' चंकीने शाहरुखला बॉलीवूडमध्ये आणून स्टार बनवले; तो स्वतः मात्र मागेच पडला… – InMarathi

चंकीने शाहरुखला बॉलीवूडमध्ये आणून स्टार बनवले; तो स्वतः मात्र मागेच पडला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कालच चंकी पांडेच्या मुलीला NCB ने चौकशीसाठी बोलावले होते, तिच्यासोबत चंकी पांडे सुद्धा होता. आर्यन खान प्रकरणात तिला चौकशीसाठी बोलवले होते. बॉलीवूडच्या या स्टार किड्सचा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश होण्याआधीच पाय घसरू लागला आहे.

काल शाहरुखने देखील आल्या मुलाची तब्बल २० दिवसांनी वगरे भेट घेतली, माध्यमांनी लगेचच पिता पुत्राच्या भेटीच्या बातम्या रंगवून सांगितल्या. तर दुसरीकडे आर्यन खान प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा घेत आहे.

 

ananya pandey inmarathi

 

आपापल्या मुलांच्या कृत्यांमुळे या बापमंडळींना वेगवेगळ्या परिस्थितीतून जावे लागत आहे. मात्र हीच बाप मंडळी म्हणजे शाहरुख खान आणि चंकी पांडे यांचे संबंध फार जुने आहेत. कारण शाहरुखला स्टार बनवण्यामागे जशी त्याची मेहनत आहे तशी चंकी पांडेची सुद्धा मदत आहे, आश्चर्य वाटलं असे ना? हो पण हे खरं आहे, खुद्द शाहरुखने एका कार्यक्रमात हे कबूल केले आहे.

 

shahrukh khan inmarathi

 

अँड टीव्ही या चॅनेलवरच्या एका रिऍलिटी शोचं सूत्रसंचालन शाहरुख करत होता, तेव्हा त्या कार्यक्रमा दरम्यान तो आपल्या स्ट्रगल काळाबद्दल भावुक झाला, त्याने पुढे म्हंटले की ‘मुंबईत जेव्हा मी कामासाठी आलो तेव्हा काही दिवस चंकीकडे राहिलो होतो. चंकी तेव्हा सिनेमांमध्ये काम करत होता त्याचं नाव मोठं होतं. त्यानेच मला इंडस्ट्रीत आणलं, इथल्या लोकांशी ओळख करून दिली होती’.

बॉलीवूड या नावाला भुरळून देशभरातून नव्हे तर परदेशातले कलाकार सुद्धा इथे आपले नशीब कमवायला येत असतात. सुरवातीला सिनेमात काम करणे म्हणजे वाईट काम म्हणून बघितले जायचे, मात्र ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी आपसूक मिळत असल्याने अनेकांना याची भुरळ पडली.

दिल्लीतला एक मुलगा मुंबईत येतो आणि काही वर्षात सुपरस्टार सुद्धा होता, शाहरुखच्या प्रवासाबद्दल आपण सगळेच जाणून आहोत. कधी कधी निराश झालो तर शाहरुखचे प्रेरणा देणारी वाक्य आपण आठवतो. मात्र याच शाहरुखला इंडस्ट्रीत आणणाऱ्या चंकी पांडेबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही.

 

bollywood actors 2 inmarathi

 

हिरोचा मित्र अशी ओळख निर्माण झालेला चंकी खरं तर आजच्या खान मंडळींच्या आधीच या बॉलीवूडमध्ये आला होता. बॉलीवूडमध्ये येण्याआधी तो एका अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण द्यायचा. आज एकामागून एक सिनेमा करणाऱ्या अक्षय कुमारला अभिनयाचे धडे चंकी पांडेने दिले आहेत.

 

chunkey inmarathi

 

एकीकडे खान मंडळी आपले प्रस्थ निर्माण करत होती तर दुसरीकडे अजय देवगण, अक्षय कुमार यासारखी अॅक्शन हिरो मंडळी आपला जम बसवत होती. यामध्ये चंकी कशातच बसत नव्हता, नाईलाजाने शेवटी वेगळा मार्ग स्वीकारला आणि त्याने आपला मोर्चा बांग्लादेशी सिनेमांकडे वळवला. त्यात मात्र चांगले यश त्याला मिळाले.

२०१० साली आलेल्या हाऊसफुल या सिनेमातून आपले पुरागमन तर केलेच पण आखरी पास्ता नावाचे पात्र साकारून पूर्ण सिनेमात धमाल उडवून दिली होती.

 

chunkey inmarathi 1

बॉलीवूड आणि तिथल्या पार्ट्या हा एक चर्चेचा विषय असतो. पार्ट्यांमध्ये सर्वात नाव कोणाचे चर्चेत असेल तर ते चंकी पांडेचे. आज तो फारसे काम करत नसून सुद्धा त्याच्या नावाची चर्चा होते हीच खरी आश्चर्याची गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?