' रोजच्या बोलण्यात येणाऱ्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती का? – InMarathi

रोजच्या बोलण्यात येणाऱ्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज आपल्या मायमराठीत अनेक शब्द आहेत जे खरं तर इतर भाषेतून आले आहेत. आपल्याकडे दर कोसावर भाषा बदलत असल्याने साहजिकच बोली भाषेतील काही शब्द मराठी भाषेत येतात. इंग्रजीमध्ये शब्द इतर भाषेतून आले आहेत.

रोजच्या बोलण्यात आपण असा एक शब्द वापरतो ज्याचा अर्थ तर आपल्याला माहित आहे मात्र तो शब्द वास्तवात एका शब्द जोडीचा संक्षेप आहे हे अनेकांना माहितही नसेल. अगदी उठता बसता वापरला जाणारा हा शब्द इंगजी आहे असं अगदी खात्रीनं तुम्ही सांगत असाल तर थांबा आणि हे वाचा –

 

marathi-language-inmarathi

 

इंग्रजी भाषा भारतीय भाषांत अगदी साखरेसारखी विरघळली आहे. आज अनेक इंग्रजी शब्द आपण आपलेच म्हणून वापरतो. उदाहरणार्थ, पेन, टेबल, ग्लास, कार, बस इत्यादी. असाच एक शब्द आहे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला सहमति दर्शविणारा “ओके”.

लहान थोरापर्यंत प्रत्येकजण या शब्दाचा वापर अगदी उठता बसता करत असतो. मात्र या शब्दाची एक गंमत आहे, मुळात एका एक स्वतंत्र शब्द नसून तो दोन शब्दांचं संक्षिप्त रुप आहे.

 

english-language-inmarathi

 

वास्तवात ओके हा शब्द इंग्रजी नसून ग्रीक आहे. या शब्दाचा फ़ूल फ़ॉर्म आहे, Olla Kalla. याचा अर्थ आहे, बरोबर आहे. या ग्रीक शब्दाचा संक्षेप असणार्‍या ओके या शब्दाची व्यत्पत्ती साधारण १८२ वर्षांपूर्वी झाली हे सांगितलं तर तुमचा विश्र्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

शेकडो वर्षांनतरही हा शब्द आजही मिनिटा मिनिटाला कोणीतरी वापरत असतं. अमेरिकन पत्रकरा चार्ल्स गॉर्डन ग्रीकच्या ऑफिसमधे हा शब्द जन्मला आहे. या शब्दाचा सर्वप्रथम वापर करताना तो oll correct असा केला गेला.

 

ok inmarathi

चार्ल्स गॉर्डन ग्रीक यांनी व्याकरणावर एक उपहासात्मक लेख लिहिला होता जो १८३९ साली बोस्टन मॉर्निंग पोस्टमधे प्रकाशित झाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८४० साली अमेरिकेचे अध्यक्ष मार्टिन व्हॅन ब्युरन यांच्या निवडणूक प्रचारात हा शब्द वापरला गेला.

 

ok 1 inmarathi

 

व्हॅन ब्युरन यांचे टोपणनाव होते ओल्ड किंडरहूक. या नावाचा संक्षेप करून त्यांना ओके असं संबोधण्यात येऊ लागलं. त्यांच्या समर्थकांनी त्यांना ओके म्हणायला सुरवात केली आणि जगभर ते ओके म्हणूनच प्रसिध्द झाले. त्यांच्या समर्थनार्थ ओके क्लबचीही स्थापना ठिकठिकाणी करण्यात आली.

 

ok 2 inmarathi

आज ज्याप्रमाने loll, ROFL, OMG हे शब्द वापाले जातात तसा एकोणिसाव्या शतकात ओके आला. आज टेक्स्टींगच्या जमान्यात ओकेचाही शॉर्टफ़ॉर्म अनेक महाभाग करतात आणि OK ऐवजी नुसतंच K लिहितात. संक्षेपाचाही संक्षेप होण्याची जी दुर्मिळ उदाहरणं आहेत त्यापैकी Okचं एक उदाहरण समजता येईल. गंमत म्हणजे जवळ जवळ शतकभर ओके शब्द नेमका कोणी प्रचलात आणला यावर वाद सुरू होता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?