' मणिपुरी जनतेला खुश करण्यासाठी भाजपची नामांतराची नवी खेळी!! – InMarathi

मणिपुरी जनतेला खुश करण्यासाठी भाजपची नामांतराची नवी खेळी!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बंगालच्या निवडणुकांचा धुराळा उडाला, आता देशातील काही प्रमुख राज्यांच्या निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहेत. यासाठी प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. आज देशात जवळजवळ भाजपची सत्ता आहे. अगदी भारताचा ईशान्य भाग जरी बघितला तर आसामसारख्या राज्यात देखील भाजपची सत्ता आली आहे.

 

west bengal election inmarathi

 

ईशान्य भारतातील आणखीन एक राज्य म्हणजे मणिपूर, आज पर्यटनामुळे जगाच्या नकाशावर आले आहे. याच राज्याच्या निवडणुका येत्या काही महिन्यावर आल्या असताना भाजपच्या अमित शहांनी एक मोठी घोषणा केली आहे, मणिपुरी जनतेला खुश करणारी ही घोषणा नेमकी आहे तरी काय?

 

ahmed patel and amit shah-inmarathi03
livemint.com

 

नेमकी काय आहे घोषणा?

नुकतंच अमित शाह यांनी अंदमान निकोबार बेटाला कामानिमित्त भेट दिली होती. तिकडच्या स्थानिकांनी रॅली देखील काढली. त्या रॅलीमध्ये अमित शाह यांनी घोषणा केली की अंदमान निकोबार बेटावरील माउंट हॅरिएट नावाने असलेले ऐतिहासिक पर्यटस्थळ आता माउंट मणिपूर म्हणून ओळखले जाईल.

 

mount 1 inmarathi

 

तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना? अंदमान निकोबार बेटावरच्या एका पर्यटनस्थळाला मणिपूरच्या लोकांचं का नाव देणार? तर यामागे इतिहास आहे.

मणिपूरचे अंदमानशी असलेले कनेक्शन :

आपण इतिहासात आतपर्यंत इंग्रजविरोधात लढलेले अनेक उठाव वाचले असतील मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातून इंग्रजविरुद्ध उठाव केले गेले होते. अगदी देशाच्या ईशान्य भागात सुद्धा हे अथवा केले गेले होते. त्यातीलच एक भाग म्हणजे मणिपूर.

१८९१ साली झालेल्या अँग्लो मणिपूर युद्धात महाराजा कुलचंद्रा ध्वज सिंग यांना आणि त्यांच्या सैनिकांना ब्रिटिशांनी अंदमान निकोबार येथे नेण्यात आले.

 

british inmarathi

 

जे सेल्युलर जेल आज पर्यटस्थळ म्हणून बघितले जाते, ज्या तुरुंगात स्वा. सावकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. त्या जेलची बांधणी तेव्हा झाली नव्हती. त्यामुळे राजाला आणि त्याच्या सैनिकांना माउंट हॅरिएट पर्वतावर ठेवण्यात आले जे आता दक्षिण अंदमान जिल्ह्यात आहे.

मणिपूरच्या दस्तावेजाच्यानुसार राजा कुलचंद्र आणि त्याच सैनिकांना आजन्म कैदेत ठेवण्याचीशिक्षा सुनावली होती. त्यामुळे काही जणांचा कैदेत असतानाच मृत्यू झाला तर राजाला नंतर अन्यस्थळी ठेवण्यात आले होते.

 

jail inmarathi
telegraph india

 

माउंट हॅरिएट नेमकं आहे तरी काय?

ब्रिटिश अधिकाऱ्यांना पहिल्यापासून आपल्या भारतातील शिखरे उंचावरील ठिकाणी याची आवड होती. माउंट हॅरिएट हे अंदमान निकोबार बेटावरील तिसरे सर्वोच्च शिखर आहे. उन्हळ्याच्या दिवसात या ठिकाणहून ब्रिटिश अधिकाऱ्यांचे कामकाज चाले.

१८६२ ते १८६४ या कालावधीत एक ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक त्या भागात करण्यात आली होती. त्याच्या पत्नीच्या नावाने या भागाला नाव देण्यात आले होते. आज हीच जागा नॅशनल पार्क म्हणून ओळखली जाते.

 

mount 2 inmarathi

आज उत्तर प्रदेशात योगी सरकार अनके शहरांची नावे बदलत आहेत. प्रामुख्याने ज्या भागांना शहरांना मुस्लिम नावे होती ती आता हिंदू नावाने ओळखली जातील. २०२४ च्या निवडणुकांचे बिगुल वाजायला लागले आहेत.

२०२२ च्या राज्यांच्या निवडणुका जवळ असल्याने जनेतला खुश करण्यासाठी आश्वासनांची खैरात केली जात आहे. प्रियांका गांधींनी महिलांना खुश करण्यासाठी ४०% महिला उमेदवार उभे करणार आहेत तसेच टू व्हीलर, मोबाईल फुकटात वाटणार आहेत.

भाजपला आज जसे मोठमोठाले राज्य महत्वाची आहेत तशीच गोवा, मणिपूर सारखी छोटी राज्य देखील तितकीच महत्वाची आहेत. याचा फायदा २०२४ साली एका प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जाईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?