' एअर इंडियाचा महाराजा, ज्याच्या 'आकर्षक मिशांचं', 'पाकिस्तान'शी असं कनेक्शन आहे!

एअर इंडियाचा महाराजा, ज्याच्या ‘आकर्षक मिशांचं’, ‘पाकिस्तान’शी असं कनेक्शन आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एअर इंडिया ही भारतीय हवाई प्रवासाची ओळख बनलं होतं. मधल्या काही काळात ही नैया गोते खात होती तरीही आता पुन्हा एकदा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. एअर इंडिया म्हटलं की हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एअर इंडियाचा मॅस्कॉट, कमरेत वाकलेला लाल कपड्यातला, मोठ्या मिशांचा महाराजा! तुम्हाला या मिशांचं पाकिस्तानशी असलेलं कनेक्शन कळलं, तर ऐकून थक्क व्हाल.

 

air india maharaja inmarathi

 

एअर इंडिया म्हटलं, की सगळ्यात आधी कमरेत वाकलेला आदबशीर, लाल शाही गणवेशातला, झुपकेदार पल्लेदार मिशांचा महाराजा डोळ्यासमोर येतो. एअर इंडियाची महत्त्वाची ओळख बनलेला हा महाराजा मुळात कसा अस्तित्वात आला?

महाराजाची गोष्ट…

ही गोष्ट आहे, आजपासून तब्बल ७२ वर्षांपूर्वीची. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही तेव्हा झालेला नसेल. महाराजाला जन्म देणार्‍या व्यक्तीचं नाव आहे, बॉबी कूका. मार्केटींगचे जादुगार म्हणून ज्यांची ओळख होती.

एअर इंडियाच्या मेमो पॅडवर १९४० साली महाराजा प्रथम अवतरले. बॉबी त्यावेळेस एअर इंडियाच्या व्यावसायिक संचाकलपदी कार्यरत होते. जे वॉल्टर थॉमसनमधील आर्टिस्ट उमेश राव यांनी हा महाराजा चितारला होता.

 

maharaja air india inmarathi

भारताची जगभरात ओळख Land of Maharajas अशी होती. भारत म्हटलं, की राजवाडे, राजे आणि त्यांची श्रीमंती हेच जगभरातलं चित्र होतं. इथले हत्ती घोड्यांवरून फिरणारे राजे महाराजे, हा जगभरात कुतुहलाचा विषय होता. हे कुतुहल अगदी आजपर्यंत सुद्धा अनेक ठिकाणी टिकून आहे असं म्हणता येईल. आजही भारताबाहेरील अनेकांना वाटतं की भारतात हत्तीवरुन लोक फिरतात.

हीच ओळख मिळायला हवी…

अशी ओळख एअर इंडियानंही मिरवावी असं कूका यांना वाटत होतं. एअर इंडिया ही त्या काळात एकमेव अशी प्रवासी हवाई सेवा होती जी देशाबाहेरची उड्डाणं करत असे. कैरो, प्राग, इस्तांबूल, दमास्कस, झुरीच इत्यादी ठिकाणी एअर इंडियाची विमानं जात असत.

कूका यांना एअर इंडियाच्या लेटर हेडवर भारतीय शालीनता, उच्चभ्रूपणा यांचं दर्शन घडवणारं प्रतीक हवं होतं. या विचारातूनच उमेश राव आणि कूका यांनी महाराजाची रचना केली. जे जे शाही होतं ते ते त्याच्यात आणलं गेलं. कमरेत वाकून अभिवादन करण्याची ‘रॉयल’ पध्दत, टापटीप असणारा उच्चभ्रू रॉयल गणवेश, शाही पगडी, चेहर्‍यावर मार्दवभरलं स्मित आणि झुबकेदार मिशा.

 

maharaja of air india inmarathi

 

हा महाराजा अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला आणि एअर इंडियाचा प्रसार होण्यासाठी या प्रतिकाची आयती मदत झाली. त्यानंतर महाराजा हा अधिकृतरित्या एअर इंडियाचा मॅस्कॉट बनला.

मिशांची गोष्ट…

महाराजा कागदावर उतरवला जात होता, तेव्हा तो कसा दिसला पाहिजे यावर बराच खल केला होता. या महाराजाची ओळख बनलेल्या मिशांचीही एक रंजक कथा आहे. वास्तवातल्या एका व्यक्तीवरून प्रेरणा घेऊन या मिशा बनविल्या होत्या.

नंतरच्या काळात हा महाराजा अनेकविविध पेहरावात विविध कॅम्पेनमधे दिसला, मात्र पेहराव बदलला तरीही त्याच्या त्या सुप्रसिध्द मिशा तशाच होत्या. लोक महाराजाला त्याच्या मिशांवरून लक्षात ठेऊ लागले होते. इतक्या जगप्रसिध्द बनलेल्या मिशा वास्तवात होत्या तरी कोणाच्या?

बॉबीना प्रभावित केलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीच्या मिशांवरून या मिशा बेतल्या होत्या. या पाकिस्तानी व्यक्तीचं नाव होतं, सैयद वाजिद.

कोण होते सैयद वाजिद? 

सैयदसाहेब पाकिस्तानातील एक सुप्रसिध्द व्यापारी होते. त्यांचं रहाणीमान अगदी उच्चभ्रू आणि समोरच्यावर छाप पाडणारं होतं. अशा या सैयद साहेबांच्या झुबकेदार मिशांचं बॉबीना नेहमीच आकर्षण वाटत आलं होतं.

जेव्हा महाराजा कागदावर चितारला जात होता आणि त्याला मिशा रेखण्याची वेळ आली तेव्हा बॉबींनी हुबेहूब सैयदसाहेबांच्या मिशांची नक्कल करण्यास सांगितलं. गोल गरगरीत चेहर्‍याच्या महाराजा या मिशा कमालीच्या खुलून दिसत होत्या.

 

air india mascot inmarathi

एअर इंडियाच्या महाराजाला जरी महाराज म्हणून ओळखलं जात असलं, तरीही वास्तवात तो राजे महाराजेंपैकीचा महाराजा नाही. इंग्लंडच्या महाराणीच्या पदरी असणार्‍या भारतीय रॉयल सेवकावरून महाराजा घडवण्याची प्रेरणा घेतली गेली होती. जी राजेशाही सेवा महाराणीला मिळते तिच एअरइंडियात तुम्हाला मिळेल हा संकेत बॉबींना यातून द्यायचा होता.

मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला या महाराजाची कहाणी? तुमच्याप्रमाणेच ती प्रत्येक भारतीयाला ठाऊक हवी, असं वाटतंय की नाही तुम्हाला सुद्धा? मग वाट कसली बघताय, पटापट हा लेख तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. हो, आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली, तेसुद्धा कमेंटमधून नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?