलं. सतत प्रेक्षकांचे फोन चालू होते. प्रत्येकालाच चित्रपट मनापासून आवडला होता. पुढचा महिनाभर सुबोधला अनेक मेसेजस, पत्र होते.

सोशल मीडियावरदेखील सुबोध पत्रकारांशी, लोकांशी संवाद साधत होता. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली सगळीकडे प्रमोशन दौरे चालू होते.

हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमद्ये ‘खास शो’ म्हणून गेला. सगळीकडे खूप उत्तम चालला. अनेक चित्रपटगृहांमध्ये अगदी एकोणीस-वीस आठवडे हा चित्रपट होता.

पुण्याच्या सिटीप्राईड थिएटरची आणि सुबोधची एक खास आठवण आहे. बालगंधर्वने पुण्याच्या सिटीप्राईडमध्ये तब्बल १०० दिवस पूर्ण केले, पण एक काळ असा होता जेव्हा त्याचा चित्रपट बघण्यासाठी एकही प्रेक्षक नव्हता.

दक्षिणेतल्या एका निर्मात्याने ‘माझी आई’ हा चित्रपट काढला होता. यामध्ये सुबोधने काम केलं होतं. हा चित्रपट बघण्यासाठी सुबोध स्वतः तिकीट काढून सिटीप्राईडला गेला होता, आपलं काम पडद्यावर पाहण्यासाठी तो उत्सुक होता.

 

city pride inmarathi

 

आत जाऊन बसल्यावर थोड्यावेळाने थिएटरचा एक माणूस आत आला आणि त्याने सुबोधला सांगितलं, की ‘तुम्ही पैसे घेऊन जा, आज शो होणार नाही’

त्यादिवशी केवळ सुबोधनेच त्या शोचं तिकीट काढलं होतं आणि इतर कोणीच प्रेक्षक नसल्याने थिएटरने शो कॅन्सल केला.

आपलं काम एकालाही बघावंसं वाटतं नाहीये, या गोष्टीने सुबोधला खूप धक्का बसला, ‘थिएटरबाहेर येऊन मी ढसाढसा रडलो’ असं सुबोधने लिहिलं आहे.

पुढे त्याच थिएटरमद्ये सुबोधचाच चित्रपट १०० दिवस चालला. त्याच्या मेहनतीचं, सातत्याचं आणि कलेवरील निष्ठेचं हे फळ आहे.

मित्रांनो, तुमच्या आमच्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येत असतील, आपल्या कामाची योग्य दखल घेतली जात नाहीये असं तुम्हांलाही वाटत असेल, पण असा वेळेस खचून न जाता मेहनतीने एकेक पाऊल पुढे जाण्यातच खरा आनंद असतो, आणि या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?