' बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांपासून ते बारच्या गार्डकडून मार खाणारा, वादग्रस्त बॉबी देओल!

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांपासून ते बारच्या गार्डकडून मार खाणारा, वादग्रस्त बॉबी देओल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही वर्षांपूर्वी आलेला पद्मावत सिनेमा आठवतोय का? संजय लीला भन्साळी यांचा बिगबजेट सिनेमा. आधीच बाजीराव मस्तानीची प्रेमकथा दाखवून इतिहासकार, प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुर होता. मात्र तरीदेखील संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एकदा पद्मावत सिनेमा काढण्याचे धाडस दाखवले होते.

माध्यमांची गळचेपी, माध्यम स्वातंत्र्य राहिले नाही अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे होत आहे. मात्र याच माध्यमातून जेव्हा एखाद्या घटनेची, इतिहासतील तथ्यांची हेळसांड केली जाते तेव्हा प्रेक्षकांमध्ये साहजिकच नाराजी उमटते.

 

padmavat-inmarathi

 

सिनेमा लिबर्टीच्या नावाखाली काही गोष्टी यात दाखवल्या गेल्या आहेत. राजपुतांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे या कारणावरून काही संघटनांनी शूटिंगच्या ठिकाणी जाऊन नासधूस केली होती. तसे सिनेमाच्या दिग्दर्शकाला देखील मारहाण केली असे माध्यमात सांगण्यात आले होते.

 

padmavat inmarathi

 

आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे असे म्हणता येईल, कारण प्रकाश झा यांच्या आश्रम ३ या वेबसिराजच्या शूटिंग दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या विरोधात नारे दिले. तसेच बॉबी देओलला आमच्या हवाली करा अशी मागणी ही त्यांनी केली.

 

bobby aashram inmarathi

बॉबी देओल वर ही नकळत ओढवलेली घटना आहे, मात्र याआधी दारूच्या नशेत असताना त्याला मारहाण झाल्याची घटना घडलेली होती, नेमकं काय आहे प्रकरण चला तर मग जाणून घेऊयात…

बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा बॉलीवूडच्या पार्ट्यांची चर्चा समाजमाध्यमात जास्त चालते. बॉलीवूडच्या पार्ट्या आणि त्यात धिंगाणे घालणारे हेच आपले लाकडे स्टार्स. जेव्हा दारूच्या अधीन होतात तेव्हा स्वतःचे भान हरपून बसतात.

२०१४ साली दिग्दर्शक कारण जोहर याने आपल्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. मुंबईमधील एका बारमध्ये ही पार्टी होती. साहजिकच पार्टी सुरु झाल्यानंतर दारूचे प्याले रिचवले गेले. याच पार्टीमध्ये बॉबी देओल ही सहभागी झाला होता.

 

karan johar party featured inmarathi

 

बॉबी मद्यधुंद अवस्थेत होता तरीदेखील आणखीन दारू हवी आहे अशी मागणी करत होता, अशा अस्वस्थेत दारू पिऊ नये हे सांगण्यासाठी बरच गार्ड बॉबीकडे आला. दारूच्या नशेत असलेल्या बॉबीने त्याच्याशी वाद घालायला सुरवात केली. वाद इतका प्रकोपाला गेला की बारच्या गार्डने थेट बॉबीच्या कानशिलात लगावली.

आपला झालेला अपमान बघून बॉबीने तिथून काढता पाय घेतला, या प्रकरणाची तेव्हा चांगलीच चर्चा सुरु होती. मात्र ज्याने ही पार्टी ठेवली होती त्या कारण जोहरने या प्रकरणाला एक अफवा म्हणून घोषित केले होते.

 

party inmarathi

बॉलीवूड आणि तिकडे उठणाऱ्या अफवा यातले किती खोटे किती खरे हे त्याच मंडळींना ठाऊक असणार. जे शाहरुख आणि सलमान आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढत असतात, हेच दोघे कतरीनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकमेकांशी लढले होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?